जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे सायंकाळी लघुरुद्र स्वाहाकार विधी झाला. कोरोनामुळे सहभागीची संख्या बारा ज्योतिर्लिंगाच्या पार्श्वभूमीवर फक्त बारा ठेवण्यात आली होती.
त्यात विनोद अग्रवाल, हेमंत पवार,विनोद कदम, निलेश साळुंखे, राहुल पाटील,आर. जे. पाटील, कौशल पानसे ,डॉ. जितेंद्र पाटील,डॉ. ज्ञानेश पाटील प्रसन्न पारेख (बंडू जैन)आशिष चौधरी व उमाकांत हिरे यांचा समावेश होता.
सहभागीची संख्या सिमित असली तरी धार्मिक विधीतील सर्व सोपस्कार , एकूणच भव्यता सजावट व स्वच्छता नेहमीप्रमाणेच अव्वल दर्जाची होती. उपस्थितांनी त्याबाबत खूपच समाधान व्यक्त केले. प्रसाद भण्डारी मुख्य पुरोहित होते .त्यांना मंदिरातील पुजारी
तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य,अक्षय जोशी,गणेश जोशी,भटू पाठकअंकुश जोशी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव व सौ. जयश्री साबे आणि सेवेकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.