⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

आजचे विशेष : तुम्हाला ‘अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम’ माहितीये का?

जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । “अक्वायर्ड इम्यूनो डिफिशियेंसी सिंड्रोम” ऐकायला जरा कठीण जातंयन.. आपण विचारात पडले असाल कि आता हा कोणता आजार? तर या आजाराला एच.आय.व्ही. एड्स असं म्हंटल जात. एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक दुर्बलता आणणारी स्थिती आहे. यात माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती निकामी बनते. आज आपण याबद्दल का बोलतोय? तर आज आहे १ डिसेंबर जो सर्वत्र ‘जागतिक एड्स डे’ म्हणून पाळला जात असतो.

एड्स हा रोग नाही पण एक शारीरिक शारीरिक दुर्बलता आणणारी स्थिती आहे. एड्‌स झालेल्या माणसाला इतर संसर्गजन्य रोगांची सहज लागण होऊ शकते. एच.आय.व्ही. रक्तातील रोगप्रतिकारक पेशीं लिम्फोसाईट्सवर आक्रमण करतात. एड्स पीडितांच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता हळूहळू कमी होत गेल्याने सर्दी, खोकल्यासारखे साधे तसेच क्षयासारखे भयंकर रोग होण्याची दाट शक्यता असते. त्यावर इलाज करणे त्याहून जास्त कठीण होऊन बसते. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत ८ ते १० वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एच.आय.व्ही.ने ग्रस्त व्यक्ती अनेक वर्षांपर्यंत काहीही लक्षणांशिवाय राहू शकते.

दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जगभर फैलावलेल्या एड्स या जीवघेण्या रोगाबद्दल जगभर जनजागृती व्हावी आणि या रोगामुळे मरण पावलेल्यांचा शोक वक्त करण्यासाठी हा दिवस पाळावा असे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. एड्स वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्य समस्यांपैकी एक आहे. एड्सच्या संसर्गाची असुरक्षित लैंगिक संबंध, बाधित रक्तातून, तसेच बाधित आईकडून अर्भकाला होणे अशी तीन मुख्य कारणे आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्रॅम आणि यूएन एड्स यांच्यानुसार भारतात ८० से ८५ टक्के संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक (हेट्रोसेक्शुअल) संबंधांतून पसरत आहे.

कुठे आढळला सर्वात पहिला एच.आय.व्ही बाधित? 

एच.आय.व्ही. विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील खास प्रजातीच्या माकडात सापडला आणि तेथूनच सगळ्या जगात पसरला असे मानले जाते. इ.स.१९८१ मध्ये सुमारे ५ कोटी लोक एड्‌सचे बळी ठरले आहेत असा अंदाज आहे. अजूनही एड्‌सवर इलाज सापडलेला नसल्याने जगभरातील संशोधक त्यावर काम करत आहेत.

औषधे महाग, शंका असल्यास करावी रक्तचाचणी 

भारतात अनेकजण एड्‌सकडे दुर्लक्ष करतात. एड्सवर सध्या कोणतेही औषध व लस उपलब्ध नाही. एच.आय.व्ही विषाणूची लागण झाली असल्याचे खूप लवकर लक्षात आले, तर काही ‘ॲंटीरेट्रोव्हायरल’ औषधे घ्यायला लागून एड्सच्या स्थितीचा वेग कमी करणे काही प्रमाणात शक्य आहे. परंतु ही औषधे अतिशय महाग असल्याने विकसनशील व अविकसित देशांतील बहुतांश लोकांना उपलब्ध नसतात. तसेच ह्या औषधांची परिणामकारकता मर्यादित असून एड्सला पूर्णपणे रोखणे सध्यातरी शक्य नाही. एचआयव्हीचे निदान तात्काळ होत नाही. एखाद्या व्यक्तीला शंका असल्यास त्याने एकदा रक्त चाचणी करून खात्री करावी आणि त्यात काहीही न आढळून आल्यास तीन महिन्यांनी पुन्हा रक्त चाचणी केल्यास  बाधित असल्यास त्याचे निदान होते.