मोठी बातमी : जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । आगामी जिल्हा परिषद गटांसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून राज्यातील ३४ नगरपालिकांचा देखील समावेश आहे.यातच जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने राज्यामधील ३४ जि.प. अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर केले आहे. दरम्यान, यातील धुळे, नंदुरबार, पालघर, नागपूर, अकोला, वाशीम आदींसह नऊ जिल्हा परिषदांची मुदत अद्याप संपलेली नाही. तर सध्या २५ जिल्हा परिषदांवर प्रशासक राज सुरू आहे. मुदत संपलेल्या आणि न संपलेल्या या दोन्ही वर्गवारीतील अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यात निवडणुका होऊ घातलेल्या २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण हे जाहीर झाले आहे. या अनुषंगाने ग्रामविकास खात्याने राजपत्रात अधिकृत घोषणा देखील करण्यात आली आहे. या घोषणेनुसार, राज्यातील ३४ नगरपालिकांचे आरक्षण हे खालीलप्रमाणे असणार आहे.
१ ) ठाणे
सर्वसाधारण
२ ) पालघर
अनुसूचित जमाती
३ ) रायगड
सर्वसाधारण
४ ) रत्नागिरी
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
५ ) सिंधुदुर्ग
सर्वसाधारण
६ ) नाशिक
सर्वसाधारण (महिला)
७ ) धुळे
सर्वसाधारण (महिला)
८ ) जळगांव
सर्वसाधारण
९ ) अहमदनगर
अनुसूचित जमाती
१० ) पुणे
सर्वसाधारण
११ ) सातारा
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
१२ ) सांगली
सर्वसाधारण (महिला)
१३ ) सोलापूर
नागरीकांचा मागास प्रवर्ग
१४ ) कोल्हापूर
सर्वसाधारण (महिला)
१५ ) औरंगाबाद
सर्वसाधारण
१६ ) जालना
नागरीकांचा मागास प्रवर्ग
१७ ) बीड
अनुसूचित जाती
१८ ) परभणी
अनुसूचित जाती
१९ ) हिंगोली
सर्वसाधारण (महिला)
२० ) नांदेड
नागरीकांचा मागास प्रवर्ग
२१ ) उस्मानाबाद
सर्वसाधारण (महिला)
२२ ) लातूर
सर्वसाधारण (महिला)
२३ ) अमरावती
सर्वसाधारण (महिला)
२४ ) अकोला
सर्वसाधारण (महिला)
२५ ) वाशिम
सर्वसाधारण
२६ ) बुलढाणा
सर्वसाधारण
२७ ) यवतमाळ
सर्वसाधारण
२८ ) नागपूर
अनुसूचित जमाती
२९ ) वर्धा
अनुसूचित जाती (महिला)
३० ) भंडारा
अनुसूचित जमाती (महिला)
३१ ) गोंदिया
नागरीकांचा मागास प्रवर्ग
३२ ) चंद्रपूर
अनुसूचित जाती (महिला)
३३ ) गडचिरोली
नागरीकांचा मागास प्रवर्ग (महिला)
३४ ) नंदुरबार
अनुसूचित जमाती (महिला)