⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024

पतसंस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी.किंवा ओएव्हिएमद्वारे घ्याव्यात

0
jalgaon live news

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आदेशाप्रमाणे अपर निबंधक (पतसंस्था) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.सी.किंवा ओएव्हिएमद्वारे तात्काळ घेण्याबाबत राज्यातील पतसंस्थांच्या सर्व जिल्हा सहकारी फेडरेशन यांना कळविले आहे. 

जिल्ह्यातील सर्व नागरी / ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना आणि पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था त्याचप्रमाणे उर्वरीत सर्व सहकारी संस्थांनी  सन 2020-21 या वर्षातील त्यांची वार्षिक सर्वसाधारण सभा 31 मार्च, 2021 च्या आत घ्यावी. वार्षिक सर्वसाधारण सभेत शासनाने आदेशीत केलेल्या अनुसरावयाच्या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करावी. असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संतोष बिडवई यांनी कळविले आहे.

Jalgaon Corona Update : आज जिल्ह्यात ९२३ कोरोना बाधित आढळले

0
corona-updates

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जळगाव जिल्ह्यात ९२३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहरात सर्वाधिक २६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  यामुळे शहरातील नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. आज जळगाव ग्रामीण-४५, भुसावळ-४७, अमळनेर-४२, चोपडा-१९४, पाचोरा-१६, भडगाव-२९, धरणगाव-८१, यावल-३२, एरंडोल-६२, जामनेर-३२, रावेर-८, पारोळा-३८, चाळीसगाव-०, मुक्ताईनगर-३, बोदवड-२१आणि इतर जिल्ह्यातून ४ असे एकुण ९२३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात एकूण ७४,४९४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

महापौर निवडीवरून सोशल मीडियात गिरीश महाजनांची खिल्ली!

0
girish mahajan viral memes

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर मनपात भाजपचे स्पष्ट बहुमत असताना देखील शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या आहेत. भाजपचे नगरसेवक फुटल्याने सोशल मीडियात कमेंटचा पाऊस पडत असून भाजपची खिल्ली उडवली जात आहे.

gm meme
कट्यार काळजात घुसली चित्रपटाचे एडिट केलेलं बॅनर

भाजपचे जिल्ह्याचे नेते आ.गिरीष महाजन आणि भाजपवर अनेक मेसेज फिरत असून पक्षाची आणि स्थानिक नेतृत्वाची खिल्ली उडवली जात आहे. तसेच शिवसेना कशी प्रबळ आहे हे दाखविणारे संदेश देखील सोशल मीडियात फिरत आहे.

piyush on gm 1 gm mems gm memes piyush on gm

कर्माची फळे म्हणून गिरीश महाजन जळगाव मनपातून बाहेर; ॲड. विजय पाटलांची बोचरी टीका

0
vijay patil girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । शहर महापालिकेत सन 2018 मध्ये गिरीश महाजन यांनी सुमारे 20 ते 25 कोटी रुपये खर्च करून भारतीय जनता पार्टीचे 57 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेले नगरसेवक यांचा देखील त्यावेळी घोडेबाजार करून व आर्थिक रसद घेऊन ऐन वेळी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आली होती. पाच वर्षासाठी जळगावच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला शहराची धुरा सांभाळण्यास दिलेली असताना फक्त अडीच वर्षांमध्ये भाजपाची महानगरपालिकेतील पूर्ण बहुमताची सत्ता गेल्याने गिरीश महाजन यांना आज कसे वाटत असेल असा विचार आमच्या मनात आला. गिरीश महाजन यांनी केलेल्या कर्माची फळे त्यांना मिळत असून त्यामुळेच मनपा बाहेर गेले अशी बोचरी टिका ऍड.विजय भास्करराव पाटील यांनी केली आहे.

गिरीश महाजन मंत्री असताना त्यांना सत्तेचा माज असल्याने जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सन 2015 ते 2020 या कालावधीसाठी आमचे संचालक मंडळ कायदेशीर निवडून आलेले असताना सत्तेच्या मस्तीत पोटी महाजन यांनी आमच्या संस्थेत त्यांना कै.नरेंद्र अण्णा पाटील यांचे विचारांचे संचालक मंडळ असल्याने तेथे त्यांना आर्थिक घोडेबाजार करता येत नसल्याने त्यांनी आम्हाला अडीच वर्षातच संस्थेतून पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले.

