जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२१ । भारतीय जनता पार्टीचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा महिला आघाडीतर्फे दि.१४ नोव्हेंबर रोजी महिला बचत गटांसाठी मोफत ‘उद्योग मार्गदर्शन मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात उद्योग मैत्रीण मासिकाच्या संपादिका सारिका भोईटे-पवार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यातर्फे समाज प्रबोधनपर, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा यासारख्या विविध कार्यक्रमांचे नेहमीच आयोजन करण्यात येते. यावर्षी वाढदिवसानिमित्त पाचोरा शहर अंतर्गत बचत गटातील महिलांसाठी उद्योग मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१४ रोजी दुपारी ३ वाजता महाल पुरे मंगल कार्यालय भडगाव रोड, पाचोरा येथे हा मेळावा संपन्न होणार आहे.
पाचोरा शहरातील सर्व महिला बचत गट तसेच विविध व्यवसायिक, लघुउद्योग, गृह उद्योग करू इच्छिणाऱ्या माता भगिनींनी सारिका भोईटे-पवार यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा महिला आघाडी, पाचोरा-भडगावच्यावतीने करण्यात आले आहे.