भुसावळ बाजार समितीमध्ये भाजपची एकहाती सत्ता ; 18 पैकी 15 जागांवर विजय

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२३ । राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होत असून अनेक ठिकाणचे निकाल हाती येत आहेत. दरम्यान, भुसावळ बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. येथे भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 6 बाजार समित्यांची मतमोजणी सुरु आहे. यातील भुसावळ बाजार समितीत 18 पैकी 15 जागांवर भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला आहे.

त्यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर विजय मिळवता झाला असून त्यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.