⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

मोठी बातमी : जळगावातील ४ गावांना जायचे आहे मध्यप्रदेशात

जळगाव लाईव्ह न्यूज |६ डिसेंबर २०२२ |एकीकडे कर्नाटक – महाराष्ट्र्र प्रश्न चिघळत असताना मध्यप्रदेश महाष्ट्रात सीमा वाद होण्याची शक्यता आहे. कारण बुलढाण्यातील जळगाव जामोद तालुक्यातील मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या चार गावांतील नागरिकांना सुविधा मिळत नाहीत म्हणून मध्य प्रदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 भिंगारा, गोमाल-१, गोमाल-२, चाळीसटापरी असे या ४ गावांची नाव आहेत. या संदर्भात लवकरच ग्रामस्थांकडून शासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासी गावांमध्ये सोयीसुविधा नाहीत. पर्यायी महाराष्ट्र सोडण्याची भावना वाढीस लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका हा मध्य प्रदेशाच्या सीमेवर असून सातपुडा पर्वतामध्ये तीनखुटी या ठिकाणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाची सीमा आहे.

महाराष्ट्राच्या सीमेला (maharashtra state border) बुऱ्हानपूर जिल्हा लागून आहे. याठिकाणी आदिवासी गावे वसलेली आहेत. त्यामध्ये १९ आदिवासी गावांचा समावेश आहे. तर भिंगारा, गोमाल आणि चाळीसटापरी ही चार गावे अतिशय दुर्गम भागात आहेत. या गावांना पक्का रस्ता नाही. पाण्याची सुविधा नाही. वीज नाही. शासन दरबारी चकरा मारून हे ग्रामस्थ थकले आहेत.

याच बरोबर आदिवासी असूनही त्यांना आदिवासींचे जात प्रमाणपत्र शासनाकडून मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या आदिवासींच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. या अनेक कारणांमुळे हे आदिवासी उद्विग्न झाले असून शासन आणि राजकारण्यांपासून सर्वजण उदासीन आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र सोडण्याचा त्यांनी हा निर्णय घेतला आहे.