⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

आशादीप महिला वसतिगृहाची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करा

0
ashadip women hostel

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ ।  जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात कोणतेही गैरकृत्य घडलेले नसून याबाबत सत्यतेची पडताळणी न करता बदनामी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करा अशी मागणी नऊ संघटनांच्यावतीने जिल्हा दंडाधिकारी डॉ अभिजित राऊत यांच्या कडे करण्यात आली.

जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील आरोप करणारी महिला तिचे मौखिक आरोप, महिला व पुरुष संघटनेने दिलेले निवेदन, यातील तथ्य, सत्यता न तपासता माध्यमाद्वारे ते प्रसिद्ध केले गेले. इतकेच नव्हे तर राज्यातील जबाबदार व्यक्तिमत्व असलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व इतर आमदारांनी कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता अत्यंत बेजबाबदारपणे जळगाव जिल्ह्याला बदनामी करण्याचा दुष्ट हेतूने विधानसभेच्या सभागृहात देखील बेजवाबदारपणाने सत्तारुढ पक्षाला बदनाम करण्यासाठी आरोप केलेले आहेत.

वास्तविक पाहता आरोप करणार्‍या महिला व इतर संघटना किंवा लोकप्रतिनिधींनी वस्तीगृहाच्या अधीक्षकांशी चर्चा केलेली नाही. वस्तीगृहात कोणताही अनैतिक प्रकार घडलेला नाही हे विशेष चौकशी समोर सिद्ध झालेले आहे. परंतु, या खोट्या वृत्तामुळे वस्तीगृहातील सतरा तरुणी, जळगाव शहर महिला बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार व विशेष करून महाराष्ट्र व जळगाव पोलीस दलाची बदनामी झालेली आहे. अशी बदनामी संगनमताने, हेतुपुरस्कर व सरकारला अधिवेशन चालू असल्याकारणाने बदनाम करण्याच्या शुद्ध हेतूने केलेली आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीवर बेदरकारपणे निवेदन देणे, बातम्या पसरवणे ,संगनमताने आरोप करणे व जळगाव जिल्ह्याची बदनामी करून जिल्ह्यातील तरुण-तरुणींचा आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा हेतू दिसून येतो. त्यामुळे संबंधितांवर अत्यंत कडक स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी या नऊ संघटनांनी जिल्हादंडाधिकारी यांच्या कडे केलेली आहे.

जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांची शुक्रवारी संध्याकाळी या  ९ संघटनांच्यातर्फे निवेदिता ताठे ,गजानन मालपुरे व फारुक शेख यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. डॉ. राऊत यांचेशी चर्चा करून त्यांना या नऊ तक्रारी सादर केलेल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांनी याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र विधिमंडळात ४ मार्च २१ ला चौकशीची घोषणा केलेली आहे तसेच पीआरबी कायद्यानुसार  त्यांना असलेल्या अधिकारानुसार काय कारवाई करता येईल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

गजानन पुंडलिक मालपुरे, अध्यक्ष साहेब प्रतिष्ठान व माजी महानगरप्रमुख शिवसेना, निवेदिता ताठे,सदस्य जिल्हा महिला सल्लागार समिती ,फारुक शेख अध्यक्ष जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी ,पंकज किसन नाले अध्यक्ष जनमत प्रतिष्ठान जळगाव, अरुण दीपक पाटील काँग्रेस शहराध्यक्ष जळगाव, कल्पना दिलीप पाटील पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष जळगाव, अंजली पाटील ग्रामपंचायत सदस्य भादली , हर्षाली पांडुरंग पाटील अखिल भारतीय शाहू ब्रिगेड महिला जिल्हाध्यक्ष व अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जिल्हाध्यक्ष जळगाव, सरिता माळी – कोल्हे अखिल भारतीय समता परिषद जिल्हाध्यक्ष जळगाव तथा संस्थापिका साहस फाउंडेशन जळगाव, यांनी वैयक्तिक तक्रारी जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर केलेल्या आहेत.

