⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
Home | गुन्हे | आशादीप महिला वसतिगृह प्रकरण : खाकीतल्या गिधाडांना कठोर शिक्षा करा

आशादीप महिला वसतिगृह प्रकरण : खाकीतल्या गिधाडांना कठोर शिक्षा करा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ ।  जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. 

याबाबतची तक्रार सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पीडित महिलांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

 

दरम्यान, या घटनेचे पडसाद विधानसभेत देखील उमटले. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून वसतिगृहात मुलींबाबत झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. महिला अधिकाऱ्यांच्या समितीने तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीने तक्रारदार महिलेसह संबधितांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. लवकरच याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात येणार असल्याची माहिती घोडमिसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

 

दरम्यान, भाजप आमदार श्वेता महाले यांनीही याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “जळगावमध्ये अतिशय निंदनीय घटना घडली आहे. जळगावच्या आशादीप वसतिगृहात अशी घटना घडणे खूप चुकीचं आहे. कर्मचाऱ्यांकडून मुलींना कपडे काढून नाचायला सांगतात हे अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. हे कृत्य करायला नकार देणाऱ्या महिलांना मारझोड केली जाते. या आरोपींवर कडक कारवाई करावी आणि सरकारने दखल घ्यावी. आपली सुरक्षा करणाऱ्या लोकांकडून अशी घटना होते ते खूप दुर्दैवी आहे” असं आमदार श्वेता महाले म्हणाल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.