⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024

मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील रस्ते व पुलांसाठी 4.5 कोटींचा निधी मंजूर

0
raksha khadse

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील रस्ते व पुल यासारख्या विविध विकास कामांसाठी रु.४.५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील रखडलेल्या विविध विकास कामांना चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचे निवेदन खासदार रक्षाताई खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना दिले होते.

सदर कामांसाठी नागरिकांकडून वारंवार मागणी करण्यात येत होती व सदर कामांसाठी खासदार रक्षाताई खडसेंचा बऱ्याच दिवसापासुन पाठपुरावा सुरु होता. अखेर खासदारांच्या या मागणीचा राज्यसरकारने सकारात्मक विचार केला असून मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील विकास कामांसाठी निधी मिळाला आहे.

सदर कामांना मंजुरी मिळाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून खासदार रक्षाताई खडसे यांचे आभार मानले आहे. मुक्ताईनगर, रावेर व बोदवड तालुक्यातील मंजूरी मिळालेल्या कामांमध्ये मुक्ताईनगर तालुका अंतर्गत घोडसगाव ते रा.मा-५ जुने कुंड मुक्ताईनगर ते नवी कोथळी ते राज्यमार्ग ६ रस्ता प्रजिमा-२३ किमी ९/१००ते १२/५०० ची सुधारणा करणे व किमी ९/६०० मध्ये आरसीसी बॉक्स सेल मोरीचे बांधकाम करणे कामांसाठी अंदाजित मंजूर किंमत रु.२२५ लक्ष. रावेर तालुका अंतर्गत रा.मा-४५ खिरोदा चिनावल वडगाव निंभोरा बालवाडी तांदलवाडी हतनूर रस्ता रा.मा.-४६ किमी १७/४०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे रु.६० लक्ष. रावेर तालुका अंतर्गत रा.मा.-४५ खिरोदा चिनावल वडगाव निंभोरा बालवाडी तांदलवाडी हतनूर रस्ता रा.मा.-४६ किमी १७/७०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे रु.७० लक्ष आणि बोदवड तालुका अंतर्गत कोल्हाडी निमखेड रा.मा.-२७० ते हरणखेड चिखली मानूर खु. ते रा.मा.-४६ ते शेलवड रास्ता रा.मा.-७५३ एल प्रजिमा-९० किमी ७/०० ते २०/०० ची सुधारणा, रुंदीकरण व हरणखेड गावानजीक संरक्षक भिंत बांधकाम करणे रु.१०० लक्ष इत्यादी विकास कामांचा समावेश आहे. लवकरच या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती खासदार संपर्क कार्यालय मुक्ताईनगर यांचे कडून देण्यात आली आहे.

श्री मंगळदेव ग्रह मंदिरात झाला लघुरुद्र स्वाहाकार

0
laghurudra swahakar took place in shri mangaldev graha mandir

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे सायंकाळी लघुरुद्र स्वाहाकार विधी झाला.  कोरोनामुळे  सहभागीची संख्या बारा ज्योतिर्लिंगाच्या पार्श्वभूमीवर फक्त बारा ठेवण्यात आली होती. 

त्यात विनोद अग्रवाल, हेमंत पवार,विनोद कदम, निलेश साळुंखे, राहुल पाटील,आर. जे. पाटील, कौशल पानसे ,डॉ. जितेंद्र पाटील,डॉ. ज्ञानेश पाटील प्रसन्न पारेख (बंडू जैन)आशिष चौधरी व उमाकांत हिरे यांचा समावेश होता.

