⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने व भारनियमनामुळे पिकांचे नुकसान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. पावसाने मारलेल्या दांडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याचबरोबर इतर सुविधांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

भार नियमनामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पर्यायी शेतीला केवळ आठ तास वीज मिळत आहे. यातच मोठ्या प्रमाणावर वीज खंडित होते. कित्येकदा वीज मिळत नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही. तरी दिवसाआड वीज जाते ज्यामुळे आठवड्यावर शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. अशावेळी पावसावर शेतकरी अवलंबून असतात मात्र पाऊस न होत असल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान होत आहे.

उन्हाचा चटका वाढल्याने कापूस व मका या पिकांना धोका निर्माण झाला आहे. उन्हाचा चटका वाढल्याने याचबरोबर वेळोवेळी होत असलेल्या भार नियमनामुळे शेतीला हवं तितके पाणी मिळत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. अशावेळी शेतकऱ्यांसाठी महावितरण किमान दहा तास तरी वीज द्यावी असे शेतकरी आस लावून बसले आहेत

याचबरोबर, शेतकरी मका कापूस असे कित्येक पिक जिल्ह्यात लावतात. शेतकऱ्यांना मका व कापूस याची लागवड करताना पाणी प्रचंड महत्त्वाचे असते मात्र सध्या होत नसलेल्या पावसामुळे आणि भारनियमन या दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.