⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024

भाजप वैद्यकीय आघाडी (ग्रामीण) ची जिल्हा कार्यकारणी जाहीर

0
bjp

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणच्या वैद्यकीय आघाडी (चिकित्सा प्रकोष्ठ) ची नूतन कार्यकारणी मुख्य संयोजक डॉ. नरेंद्र ठाकूर , नगरसेवक एरंडोल यांनी जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, सरचिटणीस सचिन पानपाटील व भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ . नितु पाटील यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच जाहीर केली.

महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडी चे मुख्य संयोजक डॉ. अजितजी गोपछडे ह्यांच्या नेतृत्वाखाली नव्याने आकार घेत असलेल्या ह्या आघाडीत आता वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या एलोपॅथी, आर्युवेदिक, होमिओपॅथी, दंतचिकित्सा  ह्या शाखेतील डॉक्टरांबरोबरच फार्मसी (ओषधनिर्माणशास्त्र), रेडिओग्राफर, फिजिओथेरपिस्ट व इतर निमवैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा  समावेश केला जात आहे.

नव्यानेच नियुक्त झालेल्या जिल्हा वैद्यकीय आघाडी च्या कार्यकारणीत एरंडोल येथील शास्त्री इन्सिट्यूट ऑफ फार्मसी ह्या कॉलेजचे संस्थापक डॉ. प्रा. विजय शास्त्री ह्यांची जळगाव जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडी च्या जिल्हा सहसंयोजक (फार्मसी) पदी नियुक्ती करण्यात आली आहे .जामनेर येथील डॉ . प्रशांत भोंडे (गटनेता नपा जामनेर) आणि डॉ. कुंदन फेगडे ( नगरसेवक यावल ) ह्यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. केयूर चोधरी, लोहारा (पाचोरा) ह्यांची नियुक्ती करण्यात आली असून  इतर जिल्हा सहसंयोजक खालीलप्रमाणे आहेत –

डॉ . संजीव पाटील (जामनेर), डॉ .सुनील पाटील ( साकळी, यावल ),  डॉ. जीवन पाटील (पाचोरा) , डॉ . शैलेश सूर्यवंशी (धरणगाव), डॉ. मनोज विसपुते (जामनेर), डॉ मनोहर भामरे (चाळीसगाव), डॉ. महेश वाणी (चाळीसगाव), डॉ सनी जैन (भुसावळ) डॉ. शिवाजी उभाळे, (पाचोरा),  डॉ.पंकज चौधरी (चुंचाळे चोपडा), डॉ पराग पाटील (दंतचिकित्सा, यावल), डॉ नरेंद्र अग्रवाल (दंतचिकित्सा, चोपडा)  सुरेंद्र सोंनोने (रेडिओग्राफर निमवैद्यकीय , भुसावळ) 

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व जिल्हा सहसंयोजकांचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रभारी, राज्य भाजप वैद्यकीय आघाडी  आ. गिरीश महाजन, राज्य जनजातीय क्षेत्र संपर्क प्रमुख किशोरजी काळकर, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, राज्य भाजप उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे , खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदुभाई पटेल, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ प्रशांत पाटील, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ नितु पाटील ह्यांनी अभिनंदन करून आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

जळगाव शहरात पोलिसांना जेवण वाटप

0
jalgaon (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । सध्या जळगाव शहरास जिल्हाभरात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने पंधरा दिवसांचा लॉक डाऊन लावण्यात आल्याने ठिक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या काळात पोलिस बांथवांना जेवण व पाण्याच्या बाटल्या सामाजिक कार्यकर्ते मनोज ठाकरे व त्यांच्या मित्रांनी रविवारी सायंकाळी वाटप केले.

जळगाव शहरातील चौकाचौकात कार्यरत असलेले पोलीस सहकारी बांधव यांना जेवण आणि पाण्याच्या बाटल्या पुरवतांना सचिन सोनवणे मनोज ठाकरे व त्यांचे मित्रमंडळी भैय्या चंदन राहुल पाटील आदी उपस्थित होते.

