मोठी बातमी : शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात

जळगाव लाईव्ह न्यूज | २० फेब्रुवारी २०२३ | उध्दव ठाकरे यांना शिंदे गटाने पुन्हा धक्का दिला आहे. विधीमंडळातील शिवसेनेच्या कार्यालयावर देखील शिंदे गटाने ताबा मिळविला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटाने थेट विधीमंडळातील कार्यालयावर ताबा मिळविला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला.

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटलं की, आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे. यामुळे आता शिंदे गट थेट शिवसेना भवनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता बळावली आहे.