भडगावात भर दिवसा घरफोडी ; साडेतीन तोळे सोन व रोख दिड लाखाचा ऐवज लंपास

0
burglary in bhadgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । भडगाव शहरातील विवेकानंद नगर भागात अज्ञात चोरट्यांनी साडेतीन तोळे सोन्याच्या बांगडया व दिड लाख रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना काल शुक्रवारी घडली. दरम्यान, या बाबत भडगाव पोलिस स्टशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की भडगांव शहरातील विवेकानंद नगर भागातील रहिवाशी ईश्वर लोटन पाटील (जि.प.शिक्षक) भडगांव हे कुटुंबासह लग्ना निमित्त सकाळी बाहेरगावी गेले होते याचाच फायदा अज्ञात चोरट्यांनी घेत भरदिवसा साडेतीन वाजेच्या सुमारास घराचा समोरील दरवाजा तोडुन घरामध्ये प्रवेश करीत घरातील बेडरूम मधील सामान अस्ता व्यस्त फेकुन शोकेस मधील साडेतीन तोळ्याच्या सोन्याच्या बांगडया व वरच्या बेडरुम मधील कपाटातील तिजोरीतुन दिड लाख रुपये रोख रक्कम चोरुन चोरट्यांनी पोबारा केल्याची माहिती ईश्वर लोटन पाटील (जि.प.शिक्षक) हे घरी आल्यावर उघडकीस आले आहे.

याबाबत पुढील तपास भडगांव पोलिस करीत आहे.घटनास्थळी भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर,पो.उप निरी- आनंद पठारे, सुशिल सोनवणे पो.हे.कॉ. प्रल्हाद शिंदे, पो.ना.लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील यांनी भेट देत घटनास्थळाची पहाणी करत सदर घटनेच्या तपासा कामी श्वान पथकास पाचारन करण्यात येणार असल्याची माहिती भडगांव पोलिसांनी दिली

भडगांव शहरातील बाळदरोड विवेकानंद नगर भाग हा सुशिक्षित व उच्चभ्रू लोकांनची कॉलणी म्हणुन ओळखले जाते त्याच कॉलणीत भरदिवसा एवढी मोठी चोरीची घटना घडली छोटया मोठ्या भुरटया चोऱ्या तर नेहमी होतच असतात पण त्या आरोपीनंचा शोध लागतच नाही पण या बाळद रोड भागात झालेल्या मोठ्या चोरीबाबत आता तरी आरोपीनचा शोध भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर लावतील का? व भडगांव शहरासह तालुक्यातील चोरट्यांना आळा बसेल का? असे भडगांव शहरासह तालुक्यातील सुज्ञ नागरीकांन कडुन बोलले जात आहे त्यामुळे या चोरीचा तपास लावण्याचे भडगांव पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या समोर मोठे आव्हान ठरणार आहे.

भुसावळातील सिंधी कॉलनी भागात सट्टा दुकानावर छापा ! एका विरुद्ध गुन्हा

0
police raid bhusawal

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी भागात सट्टा दुकानावर छापा टाकण्यात आला. यामध्ये एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिनांक ५ मार्च २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गोपनीय महितीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून भुसावळ शहरातील जामनेर रोड वरील सिंधी कॉलनी भागातील आदर्श हायस्कुलच्या पाठीमागे बडा सेवा मंडळ जवळ आरोपी रोहित धर्मेंद्र पारेचाणी वय २७ राहणार सिंधी कॉलनी मधील असून हा लोकांकडून बिट आकडेवर पैसे स्वीकारून टाईम बाजार नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळवितांना १५१० रुपये व सट्टा खेळण्याचे साधनासह मिळून आला म्हणून फिर्यादी पोकॉ सुभाष साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरून ००९६/२०२१ भाग-५ महाराष्ट्र जुगार प्राधिकरण अधिनियम १८८७ कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनला सपोनी धुमाळ, पो ना रवींद्र बिऱ्हाडे,रमण सुरळकर, उमाकांत पाटील, बंटी कापडणे, सुभाष साबळे, प्रशांत परदेशी, अक्षय चव्हाण, किशोर मोरे यांनी केली.

महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर; १८ मार्चला निवडणूक

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । महापालिकेच्या आगामी अडीच वर्षांच्या कालखंडासाठी महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महापौर भारती सोनवणे व उपमहापौर सुनील खडके यांचा कार्यकाळ १७ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे येत्या १८ मार्च रोजी नूतन पदाधिकाऱ्यांची निवडणूक होणार आहे.

अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी ९ ते १६ मार्च या दरम्यान सुटीचे दिवस वगळता सकाळी ११ ते दुपारी १ वाजता नगरसचिवांकडे नामनिर्देशनपत्र घेता येणार आहेत. १७ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. अर्जांची छाननी १८ रोजी विशेष सभा सुरू झाल्यानंतर होईल. छाननीनंतर माघारीसाठी १५ मिनिटे वेळ दिला जाणार आहे. एकाच जागेसाठी जास्त अर्ज आल्यास मतदान घेतले जाईल. महापौर निवडीनंतर उपमहापौरांची निवड होणार आहे.

दरम्यान, एकहाती सत्ता असलेल्या भाजपत महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुकांची गर्दी वाढत आहे. महिला सर्वसाधारण पदासाठी राखीव असलेल्या महापौरपदासाठी दोन्ही नगरसेविकांनी इच्छा व्यक्त केली आहे. तर उपमहापौरपदासाठी इच्छुकांनी नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी बऱ्याच जणांना आश्वासन दिल्याने ऐनवेळी कोणाचे नाव जाहीर होते याकडे लक्ष लागून आहे.

महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ कमी असले तरी भाजपतील अंतर्गत गटबाजीमुळे तापदायक ठरणारी आहे. शिवसेनेकडूनही उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. भाजपत इच्छुकांची गर्दी असल्याने नाराजांची मोट बांधन चमत्कार घडवून आणण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गळाला किती नगरसेवक लागतात याकडे लक्ष लागून आहे.

माजी आ.साहेबराव पाटलांचा ऊर्जा विभागातर्फे प्रशस्तिपत्र देऊन गौरव

0
former mla sahebrao patil honored by energy department

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ ।  अमळनेर येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांचा ऊर्जा विभागातर्फे गौरव करण्यात आला आहे. महावितरणचे सह व्यवस्थापक संचालक डॉ. नरेंद्र गीते यांच्या कडून त्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे. 

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे राजभवन येथील बंगल्यासह ४ कृषी पंपाचे वीज बील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेरच्या महावितरण प्रशासनाजवळ भरले होते. याचाच भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कृषि पंप वीज जोडणी धोरण २०२०मध्ये माजी आमदार साहेबराव पाटील यांना एक जागरूक कृषी पंप वीज ग्राहक म्हणून सहभागी झाल्याबद्दल व वीज देयक थकबाकी भरून महावितरणला सहकार्य केल्याबद्दल सन्मानित करण्यात अाले आहे. त्यानिवडी बद्दल माजी आमदार साहेबराव पाटील यांचे काैतूक करण्यात येत अाहे.

आशादीप महिला वसतिगृह प्रकरण : ‘त्या’ महिलेची पोलिसांना आत्महत्येची धमकी

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । आशादीप वसतिगृहातील प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. या प्रकरणात काही तथ्य नसल्याचे चौकशीतून समोर आले असले तरी हे प्रकरण मात्र शांत होण्याचे नाव घेत नाहीये. यात आता भर म्हणून तक्रार करणाऱ्या ‘त्या’ युवतीने ‘रुग्णालयात दाखल केले तर जीवाचे बरे वाईट करून घेईन’ अशी धमकी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सदर तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असताना तिने फार गोंधळ घालत रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला. तसेच यावेळी तिने पोलिसांना धमकी देत सांगितले कि, जर मला रुग्णालयात दाखल केले तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईल. त्यामुळे तिला पुन्हा वसतिगृहात नेण्यात आले.

तिची मानसिक स्थिती ठिक नसून तिला डॉक्टरांच्या निगरानीत ठेवण्याची आवश्यकता असल्याचे समितीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. त्या अनुषंगाने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याबाबत वसतीगृह प्रशासनाने अधिष्ठातांना पत्र दिले होते. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते.

