⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जिल्हाप्रमुख आणि महानगरप्रमुख घोषित करण्यात होत आहे भाजपाला विलंब ; पक्षात संभ्रमाचे वातावरण !

जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ मे २०२३ | भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा व जळगाव महानगरमध्ये सध्या अविश्वासाची कुजबूज सुरू झाली आहे. यामुळे खालच्या फळीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे महिना उलटूनही अजूनही जिल्हाध्यक्षांचे नाव हे घोषित करण्यात आलेले नाही.

भारतीय जनता पक्षामध्ये दर 3 वर्षांनी पक्षांतर्गत निवडणूक होत असतात. यामध्ये जिल्हाध्यक्ष व महानगर प्रमुख निवडला जातो. यंदाच्या निवडणुकीमध्ये दोन जिल्हाध्यक्ष आणि एक महानगर प्रमुख निवडला जाईल असे म्हटले जात आहे. 15 मे रोजी तो निर्णय येईल असे म्हटले जात होते. आता मे महिना उलटायला आला तरी देखील जिल्हाध्यक्ष आणि महानगर प्रमुखांची नियुक्ती न झाल्यामुळे पक्षांतर्गत अविश्वासाची लाट निर्माण झाल्या असल्याचे पाहायला मिळत आहे

15 मे पर्यंत भारतीय जनता पक्षाचे महानगर प्रमुख कोण आणि जिल्हाप्रमुख कोण हे ठरणार होते. मात्र आता एक जून आला तरी देखील काहीही स्पष्ट होत नाहीये. भारतीय जनता पक्ष हा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. अशावेळी कार्यकर्त्यांमुळे अस्वस्थची लाट पाहायला मिळत आहे. असे भाजपातील एका पदाधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष कोण होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. तर महानगर प्रमुख म्हणून याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. कित्येक बडे नेते या ठिकाणी आपलं नाव लागेल याची वाट पाहत आहेत आणि जिल्हाध्यक्ष आणि महानगर अध्यक्ष घोषित झाल्यावरच खालची कार्यकारणी ठरणार आहे. अशावेळी खालच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या अस्वस्थतेची लाट आहे. लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा आणि नक्की जिल्हाध्यक्ष कोण आणि महानगरात प्रमुख कोण हे आम्हाला समजावं अशी मागणी खालच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.

महानगर प्रमुख व जिल्हाप्रमुख कोण होणार हे येत्या दोन दिवसांमध्ये समजणार आहेत. पक्षाचे काम सुरूच आहे. यामुळे पक्षात कोणतेही संभ्रमाचे वातावरण नाही.
आमदार राजूमामा भोळे, जळगाव शहर,