⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024

जळगावच्या राजकारणात मराठा नेतृत्वाची फरपट…

0
maratha injalgaon politics

जळगाव लाईव्ह न्यूज । दिलीप तिवारी । जळगाव महानगर पालिकेतील सत्तांतराचा धुराळा खाली बसला. मराठा समाजातील उमेदवाराला उपमहापौरपदावर समाधान मानावे लागले. नगरसेवकांच्या फाटाफुटीत सर्वाधिक अविश्वसनीय स्थिती मराठा नगरसेवकांची राहिली. इतरही मराठा नेतृत्वाची जवळपास अशीच अवस्था आहे. अलिकडच्या काही वर्षांत जिल्ह्यातील सत्तेच्या पदांवरून मराठा समाजातील नेतृत्वाला खड्यासारखे बाहेर काढले गेले. कधीकाळी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर, मंत्रीपदांवर तसेच जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ, साखर कारखाने व सुतगिरण्या यात मराठा समाजातील नेत्यांचे वर्चस्व होते. तेथून मराठा नेतृत्वाला ठरवून विस्थापित केले गेले. सध्याचे मराठा नेते हे सुद्धा स्वतःचे ताट घेऊन स्वतःची पंगत सुरू करु शकतील अशा ताकदीचे नाहीत. दुसऱ्याच्या ताटाखालचे मांजर होऊन दुसऱ्याच्या पंगतीत जेवायची सवय त्यांना लागली आहे.

जळगाव मनपातील सत्तांतराने मराठा नेतृत्वाच्या फरपटचा इतिहास अधिकच गडद झाला. वास्तविक भाजपतर्फे पहिला मराठा महापौर होण्याची संधी प्रतिभा कापसे किंवा ज्योती चव्हाण यांना लाभलेली होती. मात्र जिल्ह्यातील अत्यंत वजनदार व प्रभावी नेत्याने मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, शिवसेना खासदार वगैरेंना कॉल करून जळगाव मनपातील भाजप फोडली. तशा अनेक बातम्या सोशल मीडिया व छापील माध्यमात आलेल्या आहेत. भाजप फोडण्याचा परिणाम असा झाला की, महापौर होऊ शकणाऱ्या मराठा उमेदवाराची संधी हुकली. शिवाय, नेत्यांच्या दबावामुळे भाजपकडील इतर नगरसेवक फुटून शिवसेनेकडे गेले. त्यातील काही मराठा नगरसेवकांवर अविश्वसनीय नगरसेवक असा ठपका लागला.

शिवसेनेडून महापौरपदाचे उमेदवार निश्चित होते. ज्या ९ ग्रह मंडळ नगरसेवकांनी सर्वांत अगोदर भाजपच्या सत्तेला सुरूंग लावायचे ठरविले त्यापैकी कुलभूषण पाटील यांना उपमहापौर करण्याचे निश्चित होते. पाटील हे मराठा आहेत. पण ऐनवेळी कुलभूषण पाटील यांच्या नावालाही विरोध सुरू झाला. मावळते उपमहापौर यांचे नाव लावून धरले गेले. भाजपमधील फोडाफोडीत जळगाव मनपातील मराठा नगरसेवकांचे राजकारण ‘ना इकडचे ना तिकडचे’ झाले. विधानसभा मतदार संघात शिवसेना बंडखोर व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत मराठा उमेदवाराच्या विजयाचा असाची एक वचपा काढला गेला.

जळगाव शहरात मराठा राजकारणाचे खच्चीकरण व फरपट कशी होत आहे ? हे थोडे आकडेवारीवरून समजून घेऊ या. भाजपने यावेळी महापौरपद मराठा उमेदवाराला देणे निश्चित केले होते. भाजपकडे एकूण ११ मराठा नगरसेवक होते. त्यापैकी कापसे वा चव्हाण यांना उमेदवारी मिळणार होती. पण आमदार सुरेश भोळे यांच्याविषयी ९ ग्रह मंडळातील नगरसेवकांसह इतरांची असलेली नाराजी आणि कापसेंवर भोळे समर्थक असल्याचा शिक्का यामुळे बहुतेक नगरसेवक कापसे यांच्या नावाला विरोध करीत होते. खासदार उन्मेष पाटील यांनीही कापसेंच्या नावाला लावून धरले. भाजपतील एक मोठा गट आतून अस्वस्थ होता. कापसे नावाला एवढा विरोध होता की, महापौरपदासाठी विचार होणाऱ्या चव्हाण यांनीही ऐनवेळी भाजप सोडली. त्यांच्या सह भाजपतील ९ मराठा नगरसेवक स्वतंत्र गटात गेले.