जामनेर तालुक्यातील ढालसिंगी येथे शंभर RTPCR द्वारे कोरोना चाचणी ; आता प्रतीक्षा अहवालाची

0
dhalsing news

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । ढालसिंगी येथे रविवारी आरोग्य कर्मचारी यांनी गावातील शंभर नागरिकांची आर.टी.पी.सी.आर(घश्यातील चाचणी) करून घेतली. गावात मागील काही दिवसांपासून करोना ने थैमान घातला असून व त्यात आठ दिवसा पूर्वी दोन मृत्यू झाल्याने आता नागरिक ही आरोग्य खात्याला सहकार्य करीत असताना दिसून येत आहे.

अगोदर नागरिक स्वब देण्यासाठी नकार देत असे. पण आरोग्य कर्मचारी व येथील ग्रा प सदस्य यांच्या जनजागृतीच्या जोरावर नागरिक मोठ्या प्रमाणाने चाचणी शिबीर ला स्वब देण्यासाठी येत आहे. गावात एक ते दोन दिवसाआड करोना रॅपिड चाचणी शिबीर होत होत असते. परंतु आज रविवार चा सुट्टीचा दिवस असूनही तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील डॉ. विवेक जाधव व आरोग्य सेवक मनोज परदेशी यांनी गावात आर.टी.पी.सी.आर करोना चाचणी शिबीर आयोजित केले. आज ढालसिंगी येथे घेण्यात आलेल्या  शिबिरात तब्बल शंभर लोकांनी आपले घश्यातील स्वँब दिले.

गावातील सर्वच स्तरावरून या दोन्ही आरोग्य कर्मचारी व आशा सेविका कांताबाई गोतमारे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. गावातील आरोग्य कर्मचारी व येथील ग्रा. प. सदस्य, संभाजी गोतमारे हे पॉझिटिव्ह रुग्णावर सतत लक्ष ठेऊन असतात. कोणताही पॉझिटिव्ह रुग्ण गावात फिरत असताना आढळून आला तर त्याला सक्तीची ताकीद देऊन त्याला घरी किंवा शेतात राहण्याची सूचना देत असतात. व अश्याच प्रकारे तपासणी मोठ्या प्रमाणात गावात झाली तर नक्कीच गाव करोना मुक्ती कडे जाईल असा विश्वास आरोग्य कर्मचारी यांनी व्यक्त केला.कोविड आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी होण्यासाठी येथील ग्रा. प. सदस्य संभाजी गोतमारे व विद्यानंद अहिरे यांनी परिश्रम घेतले.

भुसावळ भाजप कोरोना योद्धा सहाय्य समिती गठन, शहर अध्यक्ष पदी डॉ. नितु पाटील

0
bjp

कोरोना संक्रमित अथवा संशयित रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात आणि उपचारांमध्ये सुलभता यावी म्हणून आरोग्य प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील समन्वय म्ह्णून भुसावळ भाजप कोरोना योद्धा सहाय्य समिती गठन करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांच्या संकल्पनेनुसार जळगाव जिल्ह्यात प्रत्येक मंडळात अश्या प्रकारच्या समिती गठन करण्याची सुरवात झाली  असून भुसावळ शहरात देखील अशी समिती आ. संजय सावकारे आणि खा.रक्षाताई खडसे यांच्या नेतृत्वाखाली गठन झाली आहे.

भुसावळ भाजप करोना योद्धा समितीचे अध्यक्ष म्हणून वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांची नियुक्ती झाली असून  परीक्षित बऱ्हाटे,  युवराज लोणारी,निक्की बत्रा, अजय नागराणी,महेंद्रसिंग ठाकूर,  सतिश सपकाळे,राजेंद्र नाटकर,प्रा दिनेश राठी,गिरीश महाजन,चंद्रशेखर इंगळे,मनोज बियाणी, राजेंद्र आवटे  ,संतोष बारसे यांचे विशेष सहकार्य राहील. शिवाय 20 सदस्य असून वाढीव बिल पडताळणी समिती,  जीवन विमा समिती, अंत्यसंस्कार समिती राहणार आहे.

शहरातील प्रत्येक करोना रुग्णालय आणि विलगिकरण गृहाला प्रत्येकी 2 समिती सदस्य नियुक्त केलेले आहे.सदर समिती नागरिकांना करोना बद्दल जनजागृती करणे, रुग्णालयात संपर्क क्रमांक देणे,बेड संख्या पुरवणे,रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे,औषधे उपलब्ध करणे,विमा सल्ला,वाढीव बिल तक्रारी,तसेच रुग्ण मयत झाल्यास इतर सोपस्कार पार पाडणे आदी कार्य करेल.

