Big Breaking : वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी

जुलै 19, 2022 1:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज ।१९ जुलै २०२२ । शिंदे गटाच्या शिवसेनेने वरूण सरदेसाई यांना मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. काल शिंदे गटाने शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त केली होती. त्यातच आज शिवसेनेला अजून एक धक्का बसला असून वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

WhatsApp Image 2022 07 19 at 12.31.54 PM jpeg webp

सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का आहे.याआधी कालच शिंदे गटाने आपली नवीन शिवसेना कार्यकारणी गठीत केली होती. यावेळी जुनी कार्यकारणी बरखास्त करत शिंदे गटाने नवीन कार्यकारीणी जाहीर केली होती. यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तर, दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.

गुलाबराव पाटील यांची देखील उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख पदाला कोणताही धक्का लावण्यात आला नाहीये.शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करताना नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड केली. शिंदे गटाने उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. 

सरदेसाई आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत मिळून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले आहेत.आता वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याने हा अजून एक धक्का आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now