⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठी घडामोड : लवकरच शिंदे – ठाकरे भेट होणार?

जळगाव लाईव्ह न्युज । १४ जुलै २०२२ । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट होणार आहे. यामुळे शिवसेनेचे शिंदे – ठाकरे गट पुन्हा एकत्र येणार असा मला विश्वास आहे. असे ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

यावर बोलताना दीपाली सैय्यद म्हणाल्या कि, मी दोन्ही गटांमध्ये चर्चा केली. या चर्चेनंतर मला जाणवलं मी ते ट्वीट केल. करणं तुटलेलं घर पुन्हा एकत्र यावं असं मला वाटतं.यामुळे मी दोघांमुळे मध्यस्ती करत आहे.

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्याचं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलं होत. यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते अश्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर बोलताना त्या म्हणाल्या कि, माझ्यावर कारवाईचा बडगा उचलण्याचा कोणताही संबंध येत नाही. उद्धव ठाकरे मोठे आहेत. ते काहीही करू शकतात. शिंदे आणि ठाकरे गट दोन्ही एकत्रही येऊ शकतात. शिवसेनेत दोन गट नकोत म्हणून मी समन्वयाची भूमिका बजावत आहे.

तर पुढे त्या असही म्हणाल्या कि, सगळ्या आमदारांना माझं आवाहन आहे की शिवसेनेत दोन गट नकोत. त्यामुळे कार्यकर्ते होरपळत आहेत. मला दोन्ही गटांमध्ये बोलून हे जाणवलं आहे की त्यांना एकत्र यायचं आहे. पण कुणी समोर येऊन बोलत नाही. मान अपमान यामध्ये अडकले आहेत.

दिपाली सय्यद यांचं ट्वीट काय होतं?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्याचं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलंय. दोन दिवसांत दोन्ही नेत्यामध्ये भेट होईल असा उल्लेख त्यांनी ट्विटरमध्ये केलं. या भेटीसाठी भाजप नेत्यांनी मध्यस्थी केल्याबद्दल त्यांनी भाजपचे आभारही मानले.