⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

जळगावात एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । जळगावातील रामेश्वर कॉलनीत एका २३ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून गुंगीचे औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. महेंद्र अशोक पाटील (वय २३, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्र हा शहरातील एका रुग्णालयात कामाला होता. शहरातीलच एका तरुणीवर त्याचे प्रेम होते. दरम्यान, तरुणीचा या प्रेमास नकार असल्यामुळे महेंद्र तणावात राहत होता. ५ मार्च रोजी रात्री घरात कुणीच नसताना त्याने गुंगीचे औषध असलेले इंजेक्शन स्वत:ला टोचून घेतले. यामुळे काही मिनिटातच तो बेशुद्ध पडला.

कुटुंबीय घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मध्यरात्री महेंद्रचा मृत्यू झाला, अशी माहिती महेंद्रचे मामा किशोर मोरे (रा. कुसंुबा) यांनी दिली. या प्रकरणी मृत महेंद्रचे भाऊ गजानन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

कळमडू येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

0

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 7 रोजी उघडकीस आली. दरम्यान, याबाबत मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

कळमडू येथील शेतकरी अंकुश विक्रम पाटील (वय 35) यांचा मृतदेह दिनांक 7 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत मिळून आला आहे.

याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

अन्‌ बसचे अचानक झाले ब्रेक फेल ; कार-रिक्षा थोडक्‍यात वाचले

0
parivahan bus break down

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ ।जळगावच्या नवीन बसस्‍थानकातून निघालेल्या बसचे स्वातंत्र्य चौकात अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.

 

जळगाव बस स्थानकावरून सकाळी नऊला जळगाव पाचोरा बस (क्र. एमएच १४ डीजे २१७८) पाचोरा जाण्यासाठी मार्गस्‍थ झाली. मात्र स्वातंत्र चौकात अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे बसचा अपघात होता होता टळला. बसस्‍थानकापासून अवघ्‍या काही अंतरावर असलेल्‍या चौकातच सदर घटना घडली. प्रवाशांनी बस भरलेली असल्‍याने यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता होती.

बसचे ब्रेक फेल झाले त्यावेळी चौकातून दुसऱ्या बाजून एक रिक्षा तर समोरून कार येत होती. ब्रेक लागत नसल्‍याने बस कार किंवा रिक्षाला धडकणार होती. यावेळी चालकाने देखील आरोड्या मारल्‍या. मात्र बस चालक जाकिर पठाण यांनी प्रसंगावधान दाखवून गिअरच्या सहाय्याने वेगात असलेल्या बसवर नियंत्रण मिळविले.

 

ब्रेक फेल झाल्‍याबाबत चालक जाकीर पठाण यांनी घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली. यानंतर जळगाव आगारातील मेकॅनिकल यांनी बसची तात्पुरत्या स्वरूपात सुधारणा केली. ही दुरूस्‍ती केल्‍यानंतर बस पुन्‍हा मार्गस्‍थ करत असताना बसस्‍थानकातून बस निघण्यापुर्वीच बसचे ब्रेक पुन्हा फेल झाले. यामुळे बसस्थानकात गोंधळ निर्माण झाला होता.

 

दोनदा प्रकार घडल्‍याने चालकाने पाचोरा आगाराच्या अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती सांगितली. मात्र अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले नसल्‍याचे चालकाने सांगितले. दोन वेळेस प्रकार घडल्‍याने पठाण यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांनी उपचार करण्यासाठी दवाखान्यात दाखल झाले.

नंदगावचे सचिन खैरनार यांना पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याबद्दल गौरव

0
amlner sachin khairnar

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील मूळ रहिवाशी असलेल्या पोलीस निरिक्षक पदी सचिन मुरलीधर खैरनार यांना पदोन्नती मिळाल्या बद्दल त्यांच्या बालब्रम्हचारी हभप ईश्वरदास महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सचिन खैरनार हे आपल्या तालुक्यातील नंदगाव येथील रहिवासी व अमळनेर येथे स्थायिक असलेले सेवानिवृत्त मंडळ अधिकारी एम एम पाटील यांचे चिरंजीव तर पत्रकार कुंदन खैरनार यांचे भाऊ , सेवाव्रती सचिन खैरनार यांनी सन २००९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक झाले ,२०१० ते १३ चंद्रपूर जिल्यात नक्षलग्रस्त भागात सेवा बजावत असतांना २०१३ ला सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आणि नाशिक क्राईम ब्रँचच्या १ नंबर युनिटला नियुक्तीपर सेवा बजावीत आहेत त्यातच आज पोलीस खात्याअंतर्गत पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचे तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन होत आहे