सहभागीची संख्या सिमित असली तरी  धार्मिक विधीतील सर्व सोपस्कार , एकूणच भव्यता सजावट व स्वच्छता नेहमीप्रमाणेच अव्वल दर्जाची होती. उपस्थितांनी त्याबाबत खूपच समाधान व्यक्त केले. प्रसाद भण्डारी मुख्य पुरोहित होते .त्यांना मंदिरातील पुजारी

तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य,अक्षय जोशी,गणेश जोशी,भटू पाठकअंकुश जोशी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व सौ. जयश्री साबे आणि सेवेकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

विशेष सुचना : कल्याण-कसारा खंडात १३ व १४ मार्चला रेल्वेचा ब्लॉक, ‘या ‘8 गाड्या रद्द

0
railway block in kalyan kasara section

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-कसारा खंडात शनिवार, रविवारी (दि.१३ व १४) असे दोन दिवस रात्री ट्रॅफिक आणि पाॅवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ८ गाड्या रद्द, तर दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

शनिवारी रात्री २ वाजेपासून सकाळी ७.२५ वाजेपर्यंत तीन स्टेशनवर हा ब्लॉक असेल. त्यात शनिवारी रात्री २.१५ वाजेपासून ते सकाळी ७.१५ पर्यंत खडावली आणि वाशिंद रेल्वे स्टेशनदरम्यान क्रॉसिंग गेट ६१ मध्ये आरएच गर्डरचे काम केले जाईल. पहाटे २.२५ ते सकाळी ७.२५ या वेळेत आसनगाव आणि आटगाव स्टेशनदरम्यान लेव्हल क्राॅसिंग गेटचे आरएच गर्डरचे काम होईल. तर पहाटे २ ते सकाळी ४.३० पर्यंत शहाडमध्ये एफओबीचे गर्डर टाकले जातील. या कामांमुळे ८ विशेष रेल्वे गाड्या रद्द, तर दाेघांच्या मार्गात बदल आहे. याते अनुक्रमे डाउन मुंबई-अदिलाबाद (दि.१२), अप अदिलाबाद-मुंबई (१३ मार्च), डाउन मुंबई-सिकंदराबाद (दि.१४), अप सिकंदराबाद-मुंबई (दि.१३) डाउन मुंबई-नांदेड (दि.१४), अप नांदेड-मुंबई (दि.१३), अप जबलपूर-कोईमतूर (दि.१३) आणि डाउन कोईमतूर- जबलपूर (दि.१५).

कल्याण आणि टिटवाडा दरम्यान आणि निलजे स्टेशनमध्ये मुंबई-हावडा (दि.१४), एलटीटी-प्रयागराज (दि.१४), एलटीटी-गोरखपूर (दि.१४) आणि मडगाव-नागपूर विशेष गाडी १३ मार्चला थांबवण्यात येईल.

मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील अमरावती-मुंबई ही गाडी १३ मार्चला अमरावती स्टेशनपासून तीन तास रि-शे़ड्युलिंग करण्यात येईल. अप गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस १३ मार्चला गाेंदिया स्टेशनपासून ३ तास विलंबाने सुटेल.

अप गोरखपूर-एलटीटी विशेष गाडी गाेरखपूर स्टेशनवरून १२ मार्चला जळगाव-वसई रोड मार्गे एलटीटीला जाईल. हावडा-मुंबई विशेष गाडी हावडा स्टेशनवरून १२ मार्चला जळगाव, वसई रोड मार्गे एलटीटी गाठेल. या दोन्ही गाड्यांना भिवंडी रोड येथे थांबा दिला आहे.

इगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान १ ते ३ तासांपर्यंत थांबवण्यात येईल. यात नागपूर-मडगाव गाडी (दि.१३ मार्च), हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम (दि.१३), फिरोजपूर-सीएसएमटी (दि.१२), नागपूर-सीएसएमटी (दि.१३) या गाड्यांचा समावेश आहे.

खान्देशात तापमानाची चाळीशीकडे वाटचाल

0
temperature in khandesh

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । गेल्या तीन दिवसापासून मराठवाडा आणि लगतच्या भागात निर्माण झालेले चक्रीय वादळ गुरूवारी विरले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात वातावरणात बदल झालेला असून किंचित ढगाळ वातावरणामुळे खान्देशात गेल्या दाेन दिवसात तापमान ३८ अंशापुढे गेले आहे. 

