⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | राजकारण | आशादीप प्रकरणावरून भाजपने राजकारण करून जिल्ह्याची बदनामी केली

आशादीप प्रकरणावरून भाजपने राजकारण करून जिल्ह्याची बदनामी केली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२१ । जळगाव येथील आशादीप महिला वसतिगृहातील अत्याचारप्रकरणाचा मुद्दा सध्या राज्यात गाजत आहे. दरम्यान, या प्रकरणावरून भाजपने राजकारण करून जिल्ह्याची बदनामी केली असून याबाबत महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन दिले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील आशादीप वसतीगृहात झालेला प्रकार आज राज्यात सर्वत्र गाजत आहे. यात जळगाव शहराची मोठी बदनामी होत आहे. भाजपाने याप्रकरणाची सत्यता व तपासणी करूनच विधीमंडळात हा विषय मांडायला हवा होता. अशादिप वसतीगृहा प्रकरणी अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा हा व्हिडीओ विश्वासहर्ता न  तपासता सकल चौकशी होईपर्यंत भाजप विरोधी पक्ष नेत्यांनी विधानसभेत अत्यंत घाईघाईत संयम न बाळगता मुंगटीवार फडणवीस यांनी जी विधाने केली. त्यामुळे जळगाव शहराची बदनामी होत आहे.

 

त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो कुठलीही, अशी कोणतीही व्हिडीओ क्लिप नसतांना  बेजबाबदार विधानाचा महाआघाडीच्या सरिता माळी-कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी निषेध केला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.