महाराष्ट्रराजकारण
ठाकरेंना जबर धक्का : सुभाष देसाईंचा मुलगा होणार शिंदेवासी
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२३ । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून उद्धव ठाकरेंच्या अनेक निष्ठावंतांनी शिंदेंना साथ दिली आहे.. मात्र आता उद्धव ठाकरे यांना जबर धक्का बसणार आहे. तो म्हणजे सुभाष देसाई यांचे सुपुत्र भूषण देसाई ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सुभाष देसाई हे बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, सुभाष देसाईंचा मुलगा भूषण देसाई आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार आहे.
सुभाष देसाई यांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या सभेत शिवसेनेत पडलेल्या फुटीवर भाष्य केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचं ते म्हणाले होते. मात्र त्यांचाच मुलगा आता शिंदेंसोबत जाणार आहे.