जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । आतापर्यंत आपण प्रकारामध्ये न्याय मिळत नसल्याने अनेकांनी आत्महत्या केल्याची घटना ऐकली आहे. परंतु, चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथील संजय कौतीक पाटील हे गावातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दि. १५ ऑगष्ट रोजी सकाळी ९ वाजता येथील ग्रामपंचायत मध्ये आत्महत्या करणार असल्याचे पत्रक काढले आहे. दरम्यान, पाटील यांनी थेट आत्महत्या करण्याचे पत्रक काढले असून त्यांना प्रशासन न्याय मिळवून देते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील पातोंडा येथील संजय कौतीक पाटील यांनी पातोंडा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत दोन वेळा आमरण उपोषण केले. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यानी येथील पदाधिकाऱ्यांच्या कामात कसुर असल्याचे लेखी पत्र दिले. मात्र, प्रशासनाने दोषीनवर चौकशी व कारवाई केली नाही. संजय कौतीक पाटील यांनी येथील ग्रामपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचार प्रशासनाला लक्षात आणून दिला तसेच प्रशासनाला जागे केले. मात्र, प्रशासनाने चौकशी व कारवाई न केल्यामुळे पाटील हे निराश होऊन, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी दि. १५ ऑगष्ट रोजी सकाळी ९ वाजता येथील ग्रामपंचायत मध्ये आत्महत्या करणार असल्याचे पत्रक काढले आहे.
दरम्यान, येथील नागरिक देखील प्रशासनावर नाराजी दर्शवली असून प्रशासनाबद्दल चांगल्याच प्रतिक्रिया उमटत आहेत. म्हणजे, पातोंडा ग्रामपंयात मध्ये भ्रष्टाचाराबाबत पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले तरी प्रशासनाला जाग आली नाही? पाटील आत्महत्या करतील तेव्हा प्रशासन जागे होतील का ? लोकांना न्याय मिळवून देणार नसेल तर प्रशासन कुणासाठी? का आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो हे आमचे पाप म्हणावे ? असे अनेक प्रश्न नागिरकांमधून उमटत आहे.
संजय पाटील पत्रकात काय म्हटले ?
मी संजय कौतीक पाटील राहणार पातोंडा ता.चाळीसगांव जि.जळगांव (महाराष्ट्र) विषय : सन १९२०, २०२०, २०२१ या कालखंडातील पातोंडा ग्रामपंचायत ता.चाळीसगांव रस्ता, गटारी, अंध, अंपग व मराठी शाळा, वाल कंपाऊड व इतर योजना अंतर्गत शासनाच्या १४ व १५ वित्त आयोग व इतर निधीतुन पातोंडा ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचारा बाबत मी संजय कौतीक पाटील दि.११/०२/२०२२ ते २४/०२/२०२२ असे १४ दिवस आमरण उपोषण ग्रामपंचायत समोर केले तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जळगांव यांनी लेखी पत्र दिले की ७ दिवसात चौकशी व कारवाई करु त्यांनी ते केले नाही म्हणुन पुन्हा संजुबाबा पाटील परत मुख्य अधिकारी (कलेक्टर) ऑफीस समोर दि. ०४/०४/२०२२ ते १८/०४/२०२२ असे १५ दिवस आमरण उपोषण केले तेव्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यानी कामात कसुर आहे असे लेखी पत्र दिले होते तरी या दोषीनवर चौकसी व कारवाई केली नाही. म्हणुन मी आता माझ्या गावाला (जनतेला) न्याय मिळावा या साठी १५/०८/२०२२ (१५ ऑगष्ट) रोजी सकाळी ९ वाजता फाशी, आत्मदहन, विषपाशन पार्तोडा ग्रामपंचायत येथे करणार आहे. याची नोंद घ्यावी कारण की मला व माझ्या गावातील जनतेला न्याय द्यावा यांची सर्व मंत्री महोदय व न्यायविधी, मानव अधिकार सो यानी दखल घ्यावी ही माझी शेवटची विनंती.
संदर्भ : जिल्हा परिषद जळगांव सी.ई.ओ. यांना तालुका व जिल्हा लोकप्रतिनीधी यांच्या दबावाखाली काम करता या बाबतीत शंका वाटते.
टिप : कारण जी ही सर्व ग्रामपंचायत ची कामे ठेकेदारानी न करता स्थानिक पदाधिकारी व अधिकारी यांच्या सगमताने झाली आहेत व त्या कामाची लाखो रुपयाची बिले स्थानिक ग्रामस्थांच्या नावाने काडले व त्यात पदाधिकारी व अधिकारी कसुरवार असतील. त्यांच्यावर म्हणजे मी १५/०८/२०२२ मेल्यावर C.B.I. चौकशी करणे व मला माझ्यागावातील जनतेला न्याय द्यावा ही शेवटची विनंती