जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२४ । राज्य शासनातर्फे ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता औद्योगिक संघटना, उद्योजकांशी संवादाचा कार्यक्रम व त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, अनिल पाटील यांच्यासह आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १.४५ वाजता मुख्यमंत्र्यांचे जळगाव येथील विमानतळावर आगमन होणार आहे. या कार्यक्रमाची दुपारी ३.३० वाजेपर्यंतची रूपरेषा प्रशासनाकडून तयार करण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रमाच्या १५ मिनिटांपूर्वी नागरिकांना नाट्यगृहात आसनस्थ होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.