⁠ 
सोमवार, मे 20, 2024

अमळनेर रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ ।  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु असून अनेक तालुक्यांमध्ये गंभीर परिस्थिती बनली आहे. दरम्यान, अमळनेर तालुक्यातील कोरोनोची परिस्थिती पाहुन सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला ऑक्सिजन वेळेवर भेटत नाहीयेत. अमळनेर शहरातील या परिस्थितीला जाबबदार कोण? मागिल वर्षी पण अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. ४ जुलै २०२० रोजी त्यांनी निवेदन ही दिले होते की अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे अमळनेर मध्ये ही परिस्थिती निर्माण होत आहे.

अमळनेरची परिस्थिती बघता प्रशासनाने सर्व हॉस्पिटल तसेच मेडिकल यांच्या सर्वांची माहिती (उदा. कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड आहेत), कोणत्या मेडिकल ला रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध आहेत ,ऑक्सिजन, व्हेंटिलीटरची काय परिस्थिती आहे या सर्व माहितीसाठी 3 ते 4 कर्मचारी यांची कमिटी करावी जेणेकरुन नागरिकांना सर्व माहिती एकाच ठिकानी मिळेल.

भूषण भदाणे यांनी अधिकारी वर्गाला विनंती केलेली आहे की, तालुक्यात प्रार्थमिक आरोग्य केंद्र आहेत. त्या ठिकानी देखील अशीच व्यवस्था करावी जेणेकरुन रुग्णाला बेड उपलब्ध होतील. तसेच 13 व्या व 14 व्या वित्त आयोगाचा निधी असेल तर त्या निधीचा वापर ग्रामीण रुग्णालय व प्रार्थमिक आरोग्य केंद्रांसाठी करावा.

अमळनेर चे प्रांतधिकारी व तहसीलदार हेच या परिस्थितीला जाबबदार आहेत. असा आरोप करत त्यांची तत्काळ चौकशी करा अशी विनंतीपर मागणी ही फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष भूषण संजय भदाणे यांनी केली आहे.