जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरअभावी तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडलीय.
भुसावळ ग्रामीण रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सात महिन्यांपासून पीएम केअर फंडातील १० व्हेंटिलेटर उपलब्ध झालेले असले तरी अद्याप त्यांचा वापर सुरू झालेला नाही. जळगावातील सर्व शासकीय, खासगी कोविड हॉस्पिटल हाऊसफुल्ल आहेत. परिणामी हतबल रुग्णांना मिळेल तेथे उपचार घेण्याशिवाय पर्याय नाही.
याच पद्धतीने भुसावळ ग्रामीण रुग्णालयात यंत्रणेअभावी गेल्या २४ तासात तिघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. यापैकी बोदवड तालुक्यातील रुग्ण बुधवारी, तर यावल व भुसावळ येथील प्रत्येकी एक असे दोघे गुरुवारी दगावले.