महाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी : गुलाबराव देवकर करणार आदित्य ठाकरेंचा सत्कार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे शनिवारी (दि. २०) जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघांत हा कार्यक्रम होणार आहे.

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे शनिवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. अशावेळी शिवसेना त्यांच्या स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे मात्र यात आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे जळगाव ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार, जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर आदित्य ठाकरे यांचं स्वागत करणार असून आदित्य ठाकरे यांच्या सत्काराचा समारंभ गुलाबराव देवकर यांनी ठेवला आहे.

गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील या दोघांमधील राजकीय वैर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांचा 2009 साली पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या पुढच्या दोन निवडणुकांमध्ये म्हणजे 2014 आणि 2019 मध्ये गुलाबराव देवकर यांचा गुलाबराव पाटील यांनी पराभव केला आहे. मात्र आता शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गटामध्ये सामील झालेले गुलाबराव पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे कारण की त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी म्हटले जाणारे गुलाबराव देवकर आता शिवसेनेची हात मिळवणी करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचेच पहिले पाऊल की काय? म्हणून गुलाबराव देवकर उद्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सत्कार करणारं आहेत.अश्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते संपूर्ण जळगाव जिल्हा पिंजून काढणार आहेत. युवा सैनिकांशी संवाद साधणार आहेत. मात्र याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात देखील ते सभा घेणार आहेत. अशा वेळेस गुलाबराव पाटील यांना शह देण्यासाठी युवासेना सज्ज झाली आहे. मात्र यातच आता गुलाबराव देवकर यांनी एन्ट्री घेतल्यामुळे आणि गुलाबराव देवकर आदित्य ठाकरे यांचा सत्कार करणार असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Related Articles

Back to top button