परंतु काळाने आज की माझ्या मनातील अडीच वर्षातच जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून धडा शिकवून त्यांची सत्तेची मस्ती केलेल्या कर्माचे फळ म्हणून आज त्यांना महानगरपालिकेतून बाहेर काढलेले आहे ही त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचे फळ भरण्याची सुरुवात झालेली आहे व यापुढे देखील त्यांना वेळोवेळी केलेल्या कर्माची फळे भोगावी लागणार आहे हे येत्या काळात संपूर्ण जळगाव वासियांना तसेच संपूर्ण महाराष्ट्राला कळेलच तरी शेवटी काळ हा नेहमिच श्रेष्ठ असतो हे आज पुन्हा सिद्ध झालेले आहे, असे ॲड.विजय भास्करराव पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 हे देखील वाचा : 

..हा पराजय गिरीश महाजनांच्या गर्विष्ठपणाचा ; खडसेंची जोरदार टीका

गिरीषभाऊ… महापौर बदलाचा जुगार खेळू नका !

वीज कनेक्शन तोडणी थांबवून कनेक्शन पुर्वरत करा अन्यथा वसुलीला फिरू देणार नाहीत

0
erandol

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । वीज कनेक्शन तोडणी थांबवून कनेक्शन पुर्वरत करा अन्यथा वसुलीला फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे प्रांताधिकारी, तहसिलदार, वीज अभियंता यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

 

राज्यात मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात नागरीक, शेतकर्‍यांना अव्वाच्या सव्वा वीजबिले विजवितरणतर्फे देण्यात आली. हे वीजबिल भरा अन्यथा कनेक्शन खंडीत करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार वीजपुरवठा खंडीत करण्यात आल्याने शेतकरी, शेतमजूर आणि छोटे व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वीज कनेक्शन तोडणी थांबवून कनेक्शन पुर्वरत करा अन्यथा वसुलीला फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षातर्फे प्रांताधिकारी, तहसिलदार, वीज अभियंता यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, लहरी हवामान, शेतमालाचे ढासळलेले बाजारभाव, कोरोनामुळे संकटात आलेले अर्थकारण यामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, छोटे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच महावितरण कंपनीने अंदाजे भरमसाठ वीजबिले आकारल्याने थकबाकी वाढलेली आहे. तसेच विधिमंडळ अधिवेशन काळात महाविकास आघाडी सरकारने ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडीत करणार नसल्याचे आश्वासन दिले होते.

परंतू सरकारने घुमजाव करीत ग्राहकांचा विश्वासघात केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  वीज कनेक्शन खंडीत झाल्यामुळे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही परिणाम पिके वाळली असून शेतकर्‍यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीज कनेक्शन पूर्ववत करावे अन्यथा वीज वितरण कर्मचार्‍यांना वसुलीसाठी फिरू देणार नसल्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर रासप तालूकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, डॉ. पी. जी. पळशीकर, आदिवासी संघटक तालुकाध्यक्ष विनोद मालचे, सरचिटणीस गोपाल महाजन रिंगणगांव आदींच्या सह्या आहेत.

पाचोरा-भडगावात १९ ते २१ मार्चदरम्यान निर्बंध ; काय असतील नियम जाणून घ्या

0
jalgaon live news

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । पाचोरा व भडगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून या वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी १९ ते २१ मार्चदरम्यान पाचोरा व भडगाव नगरपालिका हद्दीत निर्बंध लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी आज काढले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढता आहे. मागील काही दिवसापासून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाचोरा आणि भडगाव नगरपालिका हद्दीत १९ मार्च ते २१ मार्च दरम्यान निर्बंध लागू करण्यात आले आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी असे आदेश आज सकाळी काढले.

काय सुरु काय बंद? 

– सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद राहतील.

-किराणा दुकाने इतर सर्व दुकाने बंद राहतील,

–  किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री केंद्र बंद राहतील.

– शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद राहतील.

–  सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळे, सांस्कृतीक, धार्मीक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील.

– शॉपींग मॉल्स, मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलुन, लिकर शॉप बंद राहतील.

– गार्डन, पार्क, बगीचे, सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव,  प्रेक्षणगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलने बंद राहतील.

-पानटपरी, हातगाड्या, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीचे ठिकाणे बंद राहतील.

या व्यतिरिक्त दुध विक्री केंद्रे, वैद्यकीय उपचार, सेवा मेडीकल स्टोअर्स, ॲम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटना यांना सुट देण्यात आली आहे. तसचे २१ मार्च रोजी होणारे पुर्व नियोजित परिक्षा असल्याने परीक्षेच्या कालावधीत परिक्षार्थी व परिक्षेकरीत नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांना निर्बंधातून सुट राहणार आहे. दरम्यान नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश  प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी काढले आहे.

खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा प्लॅन; जाणून घ्या काय होता प्लॅन?

0
eknatharao khadse

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव महापालिकेत शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका दिला आहे. निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली.

दरम्यानं, जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाची एकहाती सत्ता असून देखील भाजपाला पराभवाची धूळ चारण्याचा सगळा प्लॅन गेल्या १० दिवसांत जुळून आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. तसेच, या प्लॅनबद्दल फारसं कुणाला काही माहिती नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

असा ठरला सगळा प्लॅन?

“१० दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करू शकेन. नुसतं आवाहन केलं, तर नगरसेवक जमू शकतात. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली. त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटूनही गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले २२ होते, शिवसेनेचे १५ होते आणि एमआयएमचे ३ आमच्याकडे आलेच होते”, असं खडसेंनी सांगितलं.

ठेकेदार पद्धतीने भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यावर नगरसेवक नाराज होते. त्यामुळे नाराज नगरसेवक एकत्र आले. सर्व शिवसेनेकडे गेल्यानंतर बाकिच्या लोकांच्या मदतीने आज शिवसेनेचा महापौर झाला. शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत. तर बाकीचे बंडखोर आहेत”, असं खडसे म्हणाले.

दुदैवी ! कुलरचा शॉक लागू दोन चिमुकल्यांचा मृत्यू

0
two children die of cooler shock

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । चाळीसगाव शहरातील मेहतर कॉलणी घराबाहेर असलेल्या कुलरचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान घडलीय. 

राणू विकी गोयल (वय- ३ वर्ष) व रोहन राकेश गोयल (वय- ३ वर्ष) असे मृत चिमुकल्यांचे नावे आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

राणू आणि रोहन हे दोघेही घरासमोर खेळत होते. या दरम्यान, कुलर बाहेर चालू असताना अचानक कुलरचा शॉक बसला व त्यातच दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. हि घटना दुपारी १२.३० च्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने वडील विकी गोयल व राकेश गोयल दोघेही खासगी दवाखान्यात साफसफाईचे काम करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. मात्र हे अपघात घडल्याने दोघांवर डोंगरच कोसळला आहे.

..हा पराजय गिरीश महाजनांच्या गर्विष्ठपणाचा ; खडसेंची जोरदार टीका

0
eknath khadse girish mahajan

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत महापालिकेवर भगवा फडकाविला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला.  दरम्यान, या विजयानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपचे संकटमोचक आ. गिरीश महाजनवर टीकास्त्र सोडले आहे.

जळगावच्या जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली होती. मात्र त्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. यामुळे नगरसेवक आधीच नाराज होते. त्यांना फोडण्यासाठी फार काही प्रयत्न करावे लागले नाहीत. तर हा पराजय गिरीश महाजन यांच्या गर्विष्ठपणाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाजन यांनी जळगावकरांना भूलथापा दिल्या. त्यांनी दोन-चार कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कामे करण्याचा प्रयत्न पूर्ण झाला नाही. शहरातील अनेक कामे प्रलंबीत आहेत. यातच ते नगरसेवकांशी अतिशय गर्विष्ठपणे बोलत असल्याचा भाजपला फटका बसल्याचे खडसे म्हणाले.