मोठी बातमी : राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून जीवे मारण्याची धमकी
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२२ । सध्या संपूर्ण भारतात ‘भारत जोडो’ यात्रेमुळे चर्चेत असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आहे. यामुळे संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानात पत्र पाठवत राहुल गांधींना धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी इंदूरमध्ये येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी देण्यात आली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पत्रात राहुल गांधींना बॉम्बने उडवू, असे धमकावण्यात आले आहे. पोलिस आणि क्राइम ब्राँच हे निनावी पत्र पाठवणार्याचा शोध घेत आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. राहुल गांधी मध्यप्रदेशात येताच त्यांना बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे.