⁠ 
शनिवार, मे 18, 2024

एरंडोल येथे रक्तदान शिबीर संपन्न, उद्या मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । एरंडोल शहरात सालाबादाप्रमाणे जय श्रीराम प्रतिष्ठानतर्फे हनुमान कथेचे आयोजन करण्यात येते. यंदा येथील श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसरात करण्यात आले. प्रतिष्ठानतर्फे ५एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. ज्यात ४० रक्तदात्यांनी शिबिराचा लाभ घेतला. तसेच उद्या ६रोजी मोफत भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

यांनी घेतले परिश्रम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्त संकलन केंद्र जळगाव येथील डॉ. आकाश चौधरी, टेक्निशियन सुपरवायझर लक्ष्मीकांत त्रिपाठी, रक्त केंद्र सायंटिफिक ऑपरेटर राजेश शिरसाठ, चेतन पवार, तंत्रज्ञ, प्रभाकर पाटील सहाय्यक, सुभाष सोनवणे यांच्या पथकाने रक्त संकलनाचे सहकार्य केले. शिबिराचे शुभारंभ भागवताचार्य राजीव कृष्ण महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमोद पाटील, डॉ. राजेश महाजन, अमर महाजन, प्रदीप फराटे, सदानंद पाटील, अवि जाधव, ज्ञानेश्वर पाटील, डॉ. सुमेध महाजन, राकेश झा, मनोज झा, दिनेश पाटील, ऋषिकेश महाजन, अमित पाटील, सनी पाटील, अनंत पाटील, अजय महाजन, कृष्णा पाटील, ओम पाटील, देव जाधव, धीरज पाटील, मनोज महाजन, निखिल पाटील, टोनी शिरवानी, बंटी शिरवानी, अश्विन पाटील, पुष्पक पाटील संजय महाजन, प्रमोद चौधरी यांच्यासह जय श्रीराम प्रतिष्ठान कार्यकारिणीने परिश्रम घेतले.

दरम्यान दि. ६एप्रिल रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी, पोटाचे विकार, नाक कान घसा, या विषयावर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे जय श्रीराम प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन पाटील यांनी जाहीर आवाहन केले आहे.