वाढत्या तापमानाची चाळीशीकडे वाटचाल असतांना विदर्भावर मात्र अवकाळी पावसाचे ढग आहेत. येत्या दाेन दिवसात विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस हाेण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविलेला आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वातावरण किंचित ढगाळ हाेते. हे वातावरण शुक्रवारी निवाळेल. दरम्यान, विदर्भावर मात्र पुढील दाेन दिवस अवकाळी पाऊस हाेण्याची शक्यता आहे. १३ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहील. तर जळगाव जिल्ह्यासह खान्देशात तापमानाचा पारा ३९ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे. गुरूवारी जळगावात कमाल तापमान ३८.७ अंश तर किमान तापमान १८ अंशपर्यंत हाेते. तापमानासाेबतच वाऱ्याचा वेग देखील ताशी १० किलाेमिटर पर्यंत वाढू शकताे.

भोगावती नदीपात्रात वरणगावच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

0
the body young man from varangaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । वरणगाव शहरातील नारीमळ्यातील रहिवाशी असलेल्या तरुणाचा भोगावती नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विजय एकनाथ माळी (२८) असे मृत तरुणाचे नाव असून याबाबत अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली.

याबाबत पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नारी मळा येथील चांभारवाड्यातील रहिवाशी विजय माळी हा तरूण मंगळवारी कामावर गेला. परंतु तो बुधवारच्या दुपारपर्यत घरी परत आला नसल्याने त्याची आई वडिलाना काळजी वाटल्याने हरविल्या बाबत पोलीस स्टेशनला खबर देण्यासाठी बस स्थानक चौकात आले होते.

त्यांना ओळखीच्या व्यक्तीकडून तुमचा मुलगा रिक्षात बसुन कामावर जात असल्याचे सागीतल्याने ते घरी परत आले. थोड्यावेळाने मयत विजयचा चुलत भाऊ बळीराम माळी यांच्या मोबाईलवर त्यांच्या मित्राने संपर्क साधुन तुझा भाऊ आठवडे बाजारा जवळील पुलाजवळ मृत अवस्थेत असल्याची खबर मिळताच नातेवायीकाणी घटनास्थळी जाऊन खातरजाम करण्यासाठी गेले असता त्या मृतदेहाच्या शरिरावरील खुणा, उजव्या हातावर विजय नाव असे गोधलेले असल्याने त्याची खात्री झाल्याने मृतदेह शवविच्छेदना साठी ग्रामीण रुग्णालयात नेले.

मयत विजय घरात एकुलता एक मुलगा होता. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला बळीराम विश्वानाथ माळी याच्या खबरीवरूण अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मजहर पाठण, नागेंद्र तायडे हे करीत आहे.

जनता कर्फ्यू सुरु असतांना अडचण असल्यास ‘या’ क्रमांकावर करा संपर्क…

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगावात कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जळगावात ३ दिवसांचा जनता कर्फ्यू सुरु केला आहे. यादरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नियंत्रण कशी सुरु करण्यात आले. आहे.

अत्यंत महत्त्वाचे : जनता कर्फ्यू दरम्यान जळगावात काय राहणार सुरु? काय राहणार बंद? घ्या जाणून

नागिरकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

पोलीस मुख्यालय : 02572223333/2235232

जिल्हाधिकारी कार्यालय : 02572217193/ 2223180

विष प्राशन करून पिता-पुत्राची आत्महत्या ; जळगावातील धक्कादायक घटना

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । जळगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. विष प्राशन करून पिता-पुत्राने आत्महत्या केल्याची घटना आज जळगावातील आदर्शनगरमध्ये घडलीय. दीपक रतीलाल सोनार (वय ६२) व परेश दीपक सोनार (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या पिता-पुत्राचे नाव आहे.

