⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024

जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जातेय; पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । जळगाव येथील आशादीप महिला वसतिगृहातील अत्याचारप्रकरणाचा मुद्दा सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलच गाजत आहे. विरोधी पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. दरम्यान, वसतिगृहात कुठलाही गैरप्रकार घडलेला नसून असल्यामुळे या माध्यमातून जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जात असल्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील सभागृहात म्हणाले आहे.

 

जळगाव शहरातील महिला वसतीगृहात झालेला प्रकाराची वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यात बातम्या आल्या. मी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. परंतू असा प्रकार झालेला नसून आमचा मतदार संघ असलेला जळगाव जिल्ह्याची मुद्दाम बदनामी केली जात असल्याचेही ना.पाटील म्हणाले आहे.

 

या प्रकरणी गृहमंत्र्यांनी उच्च अधिकार्‍यांच्या समितीद्वारे चौकशी केली असता हे प्रकरण घडलेच नसल्याचे समोर आले. या प्रकरणी ज्या महिलेने आरोप केले तिच्या विरूध्द १७ वेळेस तक्रारी करण्यात आल्या आहेत. ती मनोरूग्ण असल्याचे आधीच समोर आले असून तिने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

तशी कोणतीही घटना घडलीच नाही ; जळगाव महिला वसतिगृह प्रकरणी गृहमंत्र्यांची क्लीन चीट

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । जळगाव येथील मुलींच्या आशादीप शासकीय वसतिगृहात पोलीस कर्मचाऱ्यांनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला लावण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. 

 

दरम्यान,  विरोधी पक्षाने या घटनेवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले होते. मात्र तशी कोणतीही घटना घडलीच नाही असं म्हणत अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव शासकीय वसतिगृह प्रकरणी क्लीन चीट दिली आहे.

 

याप्रकरणी अधिक तपास करण्यासाठी शासनाकडून महिला अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. सदर महिला अधिकाऱ्यांनी सादर कलेला अहवाल गृहमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला आहे. यावेळी पोलीस अधिकारी महिला वसतिगृहात आत जाऊ शकत नाहीत असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

आशादीप महिला वसतिगृह प्रकरण : खाकीतल्या गिधाडांना कठोर शिक्षा करा

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. 

याबाबतची तक्रार सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पीडित महिलांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून वसतिगृहात मुलींबाबत झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. महिला अधिकाऱ्यांच्या समितीने तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीने तक्रारदार महिलेसह संबधितांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. लवकरच याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार असल्याची माहिती घोडमिसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

दरम्यान, भाजप आमदार श्वेता महाले यांनीही याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जळगावमध्ये अतिशय निंदनीय घटना घडली आहे. जळगावच्या आशादीप वसतिगृहात अशी घटना घडणे खूप चुकीचं आहे. कर्मचाऱ्यांकडून मुलींना कपडे काढून नाचायला सांगतात हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. हे कृत्य करायला नकार देणाऱ्या महिलांना मारझोड केली जाते. या आरोपींवर कडक कारवाई करावी आणि सरकारने दखल घ्यावी. आपली सुरक्षा करणाऱ्या लोकांकडून अशी घटना होते ते खूप दुर्दैवी आहे” असं आमदार श्वेता महाले म्हणाल्या.

महिला वसतिगृह परिसरातील रहिवाशांचे रात्री १० वाजता इन कॅमेरा जबाब नाेंदवले

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  शहरातील शासकीय आशादिप महिला वसतिगृहात महिला व मुलीच्या चौकशीच्या नावाखाली अनैतिक कृत्य व गैरव्यवहार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, वसतिगृहातील प्रकाराची चाैकशी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी रात्री १० वाजेच्या सुमारास भेट दिली.

 

त्यांनी परिसरातील रहिवाशांचे इनकॅमेरा जबाब घेतले. दाेन महिला पाेलिस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्यासाेबत हाेते. पाेलिस पथकाने वसतिगृहासमाेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीअारही चाैकशीसाठी ताब्यात घेतले.

 

दरम्यान, शहरातील शासकिय वसतिगृहातील महिलांना भेटायला येणाऱ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे ते बाहेर गर्दी करतात आणि त्याचा त्रास आम्हा रहिवाशांना होतो. त्यामुळे हे वसतिगृह या भागातून हलवावे, अशी मागणी संबंधित शासकिय महिला वसतिगृहाच्या परिसरातील नागरिकांनी केली आहे. महिलांचे जळगाव शहरातील शासकिय वसतिगृह अचानक चर्चेत आले आहे.

त्या प्रकरणात चार महिला अधिकाऱ्यांची समिती चौकशी करीत असून त्यानंतर वास्तव समोर येण्याची शक्यता आहे.

