⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024

रुग्णालयाची तोडफोड करून नुकसान करणारा आरोपी जेरबंद

0
accused arrested for vandalizing hospital

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील पंचशील नगरातील तरुणांचा लॉकडाउन दरम्यान झालेल्या मारहाणीत डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने जखमी तरुणास डॉ.मानवतकर यांच्या  रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान त्या तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पंचशील नगरातील एका तरुणाने डॉक्टरांच्या दवाखान्याचे नुकसान केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दिनांक १८ मार्च रोजी जेरबंद करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की,फिर्यादी डॉ.राजेश मानवतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दवाखान्याची तोडफोड करून नुकसान करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या गुन्ह्यातील फरार आरोपी समीर शेख जाकीर शेख वय 31वर्षे राहणार पंचशील नगर भुसावळ हा’ त्या ‘ रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने दवाखान्यातील काच व काउंटर तोडफोड करून फरार झाला होता . त्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गु रं न 896/2020 महाराष्ट्र राज्य पोलीस वैद्यकीय सेवा बाबत घडणाऱ्या हिसंक कृत्यांना प्रतिबंधक तसेच अधिनियम 2010 चे कलम 4 प्रमाणे भादवी कलम 427,504 प्रमाणे गुन्ह्या दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीस गुरुवार दिनांक  १८ मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस  जेरबंद करण्यात आले आहे.

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,सपोनि मंगेश गोंटला, अनिल मोरे,गणेश धुमाळ,पोकॉ.गजानन वाघ, सुभाष साबळे,रवी तायडे,योगेश महाजन अशांनी  केलीआहे .

धक्कादायक : अंगावरील दागिन्यांसाठी नातेवाइकांनी उघडले मृतदेहाचे PPE किट

0
relatives opened ppe kit for jewelry on the body

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । कोरोनामुळे मृत झालेल्या महिलेच्या अंगावरील दागिने काढण्यासाठी नातेवाइकांनी थेट मृतदेहाचे पीपीई किट उघडून कटरच्या साह्याने अंगावरील दागिने काढले. या प्रकारामुळे संबंधित नातेवाइकाला अनेकांच्या संतापाचे शिकार बनावे लागले; पण त्याने निगरगठ्ठपणे हा सर्व प्रकार सहन करून दागिने ताब्यात घेतले.

शहरातील एका ६५ वर्षीय वृद्धेचा गुरुवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनगृहात पाठवण्यात आला. दुपारपर्यंत वृद्धेचे अनेक नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी घरी, रुग्णालयात पोहाेचले. दरम्यान, वृद्धेच्या अंगावर काही चांदीचे दागिने होते. शवविच्छेदन गृहातील कर्मचाऱ्यांनी ही बाब तिच्या कुटंुबीय, नातेवाइकांच्या लक्षात आणून दिली; परंतु, आता वृद्धेचा मृत्यू झालेला असल्यामुळे तिच्या अंगावरील दागिने तिच्या सोबतच जाऊ द्या, असा निर्णय कुटंुबातील काही सदस्यांनी घेतला. त्यानुसार काही वेळातच वृद्धेच्या मृतदेहावर पीपीई किट चढवला. त्यानंतर मृतदेह पूर्णपणे बंदिस्त करून नेरीनाका येथील स्मशानभूमीत नेण्यात आला.

माेजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार सुरू होणार तेवढ्यात वृद्धेचा एक जवळचा नातेवाईक स्मशानभूमीत पोहोचला. त्याने वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांच्या विषयावरून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे उपस्थितांनीदेखील आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, या नातेवाइकाने थेट पीपीई किटमधून वृद्धेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर कटर मागवून वृद्धेच्या अंगावरील दागिने कटरने ओरबाडून बाहेर काढले. सुमारे अर्धा तास हा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे संबंधित नातेवाइकाला अनेकांच्या संतापाचे शिकार बनावे लागले; पण त्याने निगरगठ्ठपणे हा सर्व प्रकार सहन करून दागिने ताब्यात घेतले.

जि.प.ची सर्वसाधारण सभा ऑनलाइनच ; माेबाइल लिंक पाठवणार

0
jalgaon-zp-building

जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा ऑफलाईन की ऑनलाईन याबाबत सुरू असलेल्या चर्चेत प्रशासनाने सभा ऑनलाईनच घेण्याचे नियाेजन केले आहे.

वाढत्या काेराेनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमविणे याेग्य हाेणार नाही. सदस्यांनी आग्रह केला तरी अधिकारी ऑनलाईनच उपस्थित राहणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. याबाबत ऑनलाईन सभेच्या सूचना आणि लिंक सदस्यांना पाठविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेत काेराेना वाढत आंहे. शुक्रवारी माेबाईलवर सुचना देेणार असून शनिवारीच ऑनलाईन सभेची गुगल मिट अॅपची लिंक पाठविण्यात येणार आहे.

भुसावळात व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्ण दगावले

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडलीय.

भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सात महिन्यांपासून पीएम केअर फंडातील १० व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले असले तरी अद्याप त्यांचा वापर सुरू झालेला नाही. जळगावातील सर्व शासकीय, खासगी कोविड हॉस्पिटल हाऊसफुल्ल आहेत. परिणामी हतबल रुग्णांना मिळेल तेथे उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही.

याच पद्धतीने भुसावळ ग्रामीण रुग्णालयात यंत्रणेअभावी गेल्या २४ तासात तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापैकी बोदवड तालुक्यातील रुग्ण बुधवारी, तर यावल व भुसावळ येथील प्रत्येकी एक असे दोघे गुरुवारी दगावले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोना पॉझिटिव्ह

0
gulabrao patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना नेते आ. गुलाबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांनी याविषयी माहिती दिली आहे.

पालकमंत्र्यांच्या संपर्कात अनेक जळगावकर

जळगाव शहर मनपा महापौर, उपमहापौर निवडीच्या निमित्ताने गेल्या २-३ दिवसात शेकडो राजकारणी आणि कार्यकर्ते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या संपर्कात आले आहे. सर्वांनी वेळीच दक्षता घेत स्वतःची चाचणी करून घेत गृह विलगीकरणात राहणे जळगावकरांच्या दृष्टीने हिताचे ठरणार आहे.

संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी व आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विंनती गुलाबराव पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे.

जिल्ह्यात अवैध सावकार तुपाशी, गरीब मात्र उपाशी!

0
illegal moneylenders starve in the district, but the poor starve!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । शहरासह जिल्ह्यावर पुन्हा कोरोनाचे सावट पसरले असून ते अधिकच गडद होत आहे. गेल्यावर्षीच्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकडाऊन असो वा नसो जिल्ह्यात एका गटाची मात्र चांगलीच चंगळ आहे. जिल्ह्यात अवैध सावकारी धंदा चांगलाच फोफावला असून गरिबांची अडचण लक्षात न घेता बिनधास्तपणे वसुलीचे काम सुरू आहे. पोलीस आणि सहकार विभागातील काही दिग्गजांना याबाबत माहिती असून देखील याकडे कानाडोळा केला जात आहे.

जळगावात सध्या अवैध धंदे मोठ्याप्रमाणात फोफावले असून सर्वच आलबेल कारभार सुरू आहे. कुठे सट्टा बाजार जोरात तर कुठे अंमली पदार्थांची जोरदार विक्री. सर्वांना परिचित आणि कायम चर्चेत असलेल्या या अवैध धंद्याव्यतिरिक्त आणखी एक धंदा सध्या मोठ्याप्रमाणात वाढला आहे. अवैध सावकारी जिल्ह्यात प्रचंड वाढली असून सावकारांची मुजोरी देखील वाढली आहे.

२ ते २० टक्के दरमहा व्याजाने पैसे वाटप
जळगाव जिल्ह्यात २ ते २० टक्के दरमहा व्याजाने पैसे वाटप केले जात आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि राजकारणी लोकांमध्ये लाखोंचे व्यवहार २ टक्केच्या दराने नेहमी होत असतात. परंतु इतरांच्या बाबतीत आणि किरकोळ रकमेसाठी मात्र चढा व्याजदर मोजावा लागतो. काही सावकार नोटरी, स्टॅम्प करून घेतात तर काही घर, मालमत्तेचे मूळ कागदपत्रे, कोरा धनादेश, वस्तू, वाहन गहाण म्हणून स्वतःकडे ठेऊन घेतात. ठरलेल्या दिवशी व्याज आणि ठरलेली रक्कम मिळाली नाही तर दुप्पट दंड वसूल केला जातो किंवा जवळ ठेवलेली वस्तू जबरदस्तीने बळकावून घेतली जाते.

सहकार, पोलीस विभागाचा कानाडोळा
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवैध सावकारी प्रकरणी सहकार विभागाने जळगाव आणि कासोदा येथे छापा टाकत कारवाई केली होती. गेल्या अनेक वर्षात केवळ एकच कारवाई झाली आहे. आज जिल्ह्यात पावलापावलावर अवैध सावकार झाले असून पोलीस आणि सावकार विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. काही दिग्गज तर यांच्याच परिचयातील असल्याने तेच त्यांना पाठबळ देत असतात.

४ वर्षात भरले ६ लाख व्याज तरीही मुद्दल बाकीच
जळगाव शहरातील एका तरुणाने ४ वर्षापूर्वी अवैध सावकाराकडून ४ लाख व्याजाने घेतले होते. अवैध सावकाराने १० टक्के दराने ४ लाख उपलब्ध करून दिले. संबंधित तरुणाने आजवर नियमीत व्याज दिले. थोडे थोडके नव्हे तर ४ लाखाचे ६ लाख व्याज भरले. गेल्यावर्षी लॉकडाऊन लागल्याने तरुणाची आवक थकली आणि तो व्याज देऊ शकला नाही. व्याज नियमीत मिळत होते तोवर सावकारांना मज्जा वाटत होती मात्र लॉकडाऊनच्या काळात अडचण आल्याने ते समजून घेत नाही. सावकाराला तरुणाच्या अडचणीचे काहीही देणंघेणं नसून त्याने पैशांसाठी तगादा लावला आहे. सावकाराकडून तरुणाला धमक्या दिल्या जात असून व्याज आणि मुद्दल रकमेची मागणी केली जात आहे.

