⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

जळगाव जिल्ह्यातील ‘हे’ पोलीस दाम्पत्य विद्यार्थ्यांना देत आहे शिक्षणाचे आणि संस्काराचे धडे

जळगाव लाईव्ह न्यूज : ७ एप्रिल २०२३ : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे व त्यांच्या अर्धांगिनी सुनीता वाघमारे यांनी मात्र गावातील शालेय विद्यार्थी व विविध प्रकारच्या भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शनासह विविधांगी प्रकारची मदत करून आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

पोलिसांची प्रतिमा आपल्यासमोर जरा वेगळीच आहे. नेहमीच कर्तव्यदक्ष असणारे पोलीस हे जरा कठोर स्वभावाचे असतात आणि आपल्या ड्युटी शिवाय त्यांना काहीही समजत नाही अशी प्रतिमा कित्येक पोलिसांची नागरिकांच्या समोर आहे. मात्र या प्रतिमेला बाजूला सारत पाचोरा तालुक्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे व त्यांच्या पत्नी सुनीता वाघमारे यांनी गावातील शालेय विद्यार्थी व परीक्षा भरती करणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करत आहेत

मुलांना शिक्षण मिळावं, त्यांना उज्वल भविष्य मिळावं, येत्या काळात त्यांना समाजात चांगली वागणूक मिळावी या हेतूने ही शाळा या दाम्पत्यांनी सुरू केली. सध्या दररोज पन्नास मुलं सायंकाळी शिक्षण व संस्काराचे धडे करण्यासाठी इथे उपस्थित येतात. मात्र एक काळ असा होता. जेव्हा इथे केवळ दोनच विद्यार्थी असायचे.

ज्या मुलांना संरक्षण किंवा पोलीस दलाच्या विविध भरतीसाठी तयारी करायची आहे. असे युवक एकत्रित येऊन तिथे लेखी, मैदानी, तोंडी परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण टिप्स घेतात. त्यांची ऊर्जा या दांपत्यामुळे वाढत असते. तर दुसरीकडे खडू फळा आणि विविध प्रकारचे चार्ट याचा वापर करून हे दाम्पत्य विद्यार्थ्यांना शिकवते