सदस्य म्हणून अमित असोदेकर,राहुल तायडे,अमोल महाजन,अनिरुद्ध कुळकर्णी, नंदकिशोर बडगुजर,युवराज लोणारी,संदीप सुरवाडे,अँड.प्रकाश पाटील, नरेंद्र बऱ्हाटे,संजय दांडगे,अथर्व पांडे,अँड. योगेश बाविस्कर,प्रविण इखणकर,रमाशंकर दुबे,दलजीत चौधरी खुशाल जोशी,निलेश रायपुरे,केतन पाटील,देवेंद्र फालक,आनंद जोशी यांची नियुक्ती झाली आहे.

“सेवकार्यात भाजपा अग्रेसर…!

भुसावळ भाजप करोना योद्धा समिती ही रुग्ण, रुग्णालय प्रशासन आणि जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून कार्य करेल.रुग्णांना उपचारात सुलभता यावी,नातेवाईकांची वणवण कमी व्हावी आणि सर्वसामान्य जनतेमध्ये करोना बद्दल जनजागृती करण्याचे कार्य समिती करेल. वेळप्रसंगी जनहितार्थ आंदोलन करण्यासाठी देखील समिती बांधील राहील.

– डॉ. नितु पाटील, अध्यक्ष
 भाजप करोना योद्धा सहाय्य समिती ,भुसावळ

“जळगाव जिल्ह्यात पहिलीच भाजप समिती…!

“भाजप कार्यकर्ते करोना महामारीमध्ये तन, मन,आणि धनाने रुग्णसेवा करत आहेत, आता भुसावळ भाजप करोना योद्धा सहाय्य समिती गठन झाल्यामुळे सेवकार्यात सुसूत्रता येईल आणि आणखी मोठ्या प्रमाणात कार्य वाढवण्यास मदत होईल.मागील 15 दिवसापासून यावर नियोजन सुरू असून श्री.राम नवमी रोजी समिती जाहीर करण्यात आली.विशेष म्हणजे जळगाव जिल्हात भाजप ची अशी समिती प्रथम भुसावळलाच कार्यान्वित झाली आहे,याचा मनस्वी आनंद आहे.”

संजय सावकारे,
आमदार,भुसावळ विधानसभा

जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

0
water problem

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर जलवाहिनीवर पंप बसविणे, उमाळा येथे जुने व्हॉल्व्ह काढून नवीन टाकण्याचे आणि गळती बंद करण्याचे काम आजपासून हाती घेण्यात आले असून उद्या दि.२६ रोजी होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

यानुसार २६  एप्रिलचा पाणी पुरवठा २७  रोजी करण्यात येईल  तसेच २७  व २८  रोजी पाणीपुरवठा अनुक्रमे २८ व  २९  रोजी करण्यात येईल असे शहर अभियंता यांनी कळविले आहे

 

जामनेर येथे राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

0
blood donation camp organized by ncp women front at jamner

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । कोरोना काळात भासत असलेला रक्ताचा तुटवडा दुर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार यांच्या आदेशानुसार राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 

आज जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा सौ वंदनाताई चौधरी यांनी आयोजित केलेले या रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणावर रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा नेत्यांनी भेट दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

रक्तदान शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष श्री.रविंद्र भैय्या पाटील, जेडीसीसी बँकेचे चेअरमन सौ.रोहिणीताई खडसे खेवलकर, माजी मंत्री श्री गुलाबरावजी देवकर, माजी आमदार मनिषदादा जैन, नवनियुक्त कळमसरा सरपंच अशोक दादा चौधरी जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, मा.नगरसेवक अशोक भाऊ लाडवंजारी, जिल्हा उपाध्यक्षा डॉ.ऐश्वरी ताई राठोड, विधानसभा क्षेत्रप्रमुख  किशोरभाऊ पाटील, पप्पू पाटील, राजू नाईक, भगवान पाटील, दिलीप पाटील, प्रल्हाद बोरसे, दीपक महाराज, योगेश पाटील सर, दशरथ भाऊ पाटील, गजानन गव्हारे सर यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Jalgaon Corona Update : जळगावातील अधिकृत कोरोना आकडेवारी : २५ एप्रिल २०२१

