⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मोठी बातमी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अ‍ॅरॉन फिंचची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती!

जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने आज शनिवारी रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दरम्यान, आगामी T20 विश्वचषक 2022 नंतर अ‍ॅरॉन फिंच टी20 फॉरमॅटलाही अलविदा करणार असल्याचे बातमी समोर आली आहे.

ऑस्ट्रेलिया सध्या टी-२० विश्वचषकाचा चॅम्पियन आहे. या वर्षी टीम ऑस्ट्रलिया विजेतेपद कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच T20 विश्वचषकाचे आयोजन करत आहे. T20 विश्वचषक 2022, 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर अ‍ॅरॉन फिंच देखील टी-20 फॉरमॅटला अलविदा करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अ‍ॅरॉन फिंच 35 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया या फॉरमॅटमध्ये त्याला खेळायला संधी देऊ शकते.

गेल्या काही दिवसापूर्वी अ‍ॅरॉन फिंचने निवृत्तीचे संकेत दिले होते. अ‍ॅरॉन फिंचनेही आपल्या कारकिर्दीत 5 कसोटी सामने खेळले आहेत, अ‍ॅरॉन फिंचने ऑस्ट्रेलियाकडून 145 वनडे आणि 92 टी-20 सामने खेळले आहेत. अ‍ॅरॉन फिंचने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 5401 धावा केल्या आहेत, तर टी-20 क्रिकेटमध्ये या खेळाडूने 92 सामन्यांमध्ये 2855 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये अ‍ॅरॉन फिंचने 17 अर्धशतकांसह दोनवेळा शतक केले आहे.