त्यांचा गौरव करतांना ईश्वरदास महाराज म्हणाले की हा फक्त त्यांचा गौरव नसुन त्या बरोबर आपल्या गावचे देखील यात गौरव होऊन गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सत्कार स्विकारतांना सचिन खैरनार म्हणाले कीं सत्कार होत असतात,होत राहतील परंतु माझ्या गावाने माझ्या घरात जो माझा सत्कार केला जे प्रेम दिले ते माझ्या चिरंतन लक्षात राहीन

आमच्या गावांतील व्यक्ती पोलीस निरीक्षक होतो ही आमच्यासाठी व गावासाठी निश्चित अभिमानाची गोष्ट आहे असे गावांतील जेष्ठ नागरिक अभिमानाने सांगतात. आमच्या पंच क्रोशीत फक्त आमचंच गावं असे आहे की गावातील एकाचं घरातुन तिन जण MPSC स्पर्धा परीक्षा पास होऊन क्लास वन अधिकारी झाले आहेत   असे गावांतील नागरिक अभिमानाने सांगतात सचिन मुरलीधर खैरनार यांचे मोठे बंधु राजेंद्र खैरनार हे देखील MPSC द्वारा  जळगांव जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा अधिकारी वर्ग 1 यापदावर कार्यरत आहेत तसेच त्यांच्या वहिनी ही जळगांव कृषी विभागाच्या कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत

यावेळी गावांतील विविध पदाधीकाऱ्यांन सह जेष्ठ नागरिक उपस्थित  होते यावेळी  रतन पाटिल, शांताराम पाटिल, खुशाल पाटिल,बबन पाटिल,ज्ञानेश्वर पाटिल,मोतीलाल पाटिल,उत्तम पाटिल,धनराज पाटिल,दिपक पाटिल पृथ्वीराज पाटिल,सुरेश पाटिल,अशोक पाटिल  सह गावांतील मान्यवर उपस्थित होते.

कोरोना अपडेट : जिल्ह्यात ५११ कोरोना बाधीत; जळगाव शहरातून सर्वाधिक पॉझिटिव्ह!

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । जिल्ह्यात ५११ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून आजची दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात जिल्ह्यात एकाच कोरोना बाधीताचा मृत्यू झाला आहे.

आजच्या सर्वाधिक २६७ पेशंट हे जळगाव शहरातील आहेत. तर चिंतेची बाब म्हणजे जामनेर तालुक्यात आज दिवसभरात ७८ नवीन कोरोना बाधीत पेशंट आढळून आले आहेत. चोपडा तालुक्यातील रूग्ण संख्या झपाट्याने असून आज या तालुक्यात ३८ पॉझिटीव्ह दिसून आले आहेत.

जळगाव तालुका-१२; भुसावळ तालुका-३१; धरणगाव-१६; एरंडोल-७; यावल-२; रावेर आणि पारोळा-प्रत्येकी ६; मुक्ताईनगर-२१; बोदवड-१४; अमळनेर-१ असे रूग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात एकही पेशंट आढळला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली आहे.

मुरूम वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली ; दोन मजूर जागेवरच ठार

0
tractor's trolley overturned; two laborers killed

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर जवळ मुरूम वाहून नेणार्‍या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने त्याखाली दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडलीय.  

 

याबाबत थोडक्यात असे की, हिरापुर ता. चाळीसगांव येथील रेल्वे स्थानकाजवळील नांदगांव रस्तावर काही मिनिटांपूर्वी मुरूम भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होवुन दोन मजुर दबून ठार झाले असल्याची घटना घडली. येथुन जात असताना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तात्काळ अंबुलन्स बोलावून, ग्रामीण पोलिस निरीक्षक यांना तातडीने जेसीबी घेऊन दबलेल्या मजूरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावयाचे आदेश दिलेत.

