जळगाव लाईव्ह न्यूज । १३ नोव्हेंबर २०२१ । पाचोरा मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन भारतीय जनता पार्टीच्या पाचोरा शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
पाचोरा मतदार संघात सुरू असलेल्या विकास कामांमुळे प्रभावित होऊन आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाचोरा शहरातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक तथा पाचोरा शहर भाजपचे उपाध्यक्ष देवराम लोणारी, भाजप मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष युवराज भोई, भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष अजय सोनार, पाचाेरा शहर भाजप उपाध्यक्ष रघुनाथ कुमावत आदी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख सुनील पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपजिल्हाप्रमुख दिनकर देवरे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य दीपक राजपूत, माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर, शिवसेना शहरप्रमुख बंडू चौधरी आदी उपस्थित होते.