⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024

सावधान : रेमडेसिव्हरसह इतर औषधांचा कुत्रिम टंचाई निर्माण केल्यास होणार कारवाई

0
remdesivir injection

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून Remdesivir , Tocilizumab , Itolizumab यासारखे कोरोनावर उपचारासाठी आवश्यक असणारे औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज एक आदेश जारी केला आहे.

जळगाव जिल्ह्यात कोविड – 19 विषाणूचा संसर्गात वाढ होत असून बाधित / संशयीत रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून बाजारामध्ये काही होलसेल औषधी डिलर्स / औषध विक्रेते यांचेकडून Remdesivir , Tocilizumab , Itolizumab या औषधींचा साठा करुन कृत्रिम टंचाई निर्माण करत असलेबाबत निदर्शनास आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

होलसेल औषधी डिलर्स / औषध विक्रेते यांचेकडून Rendesivir , Tocilizumab , holizunab या औषधांचा पुरवठा प्राधान्याने शासकीय कोचिड हॉस्पीटल्स , तसेच जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांचेकडून कोविड -19 उपचारासाठी मान्यता दिलेली खाजगी हॉस्पीटल्स , परवानाधारक औषध विक्रेते व शासनमान्य नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी यांनाच करावा तसेच शासन मान्य नोंदणीकृत वैद्यकीय परवानधारक डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खाजगी व्यक्तीना Remdesivir , Tocilizumab . Itolizumab ही इंजेक्शने उपलब्ध करुन देण्यात येवू नयेत असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

सदर औषधांचा कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता होलसेल औषधी डिलर्स / औषध विक्रेते यांनी घ्यायची आहे. वरील बाबींचे पालन होत आहे किंवा नाही याबाबतची खात्री किंवा तपासणी करण्याची जबाबदारी ही औषध निरीक्षक , अन्न व औषध प्रशासन यांची राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता , 1860 ( 45 ) चे कलम 188 , आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता , 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार आहे.

दादावाडी परिसरात खड्डयाला आमदार, खासदार, नगरसेवकांची नावे देऊन सुरू केले सेल्फी पॉईंट

0
jalgaon news (1)

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । दादावाडी परिसरात मागील 2 महिन्यांपासून फुटलेली पाईप लाईन दुरुस्त करून खड्डा आहे त्याच परिस्थितीत न बुजवता सोडून देण्यात आला. त्यामुळे परिसरातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतोय. नागरिकांनी झालेल्या खड्डयांची दुरुस्ती साठी प्रभागातील नगरसेवकांना निवेदन देऊन देखील त्या खड्ड्याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही,  आतापर्यंत खड्ड्यात जवळपास 15 ते 20 मोठ्या गाड्या फसल्याचे व 30 ते 40 नागरिक रात्रीच्या वेळी पडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. 

आज शेवटी अॅड. कुणाल पवार यांच्या संकल्पनेतून त्या खड्याला आमदार, खासदार, नगरसेवक यांची नावे देऊन सेल्फी पॉईंट सुरू करण्यात आला. त्या खड्यात कुंदन सूर्यवंशी, राहुल पाटील, सचिन नांनवरे, नितीन जाधव, सागर पाटील, पवन पवार व जेष्ठ मंडळींनी सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.

कुंदन सूर्यवंशी यांनी परिसरातील नागरिकांना फोटो काढण्याचे आवाहन केले आहे व फोटो स्पर्धा देखील आयोजित केली आहे आणि ज्याचा खड्डया सोबत उत्कृष्ट फोटो येईल त्यांना योग्य ते बक्षीस देखील देण्यात येणार आहे

कोरोनाची वक्रदृष्टी : एकाच कुटुंबातील पाच जण दगावले

0
corona logo

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । सावद्यातील शिवाजी चौकातील रहिवासी परदेशी कुटुंबावर काळाने घाला घातला. कोरोनामुळे नुकत्याच चार जणांच्या मृत्यूच्या दुःखातून हे कुटुंब सावरत नाही, तोच बुधवारी (ता. ३१) रात्री या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कुटुंबातील राजूसिंग परदेशी  यांनी जिल्हा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सात दिवसांत एकाच कुटुंबातील ५ जण दगावल्याने संपूर्ण शहर स्तब्ध झाले.