विकासकामांच्या निधीवरून नगरसेवक व नगरसेविका पतीमध्ये महापौर दालनात धक्काबुक्की

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मार्च २०२१ । महापालिकेतील सत्ताधारी भाजपतील अतंर्गत वाद दिवसेंदिवस वाढतच आहेत. प्रभाग ८ मधील नगरसेवक व नगरसेविका पतीत कामांच्या वाटपावरून हमरीततुमरी झाल्याचा प्रकार महापौर दानात घडला. शाब्दीक बाेलचालीपासून सुरू झालेला वाद थेट धक्काबुक्कीपर्यंत पोहचला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे गटनेते भगत बालाणी आणि नगरसेविकेची पती भरत सपकाळे यांच्यात वाद झाला होता. यानंतर आता नगरसेवक चंद्रशेखर पाटील आणि नगरसेविका प्रतीभा पाटील यांचे पती वसंत पाटील यांच्यात शुक्रवारी महापौरांच्या दालनामध्ये वाद झाला. यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.

गेल्या दाेन महिन्यात नगराेत्थान याेजनेतंर्गत मुलभूत विकास कामांसाठी राज्य शासनाने महापालिकेला निधी मंजूर केला आहे. याअंतर्गत प्रभाग क्रमांक ८मध्ये दीड काेटींचा निधी खर्च केला जाणार आहे. दीड काेटींच्या निधीत ७० टक्के निधी राज्य शासन तर ३० टक्के निधी मनपा खर्च करणार आहे. या निधीतून डाॅ. चंद्रशेखर पाटील यांनी विकास कामांचे नियाेजन केले आहे.

यावरून दोघे नगरसेवकांमध्ये मतभेद आहेत. हा निधी विशिष्ट भागातच खर्च हाेत असल्याने नगरसेविका प्रतिभा पाटील यांचे पती सुधीर पाटील यांनी काही निधी निमखेडी भागात खर्च करण्याची सूचना केली; परंतु निधीचे संपूर्ण नियाेजन स्वत: करणार असल्याचा पवित्रा डाॅ. पाटील यांनी घेतल्याने दाेघांत वाद निर्माण झाले.

लाचेची मागणी भोवली ! सहा हजारांची लाच स्वीकारतांना तंत्रज्ञ व वायरमन जाळ्यात

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । हॉटेलसाठी नवीन वीजेची जोडणी करण्यासाठी सहा हजारांची लाच स्वीकारतांना वीज वितरण कंपनीचा तंत्रज्ञ आणि कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने आज रंगेहात अटक केली. रविंद्र धनसिंग पाटील आणि प्रल्हाद उत्तम सपकाळे या दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे अमोदा खुर्द ता.जि.जळगाव या ठिकाणी स्वतःच्या शेतामध्ये हॉटेल असुन सदर ठिकाणी विज कनेक्शन मिळणेबाबत म.रा.वि.वि.कंपनी कार्यालय, जळगाव येथे अर्ज सादर केलेला होता. यासाठी तक्रारदाराने डिमांड नोट देखील भरलेली होती. मात्र विज कनेक्शन जोडुन देण्यासाठी वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ रविंद्र धनसिंग पाटील आणि कंत्राटी वारयमद प्रल्हाद उत्तम सपकाळे यांनी तक्रारदाराकडे सात हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. चर्चेतून यासाठी सहा हजार रूपये ठरले.

या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यात दोन्ही संशयितांना पंचासमक्ष सहा हजार रूपये स्वीकारतांना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. यानंतर रविंद्र धनसिंग पाटील, (वय-४७, व्यवसाय- वरीष्ठ तंत्रज्ञ, म.रा.वि.वि.कंपनी मर्यादीत सबस्टेशन विदगाव. रा.फुपनगरी, ता.जि.जळगाव. ह.मु.- एमएसईबी कॉलनी, जळगाव) आणि प्रल्हाद उत्तम सपकाळे, (वय-४१, कंत्राटी वायरमन, रा.विदगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एसीबीचे डीवायएसपी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निलेश लोधी, संजोग बच्छाव, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, मपोहेकॉ.शैला धनगर, पोना. मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्‍वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आ.मंगेश चव्हाणांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण यांना कोरोनाची लागण

0

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना वैश्विक महामारीच्या काळातही प्रतिभाताईंनी शिवनेरी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गरजूंना अन्नधान्य वितरण, मास्क वितरण यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. दिवसेंदिवस जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे.