⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

जळगावातील कोरोनाचा तांडव सुरूच… आज ९७९ नवीन पॉझिटिव्ह… जाणून घ्या तुमच्या गावातील आकडेवारी….

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जनता कर्फ्यू लावून देखील जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्ण कमी होत नाहीये. आज देखील ९७९ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर आजच  ६६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, आज ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यात आता एकुण ७० हजार ६२७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६१ हजार ६०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ७ हजार ५८१ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज ६ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृताच एकूण आकडा १४४४ इतका आहे.

आज जळगाव शहर- ३७६, जळगाव ग्रामीण-११, भुसावळ-१३७, अमळनेर-१६, चोपडा-१०१, पाचोरा-२७, भडगाव-३२, धरणगाव-८२, यावल-१२, एरंडोल-९२, जामनेर-३४, रावेर-१४, पारोळा-०४, चाळीसगाव-१०, मुक्ताईनगर-००, बोदवड-१९ आणि इतर जिल्ह्यातून १२ असे एकुण ९७९ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जळगावकरांनी लवकरात लवकर नियमांचे पालन करून कोरोनाला अटकाव करणे गरजेचे आहे. अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी : रात्रीची संचारबंदी कायम राहणार… काय असतील नियम जाणून घ्या…

0
Collector-Office-Jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकरी अभिजित राउत यांनी जिल्ह्यामध्ये रात्रीच्या संचारबंदीमध्ये पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात 16 मार्चपासून पुढील आदेश येईलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत. मात्र, असे असून

सुद्दा कोरोनाला थोपवण्यात म्हणांव तेवढं यश आलेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील संचारबंदीत वाढ आता 16 मार्चपासून पुढील आदेश येईलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देता येईल. या कालावधीत जर परीक्षा असतील तर त्या घेता येणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरिता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित राहता येईल. अभ्यासिका (लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील.

काय सुरु काय बंद राहणार?

– जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील.
– जिल्ह्यात सर्व आठवडी बाजार बंद राहतील
– अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ २० लोकांनाच उपस्थित राहता येईल.
– लग्न समारंभ व इतर समारंभ दिनांक 20/03/2021 पर्यंतचे पूर्व नियोजित असलेल्या कार्यक्रमांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशन यांचेकडून परवानगी घेण्याच्या व कोविड 19 चे वावतीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अधिन राहून तसेच आयोजक व मंगल कार्यालय/लॉन्स, हॉल्सचे मालक यांनी याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशनकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे अटीवर सकाळी 07.00 ते रात्री 07.00 वाजता या वेळेत घेण्यास परवानगी राहील. दिनांक 20/03/2021 पासून लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजनिक मोकळया ठिकाणी व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
– लग्न समारंभ व इतर समारंभाचे मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करुन घरच्या घरी शास्त्रोक्त/वेदीक पध्दतीने अथवा नोंदणीकृत विवाह पध्दतीने साजरा करण्यात यावेत.नॉंदणीकृत विवाहासाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तीनी उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
– सर्व प्रकारचे सामाजिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सव, समारंभ, यात्रा, दिंडया, ऊरुस व तत्सम धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंदच राहतील,
– सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ 05 लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा या सारख्या विधीकरीता खुली राहतील. सदरची ठिकाणे सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 वाजेपावेतो सुरु राहतीलय
– शनिवार व रविवार या दिवशी पूर्णपणे बंद राहतील.
-सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे. संमेलने यांना बंदी राहील.
– जीम. व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टैंक हे राज्यस्तरीय/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांना वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील. तथापि सामुहिक स्पर्धा /कार्यक्रम बंद राहतील.
– सर्व प्रकारचे सिनेमागृहे, मनोरंजन पार्क्स, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे पूर्णपणे बंद राहतील.
– खाद्यगृहे, परमिट रुम/बार फक्त सकाळी 07.00 ते रात्री 09.00 वाजेपावेतो कोविड-19 चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन 50 टक्के टेबल्स क्षमतेने सुरु राहतील. होम डिलिव्हरी चे किचन /वितरण कक्ष रात्री 10.00 वाजेपावेतो सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
– कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ 50 लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील.
– सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर याबाबीचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच कोविड-19 ची लक्षणे दिसून येणा-या संशयित कर्मचा-यांची कोविड-19 RTPCR चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.

आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर

0
kishor patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाचोरा – भडगाव मतदार संघातील विविध विकास कामांना निधी मिळाला असून यासाठी आमदार किशोर पाटील यांनी पाठपुरावा केला होता. यात १९ ठिकाणी सुमारे १६ कोटी ५० लक्ष रुपयांच्या साठवण बंधारे (सिमेंट बांध) कामांना मंजुरी मिळाली आहे. 

असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने मतदार संघातील सिंचनाला क्षमता वाढण्यास चालना मिळणार आहे. पर्यायाने मतदार संघ सुजलाम सफलाम होण्यास मदत मिळणार आहे. ही कामे मंजुरी साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मिळाल्याने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

या अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या साठवण बंधाऱ्यांच्या कामात नेरी – १ येथे भाऊसाहेब रामराव पाटील यांच्या शेताजवळ, दुसखेडा येथे बाजीराव महाजन व छगन महाजन यांचे शेताजवळ, पिंप्री येथे गावाजवळील विहिरी जवळ, संगमेश्वर येथे वाल्मिक पाटील चुडामन पाटील यांचे शेताजवळ , होळ येथे साठवण बंधारा, सातगाव (डोंगरी) – १ येथे नारायण वाघ, भगवान पाटील यांचे शेता जवळ, सातगाव (डोंगरी) – २ विक्रम आबा, बेबाबाई चुडामन पाटील यांचे शेता जवळ, सातगाव (डोंगरी) – ३ येथे तुकाराम मोटे, भास्कर लुकडू यांचे शेता जवळ, भडगाव येथे खारे नाल्याजवळ, गुढे येथे जगन्नाथ फकिरा पाटील यांचे शेताजवळ, खाजोळा – २  येथे गोरख पाटील, भाऊसाहेब पाटील यांचे शेताजवळ, खाजोळा – ३ येथे नंदू सूर्यवंशी, शांताराम पाटील यांचे शेता जवळ, चिंचखेडा खु” येथे गोपीचंद पाटील, बापू देशमुख यांचे शेताजवळ, नगरदेवळा १ – येथे सुनील काटकर, अण्णा पाटील यांचे शेता जवळ, नगरदेवळा – २ मनीष डगवाले, विजय बोरसे यांचे शेताजवळ, टाकळी बु” – २ येथे भाचा कोळी, दिलीप मटरे यांचे शेता जवळ, पाचोरा येथे  रामचंद्र चौधरी, धनराज चौधरी यांचे शेता जवळ, वडगाव टेक – १ येथे व वडगांव टेक – २ येथे कोकिळाबाई पाटील, प्रमोद पाटील यांच्या शेता जवळील या साठवण बंधाऱ्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

पत्नीच्या अंगावर टाकले उकळते पाणी; शासकीय रुग्णालयात उपचार सुरु

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ ।  जळगाव शहरातील दुधफेडरेशनच्या मागील बाजूस असलेल्या राजमालतीनगरमध्ये पतीनेच पत्नीच्या अंगावर उकळते पाणी टाकल्याची धक्कादायक घटना आज रविवारी सकाळी घडली. या घटनेत फरजानाबी शेख जाबीर (वय ४२) महिला भाजल्याने तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी फरजानाबी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, राजमालतीनगरातील प्लॉट नं. ७ येथे फरजानाबी, पती जाबीर शेख, मुल अश्पाक व शोएब अशांसह वास्तव्यास आहेत. पती जाबीर सुपारी फोडण्याचे काम करतात तर फरजाना या धुणीभांडी करुन संसाराला हातभार लावतात. आज रविवार (ता.१४) सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे मुलं व पतीसाठी नाष्टा व स्वयंपाकासाठी फरजाना कणीक मळत होत्या, त्याच वेळेस पती जाबीरशेख अंघोळीला जाणार असल्याने बाथरुम मध्येच बादलीत हिटर लावुन पाणी तापवण्यात येत  होते.

बादलीतील पाणी उकळल्यावर पती जाबीर याने काहीएक न बोलता  उकळत्या पाण्याची बादली उचलून फरजाना यांच्या अंगावर उलटी केली. अचानक अंगावर उकळते पाणी पडल्याने किंचाळ्या मारतच फरजाना धावत सुटल्या.  दोघा मुलांनी मदतीला धाव घेतल्यावर जाबीर यांनी दोघा मुलांना मारहाण केली. जावाई गुलाब शेख व दोघा मुलांनी जखमी फरजाना यांना जखमी अवस्थेत जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले असुन त्यांच्या जबाबावरुन पती जाबीर यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

फातेमा नगरात भांडणप्रकरणी परस्परविरुद्ध गुन्हे दाखल!

0

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । शहरातील फातेमा नगरात शनिवारी रात्री झालेल्या हाणामारीप्रकरणी एमआयडीसी पोलिसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटातील संशयितांना ताब्यात घेतले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.

पहिल्या तक्रारीनुसार सतिष सुनील पाटील रा.इंदिरानगर यांच्या फिर्यादीवरून रेहान सालार, साजिद सालार, आमीर सालार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या तक्रारीनुसार रेहान सालार यांच्या फिर्यादीवरून ५ ते ६ अनोळखी लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

अहमदाबाद येथून मुलीला पळविणारा जळगावात जेरबंद!

