⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | कोरोना | मोठी बातमी : रात्रीची संचारबंदी कायम राहणार… काय असतील नियम जाणून घ्या…

मोठी बातमी : रात्रीची संचारबंदी कायम राहणार… काय असतील नियम जाणून घ्या…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकरी अभिजित राउत यांनी जिल्ह्यामध्ये रात्रीच्या संचारबंदीमध्ये पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात 16 मार्चपासून पुढील आदेश येईलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत. मात्र, असे असून

सुद्दा कोरोनाला थोपवण्यात म्हणांव तेवढं यश आलेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यातील संचारबंदीत वाढ आता 16 मार्चपासून पुढील आदेश येईलपर्यंत रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देता येईल. या कालावधीत जर परीक्षा असतील तर त्या घेता येणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरिता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित राहता येईल. अभ्यासिका (लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील.

काय सुरु काय बंद राहणार?

– जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहतील.
– जिल्ह्यात सर्व आठवडी बाजार बंद राहतील
– अंत्यविधी कार्यक्रमासाठी केवळ २० लोकांनाच उपस्थित राहता येईल.
– लग्न समारंभ व इतर समारंभ दिनांक 20/03/2021 पर्यंतचे पूर्व नियोजित असलेल्या कार्यक्रमांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशन यांचेकडून परवानगी घेण्याच्या व कोविड 19 चे वावतीत सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे अधिन राहून तसेच आयोजक व मंगल कार्यालय/लॉन्स, हॉल्सचे मालक यांनी याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस स्टेशनकडे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे अटीवर सकाळी 07.00 ते रात्री 07.00 वाजता या वेळेत घेण्यास परवानगी राहील. दिनांक 20/03/2021 पासून लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल्स, सार्वजनिक मोकळया ठिकाणी व अन्य तत्सम ठिकाणी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम आयोजित करणे पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत आहे.
– लग्न समारंभ व इतर समारंभाचे मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत कोविड नियमावलींचे पालन करुन घरच्या घरी शास्त्रोक्त/वेदीक पध्दतीने अथवा नोंदणीकृत विवाह पध्दतीने साजरा करण्यात यावेत.नॉंदणीकृत विवाहासाठी जास्तीत जास्त 20 व्यक्तीनी उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
– सर्व प्रकारचे सामाजिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम तसेच उत्सव, समारंभ, यात्रा, दिंडया, ऊरुस व तत्सम धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंदच राहतील,
– सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळेस केवळ 05 लोकांच्या मर्यादेच्या उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा या सारख्या विधीकरीता खुली राहतील. सदरची ठिकाणे सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 वाजेपावेतो सुरु राहतीलय
– शनिवार व रविवार या दिवशी पूर्णपणे बंद राहतील.
-सर्व प्रकारच्या क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे. संमेलने यांना बंदी राहील.
– जीम. व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, स्विमिंग टैंक हे राज्यस्तरीय/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांना वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील. तथापि सामुहिक स्पर्धा /कार्यक्रम बंद राहतील.
– सर्व प्रकारचे सिनेमागृहे, मनोरंजन पार्क्स, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे पूर्णपणे बंद राहतील.
– खाद्यगृहे, परमिट रुम/बार फक्त सकाळी 07.00 ते रात्री 09.00 वाजेपावेतो कोविड-19 चे मार्गदर्शक तत्वांचे यथोचित पालन करुन 50 टक्के टेबल्स क्षमतेने सुरु राहतील. होम डिलिव्हरी चे किचन /वितरण कक्ष रात्री 10.00 वाजेपावेतो सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
– कायद्याव्दारे बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ 50 लोकांचे उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील.
– सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करुन घेणे, त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सींग, मास्कचा वापर याबाबीचे पालन करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच कोविड-19 ची लक्षणे दिसून येणा-या संशयित कर्मचा-यांची कोविड-19 RTPCR चाचणी करुन घेण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील.

author avatar
Tushar Bhambare