आदर्श नगरात दीपक सोनार हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून ते गत दोन दिवसांपासून त्यांची पत्नी कोरोना बाधीत झाल्यामुळे त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी दीपक सोनार यांची मुलगी व जावई त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी उपचार सुरू असणार्‍या आईची विचारपूस केली. यानंतर सायंकाळी मुलगी पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आली असता दीपक सोनार व त्यांचा मुलगा परेश  यांचे मृतदेह त्यांना आढळून आले.

त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात आणले असता विष प्राशन केल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांनी पंचनामा करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

जळगावात जनता कर्फ्यूला प्रारंभ; काय चालू – बंद राहील हे जाणून घ्या…

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । जळगावात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला आज रात्री ८ वाजेपासून सुरुवात झाली असून यासाठी आखून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. त्यात सर्वाधित रुग्ण हे जळगाव शहरातून आढळून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शुक्रवार, शनिवारी आणि रविवार असे तीन दिवसांचा जनता कॅर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. हा कर्फ्यू दिनांक १५ मार्च रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. या अनुषंगाने आज रात्री आठ वाजेपासून जळगाव शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

ब्रेकिंग : चाळीसगाव आणि चोपड्यात १३ आणि १४ मार्च जनता कर्फ्यू

सर्व निर्बंध जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी असून आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर त्यांची अंमलबजावणी नंतर करण्यात येईल. राज्यातील इतर भागातून होणारी प्रवासी वाहतूक सुरु राहील. टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनाची सेवा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी याचे वाहने आणि परीक्षार्थीं विद्यार्थ्यांसाठी राहील. हॉस्पिटल, ओपीडी व रुग्णवाहिका सेवा सुरु राहतील. सर्व प्रकारची रुग्णालये, औषधांची दुकाने सुरु राहतील. दुध खेरदी-विक्री केंद्रे, कृर्षी, आणि औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीने सुरु राहतील.

पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनासाठी सुरु राहतील. रेल्वे,& विमानसेवा, मालवाहतुक सुरु राहील. तसेच कुरीयर,गॅरेज, वर्कशॉप, वृत्तपत्र, मिडीया सेवा, बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा,पशुखाद्य केंद्रे, पशुवैद्यकीय सेवा सुरु राहतील.

शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी क्लासेस, बाजारपेठेतील दुकाने बंद राहतील.सर्व प्रकारचे हॉटेल बंद राहतील, मात्र पार्सल सेवा सुरु राहील. किरकोळ भाजीपाला आणि फळ विक्री, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय ,खाजगी बांधकामे (मान्सून पूर्व कामे वगळून ) शॉपीग मॉल, मार्केट, किराणा दुकाने तसेच सर्व दुकाने, लिकर शॉप तसेच शॅाप, स्पा, सलून, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, नाट्यगृहे, क्रिडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन,आठवडी बाजार, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

पहिल्या नवऱ्याला घटस्फोट न देता चार मुलांच्या आईने थाटला प्रियकरासोबत संसार

0
yawal police station

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । यावल । चार लहान मुलांच्या आईने पहील्या पतीशी घटस्फोट न घेता प्रियकरासोबत परस्पर संसार थाटल्याची घटना समोर आली आहे. तिच्या पहिल्या नवऱ्याने त्या दोघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, यावल तालुक्यातील नायगाव येथील राहणारे प्यारसिंग भाया बारेला यांची पत्नी बोंदरीबाई बारेला (वय ३८) घरगुती भांडणामुळे आपल्या ४ मुलांना सोडून माहेरी निघून गेली होती. वर्षभरानंतर ते आपल्या पत्नीला घेण्यासाठी सासरी धोपा भगवानपुरा जि. खरगोन (मध्यप्रदेश) येथे गेले. तेव्हा त्यांची पत्नीने भल्या इतू वास्कले या व्यक्ति सोबत लग्न केल्याचे समजले.

यानंतर प्यारसिंग भाया बारेला यांनी पत्नी बोंदरीबाई बारेला व सासरे तुताराम अंकऱ्या बारेला व पत्नीचा दुसरा नवरा भल्या वास्कले या तिघांच्या विरूध्द यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.