जळगाव नगरपालिकेत सुरेशदादा जैन यांचे नेतृत्व असताना गुलाबराव देवकर व स्व. पुष्पलता प्रकाश पाटील यांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. सुरेशदादा जैन यांनी सत्तेचे वाटप नेहमी सामाजिक संख्याबळ लक्षात घेऊन केले. जेव्हापासून महानगरपालिका अस्तित्वात आली तेव्हापासून एकही मराठा नगरसेवक महापौर होऊ शकलेला नाही. अशा राजकारणामागील कारणे दूरदृष्टीने तपासायला हवीत. त्याचे संभावित गणित आगामी विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत दडलेले आहे.

जळगाव मतदार संघातून दोन वेळा (२०१४/२०१९) लेवा पाटील उमेदवार विजयी झाले. आता सन २०२४ मध्ये पुन्हा लेवा पाटीलच आमदार हवा असेल तर मराठा नेतृत्वाची जेवढी फाटापूट करता येईल तेवढी करायला हवी. कारण सन २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दिलेले नवखे मराठा उमेदवार अभिषेक पाटील यांना फारसा प्रचार न करता ४९ हजारावर मतदान झालेले आहे. जर मराठा उमेदवार मतदारांना परिचित असेल, मराठा कार्ड सूत्र वापरले जाणार असेल तर जळगाव शहराचे नेतृत्व सहज मराठा आमदाराकडे जाऊ शकते. तसे झाले तर लेवा कार्ड आणि संभावित उमेदवारी धोक्यात येण्याचा इशारा आहे. तरीही जळगाव शहरात मराठा उमेदवार नाकारून इतर समाजाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून द्यायचा तर शरद पवार व अजीत पवार यांना तसे पटवून द्यावे लागेल. त्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीच महापौर व उपमहापौर निवडणुकीत ठरवून मराठा नगरसेवकांचे खच्चीकरण झाले असावा असा निष्कर्ष काढायला जागा आहे.

सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर तेव्हा शहरातल्या मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार होती. यात सर्वाधिक मतदार हे मराठा समाजाचे म्हणजेच सुमारे ९४ हजार आहेत. असे असतानाही अभिषेक पाटील यांना ४९ हजार मते मिळाली. जळगाव शहरात मराठा पाठोपाठ लेवा पाटीदार मतदार संख्या सुमारे ८६ हजार आहे. परंतु, जळगाव शहर मतदार यादीत नाव असलेला लेवा पाटील मतदार पुणे-मुंबईकडे गेलेला आहे. अशी मतदारांची संख्या ११ हजारच्या वर आहे. तरीही जळगाव शहरातून लेवा पाटील उमेदवार समाजाचे गठ्ठा मतदान घेऊन विजयी होतो. अर्थकारणाच्या बळावर इतर समाजाचेही मतदान मिळवतो. त्यामुळेच शहराचा आमदार लेवा पाटील आणि महापौरपदावरही लेवा पाटील हे भाजप नेतृत्वाला हताशपणे करावे लागले होते.

