⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगावकरांसाठी खुशखबर; वाघूर धरणाच्या जलसाठ्या मोठी वाढ, पाणीटंचाईचा प्रश्न मिटला

जळगावकरांसाठी खुशखबर; वाघूर धरणाच्या जलसाठ्या मोठी वाढ, पाणीटंचाईचा प्रश्न मिटला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । गेल्या महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जळगावसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली तर अनेक धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणेज गेल्या तीन चार दिवस झालेल्या पावसामुळे वाघूर धरणाच्या जलसाठ्या घशघशीत वाढ झाली आहे. यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील काही गावांचा काहीसा पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात यंदा जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्यात चांगली हजेरी लावली. त्यांनतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा मोठा पावसाचा खंड पडला होता. पावसाने पाठ जिल्ह्यातील फिरवल्यामुळे लहान-मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ न झाल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे ढंग जमा झाले होते. तसेच खरिपाची पिके करपू लागली होती.

मात्र, गेल्या पाच दिवसात झालेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यावरील दुष्काळाचे ढग काही अंशी दूर झालेले दिसून येत आहेत. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण ७७ टक्के भरले असल्याने यंदा तरी जळगावकरांना पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

यंदा जिल्ह्यात मान्सून उशीरानेच दाखल झाला. त्यातही जून महिन्यात जिल्ह्यात केवळ ४५ मिमी पाऊस झाला. तर जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. मात्र, वाघूर व गिरणा दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे दोन्ही धरणांच्या जलसाठ्यात फार काही वाढ झाली नव्हती. त्यातही ऑगस्ट महिनादेखील कोरडा गेल्यामुळे जळगावकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीची चिंता वाढली होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे वाघूर धरणाच्या जलसाठ्यात चांगली वाढ होत आहे. वाघूर धरणाचा जलसाठा ७७ टक्क्यांपर्यंत पोहचल्याने जळगावकरांचा यंदाच्या वर्षाच्या पिण्याचा ताण मिटला आहे.

वाघुवर अवलंबून असलेले तालुके?
वाघूर धरणावर जामनेर, भुसावळ व जळगाव तालुके अवलंबून आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.