कर्ज घेणाऱ्याची पसरी अन सावकारांचा कुटुंबियांना त्रास
जळगाव शहरातीलच एका तरुणाने ओळखीतील काही अवैध सावकारांकडून ५ ते १५ टक्के व्याजाने पैसे घेतले होते. गेल्या वर्षी तरुणाने सर्वांना व्याज आणि काही मुद्दल नियमीतपणे परत दिली परंतु कौटुंबिक अडचणीमुळे पुढे त्याला पैसे देणे शक्य झाले नाही. व्याजाने पैसे दिलेल्या सावकारांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. आपली अडचण सावकार समजून घेत नसल्याने तरुणाने थेट पसरी खात पैसे येतील तेव्हा देईल अशी भूमिका घेतली. तरुण पैसे देत नसल्याने सावकार तरुणाच्या घरी फेऱ्या मारत असून त्याच्या कुटुंबियांना त्याच्याबद्दल व पैशांबद्दल विचारणा करीत आहे.

पाचोरा तालुक्यातील आसनखेडा वनक्षेत्रात आगीचे तांडव

0
pachora

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील आसनखेडा जवळील वनविभागाला दि. १८ रोजी आग लागून १ हजार ५०० हेक्टर पैकी सुमारे ६५ टक्के हेक्टर क्षेत्र बांधीत झाले आहे. आगी बाबत प्राथमिक माहिती नुसार आगीच्या रौद्ररुप धारण केल्याने जंगलातील संपुर्ण टेकड्या जळून खाक झालेल्या आहेत. 

पाचोरा वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वन्य प्राणी आहेत. या आगीमुळे वन्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणावर होरपळले असण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. याआगीचा फटका नांद्रा, पहाण, लाख, कुऱ्हाड, सावंगी या गावाना लागून असलेल्या जंगलाला फटका अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आसनखेडा येथील माजी उपसरपंच कैलास पाटील, गंभीर पाटील, श्रावण कोळी, ईश्वर पाटील, सुपडू पाटील या स्थानिक ग्रामस्थ हे आग विझवण्याचे काम करत आहेत. घटना स्थळी वनविभागाचे वनपाल सुनिल भिलावे, ड्रायव्हर सचिन कुमावत, वनमजुर रामसिंग पाटील हे आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

जळगावातील कोरोना रुग्णांना दिलासा : रेमडेसिवर इंजेक्शन फक्त १०५० रुपयाला

0
remdesivir injection

 

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव शहरातच नव्हे तर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून प्रत्येक रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचे तज्ञ डॉक्टर सल्ला देत आहे. बाजारात सदरचे इंजेक्शन ची किंमत तीन ते पाच हजार रुपये पर्यंत असल्याने त्याची झड सर्वसामान्य रुग्णांना पोहोचत आहे. या सर्व बाबींचा विचार करून जळगाव जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीने रुग्णांसाठी नामांकित कंपनीचे 

रेमीडीसी वर इंजेक्शन हे फक्त एक हजार पन्नास रुपयात जळगाव शहरातील नामांकित मेडिकल स्टोअर मधूनच उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी रुग्णांनी आपला आधार कार्ड, कोविड पॉझिटिव्ह चे प्रमाणपत्र, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, व जर सरकारी रुग्णालयात असेल तर केस पेपर ची प्रत हे चारही  पेपर घेऊन खालील व्यक्तींना दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा  तसेच कोविड साठी लागणारी औषधी सुद्धा माफक दरात उपलब्ध करून देण्यात येईल

असे आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका पत्रका द्वारे  केले आहे.

हा तर सत्तेचा गैरवापर; आ.प्रवीण दरेकरांची जळगावच्या राजकारणावर टीका

0
pravin darekar

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२१ । जळगाव महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड देत महापालिकेवर भगवा फडकाविला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला.  दरम्यान, यावर भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

“सत्तेचा वापर आणि आमिष दाखवून मिळवलेला हा विजय आहे. गिरीश महाजन यांना कोंडित पकडण्याच्या दृष्टीने एकनाथ खडसे पक्ष सोडून गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व पक्षांनी एकत्र येऊन झालेला हा महापौर आहे. हा तात्कालिक विजय आहे. याचे दिर्घकालील काही फायदे होतील, असे मला अजिबात वाटत नाही.

दोन दिवसांसाठी गिरीश महाजन यांना धक्का दिला, अशाप्रकारे बातम्यांपलीकडे यातून त्या-त्या पक्षांना काय फायदा होईल, असे मला वाटत नाही. कारण जे नगरसेवक निवडून आले. ते जळगावमध्ये भाजपाच्या विचारधारेवर आलेत आहेत”, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.