लेवा पाटील मतदार खालोखाल ५२ हजार मुस्लिम आहेत. त्यातील मेहरूण व तांबापूर भागात समाजाने एकी दाखवून एमआयएमचे ३ नगरसेवक विजयी करून दाखवले. खरे तर असा धडा मराठा समाजाने गिरवायला हवा. जळगाव शहरात ३६ हजार गुजराती-मारवाडी, ३२ हजार कोळी व १२ हजार सिंधी समाजाचे मतदार आहेत. दलित व ओबीसी मानला जाणारा ४८ हजार मतदार आहे. कोळी समाजाचे मतदान ४० हजार सुद्धा नसताना मनपातील पदांवर या समाजातील नगरसेवकांची सहज वर्णी लागते. याचे कारण शहरातून प्रभाग निहाय निवडून येणाऱ्या नगरसेवकात लेवा पाटील समाजाच्या लेवा पाटील नगरसेवकांची संख्या क्रमांक १ वर म्हणजे १८ असते आणि कोळी समाजातील नगरसेवकांची संख्या क्रमांक २ वर म्हणजे १२ असते. शहरातील एकूण मतदार संख्या लक्षत घेतली तर जळगाव मनपात मराठा नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असायला हवी. पण ती ११ आहे. या तुलनेत ९ मुस्लिम नगरसेवक आहेत.

सन २०१८ च्या मनपा निवडणूकीत भाजप व शिवसेनेकडून उमेदवारी देताना अनेक होतकरु मराठा तरुणांना बाजूला सारले गेले. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन्ही पक्षांची स्थिती निवडणूक लढविण्यासारखी नव्हतीच. त्यामुळे या दोन्ही पक्षात मराठा समाज हाच केडर बेस असलेल्या उमेदवारांचा भ्रमनिरास झाला. भाजप व शिवसेनेतून निवडणून येणार्‍या लेवा पाटील व कोळी समाजातील नगरसेवकांची संख्या कायम राहिली. सन २०१८ च्या मनपा निवडणुकीत प्रभागातील मतदार संख्येपेक्षा ‘रुपये वाटप’ हा घटक महत्त्वाचा ठरला. त्यामुळे ज्या प्रभागात मराठा बहुल मतदार होते तेथेही होतकरु मराठा उमेदवारांचा पराभव झाला. ७५ पैकी भाजप ५७ जागा मिळवून सत्ताधारी ठरला. महापौरपद पहिल्यांदा लेवा पाटील व आमदारांच्या पत्नी सौ.सीमा भोळे यांना मिळाले. दुसर्‍यावेळी कैलास सोनवणे यांच्या पत्नी सौ. भारती सोनवणे यांना मिळाले. तिसर्‍यावेळी भाजपने मराठा उमेदवार दिला. पण पक्ष फुटला. मराठा व महापौर होण्याची संधी हुकली.

मराठा समाजातील सर्व पक्षिय नेत्यांनी, गट-तटाने एकत्र येऊन मराठा खच्चीकरण आणि फरपट यावर चिंतन करण्याची गरज आहे. गावातील गल्लीबोळात आजही मराठा कुटुंबाला गल्लीचा प्रमुख मानले जाते. शहराच्या राजकारणातही सामाजिक संख्येचा विचार केला जातो. मात्र निवडणुकीच्या राजकारणात मराठा प्रभावाचे गणित आता मोडकळीस आले आहे. अर्थात याला काही अंशी घाबरलेले, दबून असलेले प्रस्थापित मराठा नेतृत्व कारणीभूत आहे. अशा नेतृत्वाचे काय करायचे ? हे मराठा समाजानेच ठरवायला हवे…

– दिलीप तिवारी, जेष्ठ पत्रकार 

फ्लिपकार्टच्या कुरियर ऑफिसमध्ये डल्ला, १६ मोबाईल, २ लॅपटॉप लंपास !

0
theft at flipkart's courier office

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या फ्लिपकार्ट कंपनीच्या इंस्टाकार्ड कुरियर सर्व्हिसच्या ऑफिसमध्ये चोरट्याने डल्ला मारला असून ३ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. 

इंस्टाकार्ड (फ्लिपकार्ट) कुरियर सर्व्हिसचे व्यवस्थापक प्रवीण ढिवरे यांनी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. एमआयडीसीतील एम सेक्टरमध्ये असलेल्या ऑफिस शेजारील रिकाम्या गाळयात कुरियरचा माल ठेवण्यात येत असतो. दि.१८ रोजी रात्री ९.३० वाजता सर्व ऑफिस बंद करून घरी निघून गेले. दि.१९ रोजी सकाळी ६.१० वाजता सामान खाली करणारा शांताराम शिंदे हा तरुण आला असता त्याला दरवाजा तुटलेला आणि सामान अस्तावस्त पडलेला दिसला.