0
corona update

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा रोजच १ हजारांच्या पुढेच येत आहे. आज देखील जिल्ह्यात १ हजार ७० नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. समाधानकारक बाब म्हणजे १ हजार ९७ लोकांनी कोरोनावर मात देखील केली आहे.
जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यापासून रुग्णसंख्या वाढू लागली असून रोज हजार ते बाराशेवर रुग्ण संख्य समोर येत आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून रोज समोर येणाऱ्या रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास स्थिर झाली आहे. रविवारी तब्बल दहा हजार १७९ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ७० रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या एक लाख १६ हजार ८६८ झाली. दिवसभरात एक हजार९७ रुग्ण बरेही झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या एक लाख ३ हजार ८९१ वर पोचली आहे. जिल्ह्यातील मृत्युदर अद्यापही चिंतेची बाब आहे. गेल्या २४ तासांत आणखी २० रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे बळींचा आकडा दोन हजार ७८ झाला आहे.

जळगावात दिलासा

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहराला दिलासा मिळाला आहे. रविवारी शहरात १९१ नवे रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे दिवभरात तब्बल २२० रुग्ण बरे झाले. मात्र जिल्ह्यात आज ४ जणांचा मृत्यू झाला.

जळगाव शहर- १९१, जळगाव ग्रामीण- ५७, भुसावळ-१२०, अमळनेर-१७१, चोपडा- ५५, पाचोरा- ३३, भडगाव-२१, धरणगाव- ४४, यावल- ४२, एरंडोल- ४१, जामनेर- ७७, रावेर- ४५, पारोळा- ३७, चाळीसगाव- ४७, मुक्ताईनगर- ५४, बोदवड-३१ आणि इतर जिल्हे ०४ असे एकुण १०७० बाधित रूग्ण आढळले आहे.

शिरसोलीच्या रुग्णाचा डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

0
jalgaon news

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । शहातील गजानन हॉस्पिटल शिरसोली येथील प्रौढाचा आज मृत्यू झाला. दरम्यान, हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्या असून यामुळे हॉस्पिटलच्या आवारात चांगलाच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. मात्र हॉस्पिटलचे डॉ. विवेक चौधरी यांनी कुठल्याही हलगर्जीपणामुळे अथवा इंजेक्शनमुळे मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली आहे.

याबाबत असे की, शिरसोली प्र.न. येथील चावदस शंकर ताडे (वय ५५) यांना शहरातील गजानन हॉस्पिटल येथे काल शनिवारी उपचारार्थ दाखल करण्यात आले. आज रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास प्रकृती ठिक होती. यावेळी ते नातेवाईकांशी बोलले. यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनसह डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चावदस ताडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी करत रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तसेच त्यांच्या कर्मचार्‍यांनी कुठलेतरी इंजेक्शन दिल्याने त्याच्या हाय पॉवरमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत चावदस ताडे यांचे भाऊ तथा शिरसोली येथील विद्यमान उपसरपंच श्रावण शंकर ताडे यांनी पत्रकारांशी बोलतांना केला. तसेच कारवाईची मागणी केली.

दरम्यान याबाबत गजाजन हॉस्पिटलचे डॉ. विवेक चौधरी यांनी मात्र कुठल्याही हलगर्जीपणामुळे अथवा इजेंक्शन दिल्यामुळे हा मृत्यू झाला नसल्याची माहिती दिली आहे. १५ दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवरच होते. आज त्यांची हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी बोलतांना सांगितले.

खुशखबर : महाराष्ट्रातील प्रत्येकाला मिळणार मोफत लस

0
vaccination

 जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । राज्यातील १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असून त्यासाठी स्वस्त दरात व चांगली लस उपलब्ध व्हावी म्हणून जागतिक टेंडर काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

केंद्रसरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ४५च्या खालील लोकांना केंद्रसरकार लस पुरवठा करणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान कोविडशील्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगींना ६०० रुपये राहणार आहे. कोवॅक्सीनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खाजगींना जाहीर झाली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.