एरंडोलमध्ये २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; परिसरात खळबळ

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  । येथील गांधीपुरा, महादेव मंदीर परिसरातील रहिवासी २१ वर्षीय तरुणाने मंगळवारी (दि.२) उशिरा रात्री कडूनिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेतला. किरण धनसिंग पाटील असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुनील घरी न आल्यामुळे वडील धनसिंग पाटील त्याचा शोध घेतला. गालापूर शिवारातील शेतात किरणने कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. ही घटना समजताच प्रा. मनोज पाटील यांनी नगरसेवक बबलू पैलवान याना सोबत घेत घटनास्थळ गाठले.

 

काही वेळाताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे हेदेखील पोहोचले. किरणला रिक्षाने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील, डॉ. मुकेश चौधरी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत चेतन पाटील यांनी दिलेल्या माहितीवरून एरंडोल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. हवालदार विकास देशमुख, राजू पाटील पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.

धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत महिलेची आत्महत्या

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२१ । जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनी भागातील रहिवासी असणार्‍या ५५ वर्षीय महिलेने धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली असून विमलबाई काशिनाथ चौधरी (वय५५, रा. रामेश्‍वर कॉलनी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.  

 

सविस्तर असे की, विमलबाई चौधरी या शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील राहतात. दरम्यान, आज त्यांनी आसोदा रेलवेगेट ते भादली दरम्यान रेल्वे खांबा ४२१/२३-२५ च्या मध्ये धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन पार्थिव जिल्हा रूग्णालयाकडे रवाना केले.

 

दरम्यान, मयत महिलेच्या पश्‍चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली आहेत. हे कुटुंब भाजीपाला विक्रेते म्हणून काम करत होते. या महिलेने नेमकी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजले नाही. दरम्यान, शनिपेठ पोलिसांनी याचा पंचनामा केला असून याबाबत नोंद करण्याचे काम सुरू होते.

सुसाईड नोट लिहून एरंडोलच्या १६ वर्षीय तरुणीची आत्महत्या

0

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ मार्च २०२१ | एरंडोल पंचायत समितीमध्ये कनिष्ट अभियंता असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या दहावीत शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षीय मुलीने सरकारी निवासस्थानात गळफास घेवून आत्महत्या केली.

रोहिणी हरिभाऊ चंदनकर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, रोहिणी हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

याबाबत असे की, आशालता वानखेडे ह्या पंचायत समिती कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानी परिवारासह राहतात. आशालता वानखेडे ह्या मंगळवारी (ता. 2) नेहमीप्रमाणे कार्यालयात गेल्या होत्या. सायंकाळी घरी आल्यानंतर त्याना त्यांची सोळा वर्षीय मुलगी रोहिणी हरिभाऊ चंदनकर हिने डोक्याला बांधण्याच्या फेट्याचा कापड घराच्या छताला असलेल्या पंख्याला बांधून गळफास घेतलेल्या दिसून आली. त्यांनी आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली.

नागरिकांनी रोहिणी हिस ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.मयत रोहिणी चंदनकर हिने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माझ्या मृत्यूबाबत कोणालाही जबाबदार धरण्यात येऊ नये असा मजकूर चिठ्ठीमध्ये आहे.

याबाबत विजय रामचंद्र वानखेडे यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पाटील, अनिल पाटील करीत आहेत.

जळगावातील आशादीप वसतिगृहातील प्रकरणावरून सुधीर मुनंगटीवारांचा संताप; म्हणाले….

0

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ मार्च २०२१ | शहरातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घडलेल्या प्रकरणावरून भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल.

आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. आमदार श्वेता महाले यांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहाचा हा विषय काढला. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना नग्न करून नाचवले जात आहे हे गंभीर आहे, असं महाले म्हणाल्या. .

कोंबडीचे पैसे मागितले म्हणून एकाला मारहाण

0
beating someone

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२१ । कोंबडीचे पैसे घेण्यासाठी घरी का गेला असा जाब विचारात एका मटण विक्रेत्याला एकाने मारहाण केल्याची घटना शिरसोली रोडवरील जैन कंपनीजवळ घडली.

याबात अधिक माहिती अशी कि, रियाज खाटीक रा. शिरसोली याने लोखंडी पाईपाने मटन विक्रेता बाबु खाटीक रा. मेहरूण बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता घडली.

बाबु कासम खाटी (वय-४६) रा. राम नगर, मेहरूण हा मटन विक्रेता आहे. मटनचा व्यवसाय असल्यामुळे तालुक्यातील शिरसोली येथील रियाज इलियाज खाटीक याच्याकडून कोंबडी घेत असतो. दरम्यान, २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता रियाज खाटीक हा कोंबडीचे पैसे घरी गेला होता. पैस मिळाले नाही म्हणून दुपारी बाबु खाटीकच्या दुकानावर रियाज आला असता.

कोंबडीचे पैसे घेण्यासाठी घरी का गेला असा विचारल्याचा राग आल्याने रियाजने लोखंडी पाईप घेवून बाबु खाटीकच्या डोक्यात मारहाण केली. यात बाबु खाटीक गंभीर जखमी झाला. जखमीवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रियाज खाटीक यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.