⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

मोठी बातमी : जिल्हातील गिरणा धरणात ३६ तर मन्याडमध्ये केवळ ९ टक्के साठा

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । जून महिन्याचे दाेन आठवडे उलटले, तरी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. गिरणा धरणात ३५ टक्के, तर मन्याड धरणात केवळ नऊ टक्के साठा उरला आहे. यामुळे ग्रामस्त चिंतिती आहेत. चाळीसगाव तालुक्यात गेल्या तीन- चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होते. काही ठिकाणी हलका पाऊस हाेत असल्याने तापमानात घट झाली असली तरी उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर तालुक्यातील १४ लघु प्रकल्प कोरडेठाक पडले असून गिरणा धरणात ३६ तर मन्याड धरणातही केवळ ९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ३ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

तालुक्यात दाेन-तीन वर्षांपासून पाऊस जूनच्या सुरुवातीला वेेळेवर हजेरी लावत असल्याने काेरडवाहू क्षेत्रातील शेतकरी कृषी विभागाच्या अावाहनानुुसार एक जूनपासूनच पेरणीला सुरुवात करतात. मात्र, यंदा जूनचे दोन आठवडे कोरडेच गेले आहेत.

सद्यस्थितीत तालुक्यात ३ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानेे उकाडा वाढला. त्यामुळे चाळीसगावकर पुरते बेजार झाले. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते घेवून ठेवली आहेत. आता पेरणी याेग्य पावसाच्या प्रतीक्षेत नजरा आभाळाकडे लागल्या अाहेत.

पाऊस लांबल्यास आणखी काही गावांमध्ये टंचाई
गत वर्षी तालुक्यात विक्रमी पाऊस होवूनही यंदा १४ प्रकल्पांनी तळ गाठला. देवळी-भोरस, खडकीसीम, वलठाण, कुंझर, वाघला १, वाघला २, कृष्णापुरी, पिंप्री-उंबरहोळ, पिंपरखेड, बोरखेडा, पथराड, ब्राह्मणशेवगे, हातगाव, राजदेहरे या लघु प्रकल्पांमध्ये सध्या शून्य टक्के पाणी साठा आहे. तर तालुक्यासह जिल्ह्यास वरदान ठरलेल्या गिरणा धरणात ३६ टक्के व मन्याड धरणात केवळ ९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. उन्हाच्या तडाख्याने जलसाठ्यात घट झाली. ३ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू अाहे.