गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बॅंक अध्यक्षपदाचा राजीनामा

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आज बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्याकडे दिला. तसेच बँकेचे उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला.

आता जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी नव्याने निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी जिल्हा मजूर फेडरेशनच्या कार्यालयात जाऊन राजीनामा स्वीकारला. यावेळी बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील उपस्थित होते.