येथील शिवसेना पदाधिकारी कै.सतीशसिंह परदेशी यांच्या स्नुषा संगीता किशोरसिंह परदेशी यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्याच दिवशी सायंकाळी त्यांची सासूबाई कुवरबाई गणपतसिंह परदेशी (वय ८५) यांचा धक्क्याने मृत्यू झाला. यानंतर २५ मार्चला किशोर गणपतसिंह परदेशी (वय ५२) यांचा जळगाव रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हे कमी म्हणून की काय, याच दिवशी परदेशी कुटुंबातील पत्रकार कैलाससिंह गणपतसिंह परदेशी (वय ५५) यांचा मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन्ही भावांचे निधन झाले. चार दिवसांत एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने संपूर्ण शहर हळहळले. हे दुख:चे सावट कायम असताना ३१ मार्चला रात्री ११.३० वाजेच्या सुमारास परदेशी यांचे बंधू रामसिंह (राजू परदेशी) (वय ५९) यांचा जळगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. परदेशी कुटुंबाने सात दिवसात ५ जणांना गमावले. यामुळे शिवाजी चौकातील एकही चूल पेटली नाही. 

कोरोनामुळे मृत्यू झाल्याने इच्छा असूनही कुटुंबातील सदस्य जिवाच्या माणसाचे अखेरच्या क्षणीदेखील अंतिम दर्शन घेऊ शकत नाही, तर अनेक नातेवाईक, आप्तस्वकीय, मित्रमंडळी मृत कुटुबांच्या दुःखात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकत नाही. अशी वित्रित्र व तितकीच केविलवाणी, दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याचे समाजात दिसत आहे.

मनपा महसुलच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा

0
jalgaon mayor collector meet

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । शहर मनपाकडे असलेल्या महसूल विभागाच्या १३.३० कोटी थकबाकीबाबत पुनर्गठन किंवा इतर काही मार्गाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महापौर सौ.जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकाकडे महसूल विभागाची १३.३० कोटी रक्कम थकित आहे. काही दिवसापूर्वी या रकमेबाबत मनपाची बँक खाती गोठवली जाणार होती. गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या या रकमेबाबत मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता काहीतरी सकारात्मक तोडगा काढावा यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. 

यावेळी शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, जेष्ठ नेते नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, सुनील महाजन, नितीन बरडे,  गणेश सोनवणे, प्रशांत नाईक, सचिन पाटील, जाकीर पठाण आदी उपस्थित होते.

महापौर, उपमहापौरांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट !

0
jalgaon manapa news

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ ।  शहर मनपावर शिवसेनेचा प्रथम महापौर म्हणून जयश्री महाजन या विराजमान झाल्या तेव्हा जिल्ह्याचे नेते पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील हे कोरोना संसर्गाने विलगीकरणात होते. कोरोना मुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात दाखल झाले असून महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी त्यांची भेट घेत शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.

जळगाव शहर मनपात बहुमत नसतानाही शिवसेनेने आपला भगवा फडकवला. पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर झाल्या. महापौरांनी पदभार स्वीकारला तेव्हा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील कोरोना संसर्गामुळे मुंबई येथे उपचार घेत होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री जळगावात परतले आहेत. शुक्रवारी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांची भेट घेऊ सत्कार केला.

राज्यात महाआघाडी सरकार असून पालकमंत्री नात्याने आपण जळगाव शहराच्या विकासासाठी काय करू शकतो. भविष्यात विकासकामांचे आणि निधीसाठी कसे नियोजन करता येईल याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा केली. पालकमंत्र्यांनी राज्य सरकारकडे याबाबत पाठपुरावा करून लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे सांगितले.

जिल्हा पोलीस दलास आज मिळणार वाहनांचा ताफा

0
jalgaon news

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ ।  जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलासाठी २९ चारचाकी आणि ७० दुचाकी वाहने खरेदी करण्यात आली आहेत. आज शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर सायंकाळी १७:३० वाजता सुपूर्द करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्र्यांच्या सोबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

जळगाव जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी संख्येच्या तुलनेत दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या ही खूप कमी आहे. यातच सध्याची अनेक वाहने ही जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी ही डोकेदुखी ठरत असते. याची दखल घेऊन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी पोलिस दलासाठी नवीन चारचाकी आणि दुचाकी वाहनांची आवश्यकता असल्याची पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी केली होती.

जिल्हा नियोजन समितीने २४ जानेवारी २०२१ रोजी २९ महेंद्रा बोलेरो (बीएस-४) आणि ७० होंडा शाईन दुचाकींना खरेदीची मंजुरी दिली होती. यासाठी २ कोटी, ३० लाख, ९६ हजार, ४७८ रूपयांची तरतूद करण्यात आली होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ही वाहने २ एप्रिल रोजी सायंकाळी साडे पाच वाजता सुपूर्द करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पोलिस मुख्यालयात आयोजीत करण्यात आलेला आहे. पोलिस दलात वाहनांचा नवीन ताफा दाखल होणार असल्यामुळे विविध गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे.

