Monday, May 23, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

जिल्हा बँकेत भाजपचे ‘टांगा पलटी, घोडे फरार’

JDCC BJP
चेतन वाणीbyचेतन वाणी
November 22, 2021 | 11:57 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यात बहुतांश ठिकाणी सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्यावेळी भाजपचे तत्कालीन नेते एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वामुळे बाजी मारता आली होती. यंदा मात्र चित्र संपूर्ण उलटे होते, राज्यात महाआघाडीचे सरकार आणि त्यात जिल्ह्यातील भाजपचे नेते एकनाथराव खडसे हे देखील राष्ट्रवादीत आहेत. मुळात राज्यातील सहकार क्षेत्र हे भाजपच्या बसची बात नाही हे आजच्या निकालाने पुन्हा सिद्ध झाले आहे. भाजपने तर अगोदरच माघार घेतली होती, उरले सुरले अपक्ष तर शेतकरी पॅनलच्या माध्यमातून टक्कर देणार होते पण निकालानंतर सर्वांचेच ‘टांगा पलटी, घोडे फरार’ झाले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या नव्हे तर राज्याच्या राजकारणात गेल्या पंचवार्षिकमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचा चांगलाच दबदबा होता. संकटमोचक म्हणून त्यांनी सर्वच ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध करायला सुरुवात केली. महाजनांचा करिष्मा खऱ्या अर्थाने राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कमी झाला त्यातल्या त्यात जळगाव मनपात भाजपच्या नगरसेवकांनी महाजनांना न भिता शिवसेनेची वाट धरली तेव्हा ते अधोरेखित झाले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने आपली पाळेमुळे रोवण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यात सत्ता नसली तरी महाआघाडीच्या तंबूत बसून आपल्या हक्कांच्या जागेवर डाव खेळण्यासाठी फासे टाकले.

महाआघाडीने ऐनवेळी डाव खेळला आणि भाजपला बाहेरचा रस्ता दाखवत सर्व जागांवर उमेदवार दिले. आज निकालाची बातमी आली तेव्हा काँग्रेसच्या पारड्यात एक जागा वगळता इतर सर्व ठरल्याप्रमाणे निवडून आले. भाजपचे पण खडसेंचे समर्थक असलेले अपक्ष उमेदवार आ.संजय सावकारे वगळता इतर कुणीही बँकेत इंट्री करू शकले नाही. आजवरच्या इतिहासात किंवा राज्यातील सहकार बघता राष्ट्रवादी काँग्रेसचीच नेहमी सरशी राहिली आहे. आज जाहीर झालेल्या निकालानंतर महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकत आपले वर्चस्व राखले. तर एका जागेवर भाजपचे आमदार संजय सावकारे हे अपक्ष निवडून आले. आधीच ११ जागा या बिनविरोध झाल्याने उर्वरित १० जागांसाठी रविवार दि.२१ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० जागांसाठी सोमवार दि.२२ रोजी मतमोजणी झाली. यात रावेर मतदार संघातून जनाबाई महाजन, यावल मतदार संघातून विनोद पाटील, चोपडा मतदार संघातून घनश्याम अग्रवाल, भुसावळ मतदार संघातून आ.संजय सावकारे, इतर संस्था व व्यक्तिगत सभासद मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून माजी आ.डॉ. सतीश पाटील, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून श्यामकांत सोनवणे, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातून मेहताबसिंग नाईक यांनी तर महिला राखीव मतदार संघातून ऍड.रोहीणी खडसे-खेवलकर व शैलेजा निकम हे विजयी झाले.

‘हे’ उमेदवार झाले होते बिनविरोध
मुक्ताईनगर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून माजी मंत्री एकनाथराव खडसे, अमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आ.अनिल पाटील, चाळीसगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून प्रदीप देशमुख, धरणगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून संजय पवार, एरंडोल विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून अमोल पाटील, जळगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून महापौर जयश्री महाजन, जामनेर विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून नाना पाटील, पाचोरा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आ.किशोर पाटील, पारोळा विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून आ.चिमणराव पाटील, बोदवड विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून ऍड. रवींद्र पाटील, भडगाव विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातून प्रताप पाटील हे ११ उमेदवार बिनविरोध झालेले होते.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव जिल्हा, ब्रेकिंग, राजकारण, विशेष
Tags: JDCC BankJDCC Electionsressult
SendShareTweet
चेतन वाणी

चेतन वाणी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
horoscope

आजचे राशी भविष्य : २३ नोव्हेंबर २०२१

gold silver

खुशखबर...सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण ; जाणून घ्या प्रति तोळ्याचा दर

crime

जळगावात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.