---Advertisement---
महाराष्ट्र

बदलापूर अत्याचार प्रकरणात राज्य सरकारचा मोठा निर्णय ; गृहमंत्र्यांनी दिले हे आदेश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२४ । बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे मोठा उद्रेक पाहायला मिळत आहे. रस्त्यावर उतरत बदलापूरकरांनी आंदोलन केलं आहे. आंदोलकांनी सकाळपासून बदलापूर स्थानकांत ठिय्या आंदोलन पुकारले आहे. यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यानची वाहतूक ठप्प झालेली आहे. दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

badlapur case jpg webp

यामुळे बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या तपालासा आता वेग आला आहे. पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

---Advertisement---

फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना आदेश
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून या बाबतचं ट्विट करण्यात आलं आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

बदलापूरमधील नामांकित शाळेत स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे. पॉक्सोची केस या प्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---