त्याने तात्काळ व्यवस्थापकांना कळविले. ऑफिसमधून चोरट्याने १६ मोबाईल आणि २ महागडे लॅपटॉप असा २ लाख ९९ हजार ४२४ रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून एमआयडीसी पोलीस शोध घेत आहे.

कंजरभाट समाज वैकुंठधाम येथे वृक्षांची सर्रास कत्तल !

0
kanjarbhat samaj vaikunthadham

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । जळगाव शहरातील मेहरूण येथील कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीत काही तरुणांनी दिवसाढवळ्या २० ते ३० वर्षाच्या जुन्या ५-६ वृक्षांची कत्तल केली.

वृक्ष तोडण्यासाठी मनपाची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी वृक्षप्रेमी करत आहे.

जळगाव कोरोना अपडेट्स : जळगावात आज ९२१ नवीन कोरोना रुग्ण आढळले

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । जळगावातील कोरोना तांडव सुरूच आहे. आज जळगाव जिल्ह्यात ९२१ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज जळगाव शहरात-२७०, जळगाव ग्रामीण-६३, भुसावळ-३२, अमळनेर-०, चोपडा-१८१, पाचोरा-१९, भडगाव-१२, धरणगाव-६१, यावल-१८, एरंडोल-१२२, जामनेर-६७, रावेर-५, पारोळा-२४, चाळीसगाव-४३, मुक्ताईनगर-२, बोदवड-१आणि इतर जिल्ह्यातून १ असे एकुण ९२१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात एकूण ७५,४१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा परीक्षार्थीसाठी मार्गदर्शक सूचना

0
mpsc state service exam notification

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत राज्य सेवा पुर्व परिक्षा 2020 ही दिनांक 21 मार्च, 2021 रोजी प्रथम सत्र सकाळ 10 ते दुपार 12 व व्दितीय सत्र दुपारी 3 ते सायंकाळी 5 या कालावधीत जळगाव शहरातील 16 उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरीता जिल्ह्यातून 6 हजार 264 परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेकामी जिल्ह्यातील एकूण 489 इतका अधिकारी / कर्मचारी वर्ग यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

परीक्षार्थी यांना सकाळ सत्रासाठी सकाळी 8.30  पासून ते 9.30 पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाईल. उपस्थित सर्व उमेदवारांची तपासणी / झडती (Frisking) केली जाणार आहे.

उमेदवारांना विशेष सुचना

प्रत्येक परीक्षेच्या उमेदवाराने सबंधित परीक्षेचे प्रवेश प्रमाणपत्र ( डाऊनलोड करुन प्रिंट केलेले) आणने सक्तीचे आहे, उमेदवाराच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वत:चे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड व स्मार्टकार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान एक मुळ ओळखपत्र तसेच त्याच्या दोन  छायांकित प्रती सोबत आणणे अनिवार्य आाहे, स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भुत असलेली कोणत्याही प्रकारची साधने, सिमकार्ड, ब्लटुथ, दुरसंचार साधने वापरण्यायोग्य कोणतीही वस्तू तसेच पुस्तके, बॅग्स, पॅड, पाऊच, कॅल्क्युलेटर ई. साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात वापरण्यास सक्त मनाई आहे, आयोगाने परवानगी नाकारलेली कोणत्याही प्रकारचे अनधिकृत साधन/ साहित्य परीक्षेच्या वेळी संबंधित उपकेंद्राच्य मुख्य प्रवेशव्दाराजवळ ठेवावे लागेल व त्या साधन / साहित्याची सुरक्षिततेची जबाबदारी संबंधिताची राहील,  उमेदवाराला स्वत:चा जेवणाचा डबा / अल्पोपहार व पाण्याची बाटली आणण्याची परवानगी आहे. तसेच दोन पेपरच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे.

