⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | यावल महसूल पथकाची अवैधरित्या वाळू वाहतुकी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

यावल महसूल पथकाची अवैधरित्या वाळू वाहतुकी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२१ । यावल येथील महसुल पथकाच्या धडक मोहीम कारवाईत येथील नदीपात्रातुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना ट्रॅक्टर पकडून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गौण खनिजची वाहतुक करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. 

या संदर्भात महसुल सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यात सर्वत्र अवैधरित्या वाळुची सर्रासपणे विविध वाहनातुन वाहतुक करण्यात येत असुन, यावर वचक बसावा म्हणुन यावलचे तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धडक मोहीम पथक गठीत केले. या पथकाच्या माध्यमातुन आज दिनांक ७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास यावल शहरालगत असलेल्या हडकाई खडकाई नदीच्या पात्रात विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये ट्रॉली क्रमांक एमएचडब्ल्यु ९०७६ मध्ये बेकायद्याशीररित्या गौण खानिजची वाहतुक करतांना यावल विभागाचे मंडळ अधिकारी शेखर तडवी, परसाडे येथील तलाठी समिर तडवी, कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे , तहसीलदारांचे वाहनचालक हिरामण सावळे यांच्या पथकाने कारवाई करीत अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्या  ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे.

दरम्यान अशा प्रकारे महसुल प्रशासनाच्या वतीने होणाऱ्या अवैध मार्गाने वाळु वाहतुक करणाऱ्या माफीयावर झालेल्या कारवाईत सातत्य असणे गरजे असुन तरच या कारभाराला प्रतिबंध करता येईल अशी प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीकांमध्ये व्यक्त होत आहे .

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.