अमळनेर रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी !

0
amalner news

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ ।  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून अनेक तालुक्यांमध्ये गंभीर परिस्थिती बनली आहे. दरम्यान, अमळनेर तालुक्यातील कोरोनोची परिस्थिती पाहुन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला ऑक्सिजन वेळेवर भेटत नाहीयेत. अमळनेर शहरातील या परिस्थितीला जाबबदार कोण? मागिल वर्षी पण अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. ४ जुलै २०२० रोजी त्यांनी निवेदन ही दिले होते की अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे अमळनेर मध्ये ही परिस्थिती निर्माण होत आहे.

अमळनेरची परिस्थिती बघता प्रशासनाने सर्व हॉस्पिटल तसेच मेडिकल यांच्या सर्वांची माहिती (उदा. कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत), कोणत्या मेडिकल ला रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत ,ऑक्सिजन, व्हेंटिलीटरची काय परिस्थिती आहे या सर्व माहितीसाठी 3 ते 4 कर्मचारी यांची कमिटी करावी जेणेकरुन नागरिकांना सर्व माहिती एकाच ठिकानी मिळेल.

भूषण भदाणे यांनी अधिकारी वर्गाला विनंती केलेली आहे की, तालुक्यात प्रार्थमिक आरोग्य केंद्र आहेत. त्या ठिकानी देखील अशीच व्यवस्था करावी जेणेकरुन रुग्णाला बेड उपलब्ध होतील. तसेच 13 व्या व 14 व्या वित्त आयोगाचा निधी असेल तर त्या निधीचा वापर ग्रामीण रुग्णालय व प्रार्थमिक आरोग्य केंद्रांसाठी करावा.

अमळनेर चे प्रांतधिकारी व तहसीलदार हेच या परिस्थितीला जाबबदार आहेत. असा आरोप करत त्यांची तत्काळ चौकशी करा अशी विनंतीपर मागणी ही फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी केली आहे.

जळगाव पीपल्स बँकेसाठी २४ एप्रिल रोजी मतदान

0
jalgaon people bank voting on april 24

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । जळगाव पीपल्स बँकेचा निवडणूक कार्यक्रम दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्यातर्फे गुरुवारी जाहीर करण्यात आला. १४ संचालकांसाठी ही निवडणूक होणार असून महापालिका हद्दीतील १२ मतदार संघांचा यात समावेश असून २४ एप्रिल रोजी मतदान होईल.

१ ते ५ एप्रिलदरम्यान नामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकारण्यात येईल. ६ एप्रिल रोजी छाननी, ७ एप्रिल रोजी माघारीची मुदत आहे. १५ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध होऊन २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपासून यशवंतराव मुक्तांगण सभागृहात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. निवडणुकीचा निकाल २५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अजिंठा लॉन्स येथे घोषित होईल.

लोकसहभागातून पाळधीच्या आरोग्य केंद्रात अद्ययावत कोविड केअर सेंटर सुरू होणार !

0
kovid care center to be started at paldhi

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ ।  : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लोकसहभागातून ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून याची पूर्ण जबाबदारी गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा यांनी उचलली आहे.जिल्हाधिकारी अभिजित राऊत  व सिव्हील सर्जन एन. एस. चव्हाण यांनी  प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून कोविड सेंटर सुरू करण्याबाबतचे निर्देश दिलेत.

सध्या कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला असून रूग्णांना बेड उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, पाळधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५० खाटांचे अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार असून जि. प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्या विनंती नुसार आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी या कामाचा आढावा घेत निर्देश दिले.२-३ दिवसात हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

या कोविड केअर सेंटरमध्ये ३० जनरल बेड असतील. यासोबत येथे १५ ऑक्सीजन बेड आणि ५ मिनी व्हेंटीलेटर्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. याचा परिसरातील कोरोनाच्या रूग्णांना उपचारासाठी उपयोग होणार आहे. विशेष बाब म्हणजे या कोविड केअरच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ही गुलाबरावजी पाटील फाऊंडेशन, सुगोकी ग्रुप आणि बीएनए इन्फ्रा हे संयुक्तरित्या उचलणार आहेत. अर्थात, हे कोविड केअर सेंटर लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार हे सेंटर उभारण्यात येत आहे.

दरम्यान, आज पाळधीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक अमोल कासट, गोपाल कासट,  तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनवणे, डॉ. नरेश पाटील, डॉ.सी.एस.पाटील, ग्राम पंचायत सदस्य अरविंद मानकरी, मच्छीन्द्र साळुंके, गुलाब भाऊ फाउंडेशनचे व सुगोकीचे पदाधिकारी , आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होते.