⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

मोठी बातमी : एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते तर गुलाबराव पाटील उपनेते

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२२ ।  शिवसेनेच्या शिंदे गटाने नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. यावेळी जुनी कार्यकारणी बरखास्त करत शिंदे गटाने नवीन कार्यकारीणी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.गुलाबराव पाटील यांची देखील उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख कोण ? हे नक्की झालेले नाही. किंबहुना या पदाला कोणताही धक्का लावण्यात आला नाहीये.

शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली आहे. या दोघांचीही काही तासांपूर्वीच शिवसेनेतून पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणाखाली हकालपट्टी करण्यात आली होती. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

शिवसेनेची जुनी कार्यकारणी
मनोहर जोशी , सुधीर जोशी, लीलाधर ढाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन कीर्तिकर, आनंद गीते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, एकनाथ शिंदे

खासदार फुटणार ?
यात अजून एक धक्का म्हणजे संसदेच्या अधिवेशनात शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट निर्माण झाली आहे. यामुळे शिवसेनेचे १४ खासदार हे शिंदे गटात जाणार आहेत असे म्हटले जात आहे. यात भावना गवळी व श्रीकांत शिंदे यांच्या सकट अजून किती खासदार आहेत हे अजून स्पष्ठ झालेले नाही.