⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

सावधान ! एका दिवसात आढळले तब्बल इतके कोरोना रुग्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । देशासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढायला सुरवात केली आहे. कारण कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशात कोरोनाच्या १७००हुन अधिक रुग्ण आढळते आहेत. भारतात सक्रिय रूग्णांची संख्या आता तब्बल ७९२७ पर्यंत पोहोचली आहे.

आत्ता पर्यंत एकूण मृतांची संख्या 5,30,818 झाली असून मृत्यूचा दर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. दरम्यान राज्यात मागील 24 तासात 343 रुग्ण आढळून आले आहेत.सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरातील असून पुण्यात 510 रुग्णांची नोंद झाली असून नवे 136 रूग्ण आढळले आहेत. राज्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकूण 1700 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. तर देशात आत्ता पर्यंत 98.79 टक्के लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.

देशव्यापी राबवलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 220.65 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्राने काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह दरात वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यावर तातडीने नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले असून प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.