Bhadgaon : तीन दिवसात एकाच तलावात दोघांचे मृतदेह आढल्याने खळबळ

नोव्हेंबर 17, 2025 3:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील तलावाच्या पाण्यात अजून एक मृतदेह तरंगताना आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नारायण रामदास ऱ्हाळीगे (वय- ५२) असं मृताचे नाव असून विशेष म्हणजे, याच तलावात १४ नोव्हेंबर रोजी वाल्मीक संजय ह्याळींगे या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. एकाच तलावात दोन मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

pimparkhed

याबाबत सविस्तर वृत्त असे की १४ नोव्हेंबर रोजी पिपंरखेड (ता भडगाव) येथील वाल्मीक ह्याळींगे या वर्षीय तरुणाचा मृतदेह तलावाच्या पाण्यात आढळून आला होता. याबाबत भडगांव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली होती. त्याबाबतचा पोलिस तपास सुरु असतांनाच १६ नोव्हेंबर रोजी सकाळी नारायण ऱ्हाळीगे यांचा मृतदेह तलावाच्या पाण्यात तरंगतांना आढळून आला. एकाच ठिकाणी, एकाच तलावात तीन दिवसांच्या अंतराने दोघांचे मृतदेह सापडल्यामुळे पिंपरखेड परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मृताच्या नातेवाइकांनी आक्रोश करीत मयताचा घातपात झाल्याचा सशंय व्यक्त करीत मारेकऱ्याना तात्काळ अटक करावी व इनकॅमेरा शव विच्छेदन करावे या मागणीसाठी कासोदा-भडगांव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय नातेवाईकांकडून घेण्यात आल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होते. वाल्मीकच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केला आहे की, वाल्मीकला शेवटचे त्याच्या मित्रासोबत नारायण हयाळींगे यांनीच पाहिले होते. त्यामुळे नारायण यांचाही घातपात झाला असावा किंवा ते या घटनेचे साक्षीदार असल्याने त्यांना संपवण्यात आले असावे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याबाबत शेवटचे वृत्त हाती आले तो पर्यंत भडगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now