भाजपकडून कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर ! उज्ज्वल निकमांच्या मुलावर महत्वाची जबाबदारी

मार्च 5, 2026 2:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२६ । एकीकडे राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना भाजपकडून मुंबई प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावं जाहीर करण्यात आली. मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी गुरुवारी नव्या कार्यकारिणीबाबत अधिकृतपणे माहिती दिली. यामध्ये उज्ज्वल निकमांच्या मुलावर मोठी महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

bjp

नव्या कार्यकारिणीत किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर आणि विनोद शेलार यांची महामंत्रीपदी निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी किरीट बन्साळी आणि युवा मोर्चा अध्यक्षपदी दीपक सिंह यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

याशिवाय उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांना प्रवक्तेपदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनिकेत निकमसोबत निरंजन शेट्टी, अजय सिंह आणि सुमिता सिंह यांची मुंबई प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या या नव्या कार्यकारिणीमुळे मुंबई प्रदेशात पक्षाचे नेतृत्व अधिक सक्षम आणि कार्यक्षम स्वरूपात कार्य करण्यास तयार असल्याचे पक्ष सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now