 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही जण ट्रॉलीखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी नोंद घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर, या अपघातातील मृतांची ओळख पटविण्यात येत आहे.

शंकरराव नगरातील महिलांनी अवजड वाहन अडवून परतवले

0
the women of shankarrao nagar stopped the heavy vehicle and returned

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । अवजड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीचा होणारा त्रास वाढल्याने शहरातील शंकरराव नगरातील महिलांनी आज परीसातून जाणारे अवजड वाहन अडवून परतवून लावत होणाऱ्या त्रासापासून सुटका करण्याची मागणी केली आहे.

 

शंकरराव नगरात दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. यात खडी, विटा, रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणत असते. यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. तर विद्यार्थ्यांना सततच्या आवाजाने आभ्यास करता येत नसल्याची व्यथा येथील महिलांनी मांडली.

 

याबाबत महापालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून देखील कोणीच याची दखल घेत नसल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. हा रहिवाशी भाग असतांना घरपट्टी भरून देखील महापालिका कोणत्याही प्रकारची सुविधा देत नसून या परिसरात अमृत योजनेचे काम अपूर्ण स्वरुपात ठेवण्यात आल्याचेही या महिलांनी सांगितले. विनिता दुबे यांनी या धुळीच्या त्रासामुळे त्यांची तिन्ही मुले आज देखील आजारी असल्याची व्याथा मांडली.

यावल महसूल पथकाची अवैधरित्या वाळू वाहतुकी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

0
action on tractors transporting sand illegally

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । यावल येथील महसुल पथकाच्या धडक मोहीम कारवाईत येथील नदीपात्रातुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गौण खनिजची वाहतुक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. 

या संदर्भात महसुल सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यात सर्वत्र अवैधरित्या वाळुची सर्रासपणे विविध वाहनातुन वाहतुक करण्यात येत असुन, यावर वचक बसावा म्हणुन यावलचे तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम पथक गठीत केले. या पथकाच्या माध्यमातुन आज दिनांक ७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास यावल शहरालगत असलेल्या हडकाई खडकाई नदीच्या पात्रात विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये ट्रॉली क्रमांक एमएचडब्ल्यु ९०७६ मध्ये बेकायद्याशीररित्या गौण खानिजची वाहतुक करतांना यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी, परसाडे येथील तलाठी समिर तडवी, कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे , तहसीलदारांचे वाहनचालक हिरामण सावळे यांच्या पथकाने कारवाई करीत अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्या  ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे.

दरम्यान अशा प्रकारे महसुल प्रशासनाच्या वतीने होणाऱ्या अवैध मार्गाने वाळु वाहतुक करणाऱ्या माफीयावर झालेल्या कारवाईत सातत्य असणे गरजे असुन तरच या कारभाराला प्रतिबंध करता येईल अशी प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे .

एरंडोल येथे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरू करावे ; आ. चिमणराव पाटलांनी दिल्या सूचना

0
chimanrao patil

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । जिल्ह्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोख वर काढले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एरंडोल येथे कोविड केअर सेंटर तात्काळ सुरू करावे अशी सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी दिली. ६मार्च २०२१ रोजी नगरपालिकेच्या सभागृहात घेतलेल्या बैठकीत केली. 

यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी,नायब तहसिलदार एस.पी.शिरसाठ,मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलिस निरीक्षक द्न्यानेश्वर जाधव,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख, डाॕ.कैलास पाटील,जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील,पंचायत समिती उपसभापती अनिलभाऊ महाजन, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अभिजित पाटील, नगरसेवक चिंतामण पाटील,कुणाल महाजन,योगेश महाजन तसेच राजुभाऊ ठाकुर,जग्गुदादा ठाकुर,कुणाल पाटील,परेशभाऊ बिर्ला,व्यापारी बांधव,शहरातील नागरीक व पत्रकार आदी. उपस्थित होते.

दर बुधवारी एरंडोल शहरात कडकडीत बंद पाळण्यात यावा,नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. तसेच सर्व नागरीकांनी कोरोना रोखण्याच्या लढ्यात सक्रीय योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले.