⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावात जनता कर्फ्यूला प्रारंभ; काय चालू – बंद राहील हे जाणून घ्या…

जळगावात जनता कर्फ्यूला प्रारंभ; काय चालू – बंद राहील हे जाणून घ्या…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । जळगावात शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत असल्याने खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या जनता कर्फ्यूला आज रात्री ८ वाजेपासून सुरुवात झाली असून यासाठी आखून दिलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत वाढ होत आहे. त्यात सर्वाधित रुग्ण हे जळगाव शहरातून आढळून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शुक्रवार, शनिवारी आणि रविवार असे तीन दिवसांचा जनता कॅर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. हा कर्फ्यू दिनांक १५ मार्च रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. या अनुषंगाने आज रात्री आठ वाजेपासून जळगाव शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

ब्रेकिंग : चाळीसगाव आणि चोपड्यात १३ आणि १४ मार्च जनता कर्फ्यू

सर्व निर्बंध जळगाव महानगरपालिका क्षेत्रासाठी असून आवश्यकतेनुसार तालुकास्तरावर त्यांची अंमलबजावणी नंतर करण्यात येईल. राज्यातील इतर भागातून होणारी प्रवासी वाहतूक सुरु राहील. टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनाची सेवा केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवेकरीता तसेच शासकीय, औद्योगिक आस्थापना कर्मचारी याचे वाहने आणि परीक्षार्थीं विद्यार्थ्यांसाठी राहील. हॉस्पिटल, ओपीडी व रुग्णवाहिका सेवा सुरु राहतील. सर्व प्रकारची रुग्णालये, औषधांची दुकाने सुरु राहतील. दुध खेरदी-विक्री केंद्रे, कृर्षी, आणि औद्योगिक आस्थापना सुरु राहतील. शासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थितीने सुरु राहतील.

पेट्रोल पंप केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनासाठी सुरु राहतील. रेल्वे,& विमानसेवा, मालवाहतुक सुरु राहील. तसेच कुरीयर,गॅरेज, वर्कशॉप, वृत्तपत्र, मिडीया सेवा, बँका व वित्तीय संस्था, पोस्टल सेवा,पशुखाद्य केंद्रे, पशुवैद्यकीय सेवा सुरु राहतील.

शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, खाजगी क्लासेस, बाजारपेठेतील दुकाने बंद राहतील.सर्व प्रकारचे हॉटेल बंद राहतील, मात्र पार्सल सेवा सुरु राहील. किरकोळ भाजीपाला आणि फळ विक्री, धार्मिक स्थळे, सभा, मेळावे, बैठका, शासकीय ,खाजगी बांधकामे (मान्सून पूर्व कामे वगळून ) शॉपीग मॉल, मार्केट, किराणा दुकाने तसेच सर्व दुकाने, लिकर शॉप तसेच शॅाप, स्पा, सलून, खाजगी कार्यालये, गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, नाट्यगृहे, क्रिडा स्पर्धा, पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे, प्रदर्शने, मेळावे, संमेलन,आठवडी बाजार, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

author avatar
Tushar Bhambare