⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मोठी बातमी : पिंप्राळा रेल्वे गेट गणपती नंतर होणार बंद

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ ।  जळगाव शहरातील वाहतुकीचे मुख्य ठिकाण असलेल्या पिंपळा रेल्वे गेट हे गणपती नंतर पूर्णपणे बंद होणार आहे. सध्या नागरिक या गेटमधून प्रवास जरी करत असले तरी गणेशोत्सवा नंतर हे गेट पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. हे गेट बंद करण्याबाबत रेल्वेने महानगरपालिका पत्र दिले आहे.

पिंप्राळा उड्डाणपूलाचे काम वेगात सुरू आहे. एका बाजूला काम वेगात सुरू असले तरी दुसऱ्या बाजूला अजूनही रेल्वे गेट बंद करण्यात आलेले नाही. अशावेळी वाहतुकीमुळे कामाला अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये व बांधकाम लवकरात लवकर व्हावे. या उद्देशाने हे घेत लवकरच बंद करण्यात येणार आहे.

शिवाजीनगर उड्डाणपूल बंद असल्याने रेल्वे गेट जवळ मोठ्या प्रमाणावर नागरिक येत होते. जळगाव शहरात येण्याचा प्रमुख मार्ग असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर या गेटने प्रवास करत होते. मात्र आता हा पूल सुरू झाल्याने रेल्वे उड्डाण पूलाच्या पुढील कामासाठी रेल्वे गेट बंद करण्यात येणार आहे. गणपती नंतर हे रेल्वे गेट बंद करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबर नंतर हे रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

रेल्वे गेट बंद केल्याने आता मुख्य वाहतूक ही बजरंग बोगद्याकडून होणार आहे. या ठिकाणी आता येत्या काळात जरी वाहतूक कोंडी होणार असली तरी रेल्वे गेट वाहतूक बंद केल्याने पुलाचे काम लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामुळे आता नागरिकांना थोडी गैरसोय सहन करावी लागणार आहे. मात्र ही गैरसोय सहन केल्याने उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर होणार आहे.