0
mayur patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून एका मुलीला पळवून जळगावात राहत असलेल्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

लाम्सब्रीज पोलीस ठाणे अहमदाबाद येथे दाखल असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यातील तरुण पळवून आणलेल्या मुलीला घेऊन एमआयडीसी परिसरात राहत होता. लाम्सब्रीज पो.स्टे.चे सहाय्यक फौजदार अजय कुमार, हवालदार प्रभातसिंग आणि दोन महिला कर्मचारी रविवारी सकाळी एमआयडीसी पोलिसात आले होते. एमआयडीसी पो.स्टे.चे निरीक्षक प्रताप शिकारे यांची त्यांनी भेट घेतली असता उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील आणि कर्मचारी गोविंदा पाटील यांना त्यांनी पथकासह रवाना केले. पथकाने जगवानी नगर, अयोध्या नगर, एमआयडीसी परिसरासह इतर नगरात याबाबत तपास केला. दाखल गुन्ह्यातील आरोपी मयूर अशोक पाटील रा.जळगाव हा एफ-६३ शाईन मेटल्स कंपनीत राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने चौकशी करून मयूर पाटील यास पळवून आणलेल्या मुलीसह ताब्यात घेतले. दोघांना अहमदाबाद पोलिसांच्या स्वाधीन करून रवाना करण्यात आले आहे.

धक्कादायक ! पाळधीच्या युवकाची वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या

0
crime

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द येथील युवकाने वाढदिवसाच्या दिवशीच रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सचिन अशोक देवरे (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे.

सचिन देवरे या युवकाचा १२ मार्च रोजी वाढदिवस होता. सायंकाळी ७ वाजेपासून तो घराबाहेर गेला होता. कुटुंबीयांना वाटले की ताे त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मित्रांसाेबत गेला असेल. पण रात्री उशिर झाला तरी तो घरी का आला नाही? या चिंतेने ग्रासलेल्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. रात्री साडेबारा वाजता त्याचा मृतदेह येथील रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाजवळच्या रेल्वे रूळांजवळ आढळून आला. रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेला.

घटनेची माहिती गावात पसरताच रात्रीच घटनास्थळी गर्दी झाली होती. प्रथमदर्शी ही घटना आत्महत्या वाटत असली तरी पोलिस विविध अंगाने तपास करीत आहेत. मृत सचिन पश्चात आई-वडील असा परिवार आहे.

देवदर्शन करून घरी परतणाऱ्या पिता-पुत्रावर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू

0
accident

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । फैजपूर-भुसावळ रस्त्यावरील पिंपरूड फाट्याजवळ देवदर्शन करून मोटरसायकलवर घराकडे परतणाऱ्या पिता पुत्राचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली. गोपाळ गेंदराज पाटील (६६) ,खेमचंद गोपाळ पाटील (३३, गुरुदत्त कॉलनी) असे अपघातात ठार झालेल्या पिता पुत्राचे नावे आहेत.

याबाबत असे की, गोपाळ पाटील व त्यांचा मोठा मुलगा खेमचंद पाटील हे दोघे दर अमावस्येच्या दिवशी चिखली येथील शेतात दिवा लावणे व पूजेसाठी जायचे. त्यानुसार शनिवारी अमावस्या असल्याने दोघे सकाळीच दुचाकीने चिखली येथील शेतात गेले. तेथील पूजाविधी आटोपला. यानंतर ते दुचाकीने (एमएच १९ डीबी ५४४२)ने फैजपूरकडे परतत असताना पिंपरुड फाट्यावरील सोनम एंटरप्राइजेस जवळ आमोद्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गोपाळ पाटील हे जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा खेमचंद पाटील हा गंभीर जखमी झाला. खेमचंद पाटील यांना उपचारासाठी जळगाव येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे व त्यांचे सहकारी अपघात ग्रस्त ठिकाणी भेट देऊन चौकशी केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसांत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, अपघातात पिता-पुत्र ठार झाल्याने फैजपुरात शोककळा पसरली. खेमचंद पाटील यांच्या पश्चात आई, लहान भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे. वडील आणि मुलावर सायंकाळी फैजपूर येथे अंत्यसंस्कार झाले.

जनता कर्फ्यूमुळे सुवर्णनगरीतील सुवर्ण व्यवसायाला करोडोंचा फटका

0
gold

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव शहरात कोरोनाची रुग्ण संख्या अचानक मोठ्या प्रमाणत वाढत असतानाच वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.  मात्र जनता कर्फ्यूमुळे बाजारपेठेवर परिणाम झाला असून सुवर्णनगरीत १०० ते १२५ कोटींच्या सुवर्ण व्यवसायातील उलाढाल ठप्प झाली आहे. 

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. १५ मार्चला सकाळी ८ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू लागू असणार आहे.

जनता कर्फ्युची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने व्यापारी बांधवांनीही करोडो रुपयांच्या उलाढालीचा विचार न करता आपली दुकाने बंद ठेवली. यात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल थांबली आहे. जळगाव शहर हे सोने व चांदी, धान्य, डाळींच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. शहरात दररोज बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार होत असतात.