महाराष्ट्र

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील २५ गाव तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२३ ।  यवतमाळ जिल्ह्यात असलेली २५ गावं ही तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत.याचे कारण म्हणजे जवळच असलेले सुसज्ज तेलंगणा राज्य. दिग्रस येथे पूल झालेला आहे. याच बरोबर तेलंगणातील परिवहन सेवा येथिल नागरिकांना मिळत आहे. पर्यायी तिथल्या नागरिकांना आदिलाबादची बाजारपेठ जवळ पडत आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात असलेली २५ गावं ही तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत

आजून एक महत्वाचे कारण म्हणजे तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी २४ तास निशुल्क वीजपुरवठा, किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना प्रतिएकर १० हजार रुपयंपर्यंत कर्ज दिलं जातंय. त्यामुळे पैनगंगेच्या पट्ट्यातील २५ गावे तेलगंणाच्या प्रेमात आहेत.महाराष्ट्र राज्याची सीमा पैनगंगा नदीवर संपते नदीच्या पलीकडून तेलंगणाची हद्द सुरू होते. तेलंगाणातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी केसीआर सरकार चोवीस तास वीज देते. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कधी दिवसा तर कधी रात्रीपाळीत वीज दिली जाते. नैसर्गिक अपत्तीमुळे किंवा आत्महत्या झाल्यास तेलंगाना सरकार शेतकऱ्यांना पाच लाखापर्यंत नुकसान भरपाई देते तर त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार एक लाख रुपये देते. यामुळे यवतमाळ जिल्ह्यात असलेली २५ गावं ही तेलंगणा राज्यात जाण्याच्या तयारीत आहेत

शेतकऱ्यांसाठी २४ तास निशुल्क वीज पुरवठा, किसान सन्मान योजनेचा लाभ, रयतूब बंधू योजना शेतकऱ्यांसाठी प्रभावी ठरत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना प्रति एकर दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज दिल्या जात आहे. प्रत्येक गावातील रस्ते विकसित करण्यात आले आहेत.मुलींच्या लग्नासाठी ५० हजार रुपये दिले जातात. घरकुल योजना प्रत्येकांसाठी राबवली जात आहेत. त्यामुळेच पैनगंगा पट्ट्यातील २५ गावातील शेतकरी तेलंगणा सरकारच्या प्रेमात पडल्याचे चित्र आहेत.

Related Articles

Back to top button