परीक्षा केंद्रात काळ्या शाईचे बॉल पॉईट पेन, पेन्सिल, प्रवेश प्रमाणपत्र, मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत तसेच ओळखीच्या पुराव्याचे मुळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत अथवा प्रवेश  पत्रावरील सूचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यसह उमेदवाराला परीक्षा कक्षेत प्रवेश देण्यात येईल.

ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा 38 डिग्री सेल्सिअस अथवा 100.4 डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. तसेच सदर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच उमेदवार यांना खालीलप्रमाणे साहित्य पुरविण्यात येणार आहे.

A Besic Covid Kit (bck) – परीक्षेकरीता उपस्थित प्रत्येक उमेदवाराकरीता एक  B. Extra Protective Kit        ( EPK)  – परीक्षेच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त प्रत्येक अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी एक  C. Personal Protective Equipment Kit (ppek)  फक्त कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत असलेल्या उमेदवारांकरीता प्रत्येक 50 उमेदवारामागे 1 या सख्येने तसेच लक्षणे दिसून येत असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या पर्यवेक्षणाकरीता नियुक्त समवेक्षकासाठी 1, परीक्षार्थी यांनी परीक्षेच्या दिवशी प्रवास करतांना  परीक्षेचे हॉल टिकीट सोबत बाळगणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेकरीता नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांनी परीक्षेचे आदेश व शासकीय ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे,

जळगाव शहरात परीक्षेच्या दिवशी परीक्षेकामीचे शाळा / महाविद्यालय सुरु राहतील, तसेच परीक्षार्थीसाठी जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक प्रवासासाठी सुरु राहतील, परीक्षार्थी यांना परीक्षेस सोडणेसाठी त्यांचेसोबत एक व्यक्तीस सुट राहील,

परीक्षा केंद्रावर प्रवेशाच्या आधी प्रत्येक उमेदवाराची थर्मल गनव्दारे तापमान तपासणी घेण्यात येणार आहे. त्याकरीता आयोगामार्फत पुरवठादार संस्था नेमण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी कोरोना विषाणूच्या संदर्भात परीक्षा केंद्रावर आवश्यक ती खबरदारी घेऊन त्यासंदर्भातील नियम पाळणे बंधनकारक आहे. सदर परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदेर्शनास आल्यास त्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे केंद्रप्रमुख महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा 2021 तथा निवासी उपजिल्हाधिकारी, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

शिवसेना विरोधी पक्षनेत्यांसह, महानगराध्यक्षांनी मास्क नसल्याने भरला दंड !

0
shiv sena leader paid the fine for not wearing a mask

जळगाव शहरात मनपा महापौर निवडीप्रसंगी मास्क नसल्याने आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याने महापौर पती तथा मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन व शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी प्रत्येकी ३ हजार रुपये दंड भरला आहे.

सर्वांना कायदा समान असून कुणीही कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन करू नये. तसेच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती ; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

0
jalgaon live news

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्ष शुल्क योजनेचे अर्ज भरण्याकरिता महाडीबीटी हे ऑनलाईन पोर्टल दि. 3 डिसेंबर, 2020 पासून सुरु झाले आहे. तथापि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अद्यापपर्यंत अनु.जाती प्रवर्गाचे 66% तर विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गाचे  69% अर्ज भरण्यात आलेले आहेत.

तरी सर्व  मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज तत्काळ भरण्यात यावेत तसेच महाविद्यालयाच्या लॉग-इन वर प्रलंबित असलेले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयाच्या  लॉग-इन वर त्वरित पाठवावे.

महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी  स्वत: वैयक्तिक लक्ष घालून एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

यावल येथे हरभरा खरेदी केंद्राचे आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते शुभारंभ

0
launch of gram shopping center at yaval

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेड मार्फत हरभरा खरेदी केंद्र शुभारंभ १९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता येथील कृषी उत्पन्न बाजार समीतीत आमदार शिरीष चौधरी, सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील, पं.स. सभापती पल्लवी चौधरी यांचे शुभहस्ते काटापुजन व  धान्य पुजन कार्यक्रम पार पडले. 

