जळगाव जिल्हा

जी प कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ; भ.नि.नि खाते उतारे संकेतस्थळावर उपलब्ध

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

    जळगाव लाईव्ह न्यूज | १९ एप्रिल २०२२ | जिल्हा  परिषद कर्मचऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे सन २०२०-२१ चे खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

          मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सोयीचे होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्याच दृष्टीने भविष्य निर्वाह निधीचे उतारे वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना १८ एप्रिल, २०२२ पासून जिल्हा परिषदेच्या  http://zpjalgaon.gov.in/ या संकेतस्थळावर जावून एका क्लिकवर हे उतारे बघता येणार आहेत. त्याची प्रिंटही काढता येणार आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी         राजेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सदर लेखे पूर्ण करण्यासाठी लेखाधिकारी  दिलीप वानखेडे, कनिष्ठ लेखाधिकारी किरण पराशर व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.  

          संबधित खाते उताऱ्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास एक महिन्याच्या आत सबंधीत खाते प्रमुखा मार्फत अर्थ विभागाच्या भनिनि शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य लेखा

वित्त अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Related Articles

Back to top button