⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं विधान : म्हणाले आम्ही …..

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२२ । शिवसेनेतून फुटल्यावर आता एकनाथ शिंदे यांचा गट भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी अशा होती मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले आहेत कि, राज्यासमोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भाजप काय करायचे ते ठरवेल असे म्हणतच सध्यातरी आम्ही ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत आहोत.

भविष्यकाळात महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, ज्याप्रकारे शिंदे गटाचे प्रस्ताव येतील त्याप्रमाणे भाजपच्या कोअर टीम बैठकीत निर्णय घेतला जाईल असंही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच सरकार स्थापनेवरही भाजपच्या बैठकीत चर्चा करण्यात आली नसून रोज घडणाऱ्या घटना बघूनच भाजपा त्यावर निर्णय घेईल असंही त्यावेळी स्पष्टच केले. ते स्वत:ला बंडखोर मानत नाहीत तर ते चोवीस कॅरेट शुद्ध शिवसैनिक आमदार असल्याचे ते मानतात. तसेच शिंदे गटच्या बंडखोर आमदारांच्या प्रस्तावाशी भाजपचं काहीही देणं घेणं नाही असंही स्पष्ट करण्यात आले. तसेच यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, आम्हाला आज तरी विश्वासदर्शक ठरावाची मागणी करण्याची गरज वाटत नाही, दोन तृतीयांश ज्यांच्याकडे ते ओरिजनल आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपच्या कोअर कमिटीतच्या महत्वपूर्ण बैठकीत नक्की काय बोलणं झालं ? आणि त्यात नक्की नेमकं काय ठरलं? याविषयी सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भाजपने सध्यातरी सरकार स्थापनेचा किंवा कोणत्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. भाजपाची भूमिका हि वेट अँड वॉच ची आहे. भाजपला शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.