याप्रसंगी यावल कृउबा सभापती तुषार उर्फ मुन्ना  पाटील, उपसभापती उमेश प्रभाकर पाटील व संचालक पुंजो डिंगबर पाटील, संचालक सत्तार तडवी, भाजपाचे  तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, मंडळ पंचायत समीती सभापती पल्लवी चौधरी, मसाकाचे माजी जेष्ठसंचालक बारसु नेहते, कृउबाचेसंचालक डॉ . नरेन्द्रकोल्हे आणी खरेदी उपाभिकर्ता विकास कार्यकारी सहकारी सोसायटी कोरपावली चेअरमन राकेश फेगडे.व सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री संस्था संचालक मंडळ, शिवसेनेचे. शरदकोळी, संतोषखर्चे, पप्पु जोशी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव स्वप्नील सोनवणे  यांच्या उपस्थिती होती. 

याप्रसंगी सर्वप्रथम हरभरा विक्रीचा क्रमांक लागलेल्या शेतकरी यांचे आ. शिरीष चौधरी यांच्याहस्ते स्वागत सत्कार करण्यात आले. या प्रसंगी शासन निर्देशीत कोवीड-१९ चे सर्व नियम सर्वाना पाळाण्यात येवुन  हरभराखरेदीचेशुभारंभ करण्यात आले आहेत असे विकास

कार्यकार्यकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी या प्रसंगी सांगीतले. दरम्यान नाफेडच्या हमीभाव हरभरा खरेदी केन्द्र अंतर्गत प्रथम ऑनलाईन १७५३ नोंदणी झालेल्या प्रत्येकी शेतक-याच्या हरभरा खरेदीस प्राधान्य दिले जाणार असुन एका शेतक-याकडुन अधिका अधिकर५क्विटंलहरभराखरेदी करण्यात येणार असल्याची माहीती कोरपावली.विकास सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांनी दिली असुन , शासनाच्या वतीने महाराष्ट्र मार्केटींगफेडरेशनच्या वतीने यावल तालुक्यातुन यंदा एकुण २५  हजार क्विंटल हरभरा खरेदीचा उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती फेगडे यांनी दिली.

राजीव गांधी सानुग्रह अनुदान भोसले यांच्या हस्ते वाटप

0
rajiv gandhi sanugrah grant distributed by bhosale

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । राजीव गांधी विद्यार्थी अपघात  सानुग्रह विमा योजनेअंतर्गत जिल्हाभरातून आलेले जवळपास २२ विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यृ झाला होता यामध्ये पाण्यात बुडून संर्पदंशाने तसेच अपघाताने झालेल्या विद्यार्थांचा समावेश होता तर त्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून 22 विद्यार्थ्यांच्या कुटूंबीयांना एकूण 15 लाख 75 हजार रूपयांचे अनुदानाचा धनादेश वाटप महाराष्ट्र प्रदेश युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांच्या हस्ते सदरील कुटूंबास वाटप करण्यात आला.

जिल्हातील २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील जिल्हाभरातून आलेले जवळपास 21प्रलंबित प्रस्ताव होते तरी संबंधित लाभार्थी जिल्हा परिषद शिक्षण विभागात खेटे मारत होते हे चिञ पहावयास मिळत होते पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अपघाती मृत्यू झाल्यास व अपंगत्व आल्यास राजीव गांधी सानुग्रह विद्यार्थी अपघात सानुग्रह विमा योजनेतून त्यांना ५० ते ७५ हजार रूपये पर्यंत ची आर्थिक मदत दिली जाते या योजनेअंतर्गत जवळपास २1 प्रस्ताव शिक्षण विभागाकडे दाखल झाले होते जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या  बैठकीत २1 प्रकरणे निकाली काढून त्या लाभार्थी यांना आज धनादेश वाटप दिव्या भोसले यांनी केला.